अन्यथा कोविड रुग्णावरील उपचार थांबवावे लागतील

अन्यथा कोविड रुग्णावरील उपचार थांबवावे लागतील 

रुग्णालयांना ऑक्सिजन ची निर्मिती प्रकल्प उभारण्यास सांगणे म्हणजे  प्रशासन जबाबदारी टाळते आहे 

आय.एम.ए  चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

वेब टीम नगर : आज कोव्हीडचा प्रादुर्भाव वाढत आहे, सर्व डॉक्टर्सं या पेशन्टस वर उपचार करण्यात व्यस्थ आहेत अश्या कठीण  परिस्थितीमध्ये त्यांना ऑक्सिजनची व्यवस्था करण्यास सांगणे,ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यास सांगणे हे म्हणजे शासन आपली जबाबदारी टाळत असून हे सांगणे हास्यस्पद असल्याचे निवेदन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नगर शाखेने पत्रकाद्वारे काढले आहे..शासनाचे प्रतिनिधी व जिल्हाधिकारी याना हे पत्र मंगळवारी पाठविण्यात आलेलं असून सध्य्याच्या करोना महामारीच्या संकट काळात अत्यवस्थ रुग्णांची संख्या  वाढल्याने ऑक्सिजनची गरज चौपटीने वाढली आहे.

त्या मुळे ऑक्सिजनची वितरण व्यवस्था कोलमडली असून याचा परिणाम ऑक्सिजन ची कमतरता  होत आहे . यां अगोदरही ऑक्सिजनच्या कमतरते विषयी वेळोवेळी प्रशासनाशी चर्चा झाली होती सप्टेंबर २०२० मध्ये सुद्धा हाच प्रश्न उद्भवला होता .प्रशासनाला, पालकमंत्री याना भेटून याबदल कल्पना दिली होती .त्यानंतर ७ महिन्यानंतर पुन्हा तीच परिस्थिती उदभवली असून जिल्हा प्रशासनाच्या जबाबदारी नुसार त्यांनी ऑक्सिजनची पुरवठा व्य वस्था सुरळीत चालू ठेवण्याची व्यवस्था करावी मात्र प्रशासन मात्र हि व्यवस्था रुग्णालयांनी करावी असे सांगत आहे.

..खरे तर कोणत्याहि कायद्याच्या अंतर्गत ऑक्सिजनची निर्मिती करणे हि रुग्णालयाची जबाबदारी असू शकत नाही .सर्व रुग्णालये आज बाजार भावाने ऑक्सिजन घेण्यास तयार आहेत पण योग्य प्रमाणात तो उपलूब्ध करून देणे हि प्रशासनाची जबाबदारी असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनने या पत्रकात नमूद केले असून डॉक्टर्स ऑक्सिजन डीलर्स कडून खरेदी करतात परंतु त्यांनाच पुरवठा झाला नाही तर ते रुग्णालयांना कसा पुरवणार असे सांगून जर एखाद्या रुग्णाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला तर त्याची पूर्ण जबाबदारी हि प्रशासनाची असेल असे निवेदनांत स्पस्ट  नमूद केले आहे व अश्या प्रकारे ऑक्सिजनच्या उपलब्धतेविषयी  अडचणी येत राहिल्यास खाजगी रुग्णालये हे नाइलाजास्त्तव कोव्हीडं रुग्णांवर उपचार करणे बंद करतील असा इशारा देखील इंडियन मेडिकल आसो.ने या प्रत्रकाद्वारे दिला आहे . 

Post a Comment

0 Comments