आमदार साहेब भेटत नाहीत म्हणून केली "श्रद्धांजलीची" पोस्ट व्हायरल

आमदार साहेब भेटत नाहीत म्हणून केली "श्रद्धांजलीची" पोस्ट व्हायरल वेब टीम कामठी : करोनाच्या भयंकर उद्रेकाने हवालदिल झालेल्या नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. समाजमाध्यमांतून पुढाऱ्यांना लक्ष्य करणे सुरू झाले आहे. अशाच प्रकारातून कामठीचे आमदार हरवल्याची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर चक्क 'निधन' आणि 'श्रद्धांजली'चीही पोस्ट व्हायरल करण्यात आल्याने नागरिकांत खळबळ उडाली. हा प्रकार लक्षात येताच आमदारांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन याबाबत तक्रार दाखल केली.

कामठीचे भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य हरवल्याची पोस्ट समाजमाध्यमांत व्हायरल करण्यात आली. याची चर्चा सुरू असतानाच एकाने त्यांचे 'निधन' झाल्यासह त्यांना 'श्रद्धांजली' वाहिल्याची पोस्ट व्हायरल केली. याबाबत आमदार सावरकर यांना कळताच त्यांनी लगेच वाठोडा पोलिस ठाणे गाठून या खोडसाळपणाबाबत तक्रार केली. पोस्ट टाकणारा प्रीतम व इतर दोघांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी तक्रारीत केली. ही सर्वसामान्यांची प्रतिक्रिया नाही. पक्षाला बदनाम करण्यासाठी भाजप विरोधकांचा हा डाव असल्याचा दावा टेकचंद सावरकर यांनी केला.

Post a Comment

0 Comments