कोविड केअर सेंटरसाठी १५ बेडस् कायमस्वरुपी भेट

 कोविड केअर सेंटरसाठी १५ बेडस् कायमस्वरुपी भेट

वेब टीम नगर: केडगाव (तालुका नगर) येथील अशोक कुटे व गोरख गहिले यांच्या पुढाकारातून कोविड सेंटरला १५ बेड वितरण करण्यात आले. जेऊर आणि चिचोंडी पाटील येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळून १५ चांगल्या दर्जाचे बेड कोविड सेंटरला कायमस्वरूपी भेट देण्यात आल्याची माहिती तहसीलदार उमेश पाटील यांनी दिली.

नेवासा येथे कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक अशोक कुटे व अरणंगाव येथील उद्योजक गोरख गहिले यांनी ही मदत केली. पंचगंगा उद्योग समूहाचे संचालक प्रभाकरराव शिंदे आणि काकासाहेब शिंदे यांनी नेवासा कोविड सेंटरला १०० बेड, २ मिनी अँम्बुलस, २० नवीन ऑक्सिजन सिलेंडर कायमस्वरूपी भेट दिले होते. ती प्रेरणा घेऊन या दोघांनी मोठ्या प्रमाणात बेड व इतर मदत भेट देण्यासाठी सोशल मीडियावर  आवाहन केले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.(फोटो-फोटो-२)

Post a Comment

0 Comments