बेताल वक्तव्ये करण्यापेक्षा केंद्राने दुजाभाव करू नये यासाठी शक्ती खर्च करा : ॲड. सुरेश लगड

 बेताल वक्तव्ये करण्यापेक्षा केंद्राने दुजाभाव करू नये यासाठी शक्ती खर्च करा : ॲड. सुरेश लगड  

वेब टीम नगर : आ.राधाकृष्ण  विखे आपण आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील महाआघाडी सरकार मधील कार्यक्षम मंत्र्यांविरुद्ध बेताल वक्तव्ये करतात.अशी ही बेताल व दिशाभूल करणारी वक्तव्ये करण्यापेक्षा आपल्या भारतीय जनता पक्षाचे तसेच   देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना  महामारीत दुजाभाव न करता  राज्याला केंद्र सरकारकडून कशी जास्तीत जास्त मदत करता येईल यात आपली शक्ती खर्च करावी.असा सल्ला ॲड. सुरेश लगड यांनी आ. विखे यांना लगावला आहे . 

आपण सत्तेत नसल्याने त्या मानसिकतेतुन विचलीत होऊन महाविकास आघाडी सरकार मधील कार्यक्षम अशा आपल्या जिल्ह्यातील मंत्र्यांविरुद्ध बेताल वक्तव्ये करीत आहात ही वस्तुस्थिती आहे.ऊलट माझे असे मत आहे की आपण आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील कार्यक्षम अशा सर्व मंत्र्यांचा कामाचा आदर्श घ्यावा.आणी आपली सर्व शक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या महाराष्ट्राबाबत दुजाभाव करणार नाही यासाठी खर्च करावी असं मला प्रामाणिकपणे वाटते.

....ॲड. सुरेश लगड  विधीज्ञ अहमदनगर .

Post a Comment

0 Comments