अहमदनगर जिल्ह्याचे अंतरंग : ताहराबादचे संत चरित्रकार संत महिपती महाराज (भाग २)

अहमदनगर जिल्ह्याचे अंतरंग : ताहराबादचे संत चरित्रकार संत महिपती महाराज (भाग २)

महीपति महाराजांनी श्री दत्त जन्म या ग्रंथाच्या११२ओव्या लिहिल्या नंतर १८६ ओव्यांचा अनंत व्रत कथा हा ग्रंथ लिहिला.  त्यानंतर तुळशी महात्म्य हा ७६३ ओव्यांचा ग्रंथ लिहिला.  गणपती वर गणेश पुराण नावाचा चार अध्यायांचा ग्रंथ लिहिला.  मुक्त भरण  स्तोत्र नावाचा १०१ ओव्यांचा ग्रंथ आणि त्यानंतर १४२ ओव्यांचा 'ऋषिपंचमी' नावाचा ग्रंथ लिहिला आणि शेवटी १०८ ओव्यांचा पांडुरंग स्तोत्र नावाचा ग्रंथ लिहिला .  परंतु म्हणतात ना व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या प्रमाणे गावच्या पाटलांनी एका माणसाच्या हाताने महिपती महाराजांची पांडुरंगाची मूर्ती व ग्रंथ चोरून आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे चोराने ग्रंथ व मूर्ती चोरली, परंतु त्या चोराची दृष्टी गेली व रात्रभर तो त्याच जागेवर फिरून ओरडत होता.  मला दिसत नाही मला कुणीतरी मदत करा.  तिकडे महिपती महाराजांना  खूप दुःख झाले व ते पांडुरंगाला म्हणाले माझी भक्ती  तुम्हाला आवडली नाही का? जोपर्यंत माझा ग्रंथ व पांडुरंग मला मिळत नाहीत मी अन्नग्रहण करणार नाही.  नेमका चोर फिरत होता त्या वाटेवरून महाराजांचा शिष्यधोंडीबा येत  होता.  त्याने चोराला पाहिले व त्याला विचारले तुझी दृष्टी कशी गेली त्यावर त्याने सर्व हकीकत सांगितली.  त्यावर सांगितले तू फार वाईट काम केले त्याची शिक्षा मिळाली आहे . तू महिपती महाराजांना शरण जा मी तुला घेऊन त्यांच्याकडे जातो.  ते महिपती महाराज यांच्याकडे गेले व त्यांच्या वस्तू ,ग्रंथ व पांडुरंग मूर्ती परत दिल्या.  त्या वेळेला महाराज म्हणाले मूर्ती कुणी चोरतं का ? देवा याला क्षमा करा त्याची दृष्टी परत द्या असे म्हणून त्याच्या डोळ्यावरून महिपती महाराज यांनी हात फिरवला व त्याला त्याची दृष्टी प्राप्त झाली.  त्याबरोबर त्याने महाराजांचे पाय धरले व आपल्या कृपेने मला दृष्टी आली ,आता मी माझे  आयुष्य आपल्या सेवेत घालावंणार आहे माझा आपण स्वीकार करा. 

एका वर्षी खूप मोठा दुष्काळ पडला  'करंडीचे साल' म्हणून प्रसिद्ध आहे.  अन्नपाण्यावाचून माणसे जनावरे मरून जात होती त्यावेळेला गावातील काही मंडळी महाराजांकडे आली व त्यांनी सांगितले आम्ही चार-पाच दिवसांपासून उपाशी आहोत.  काही खायला मिळेल का त्या वेळेला महाराज म्हणाले काही काळजी करू नका महाराजांच्या पत्नीने अन्न शिजवून दिले, परंतु घरी बायकापोरं  उपाशी असताना आम्ही कसे खाऊ.  त्याच वेळेला महाराना लोकांचे झालेल्या हाल पहावले नाही त्यांनी पत्नीच्या परवानगीने  घरावर तुळशीपत्र ठेवले लोकांना पाहिजे ते घेऊन जाण्यास सांगितले.  महाराजांचे सर्व घर दुष्काळग्रस्त नगर वासियांनी लुटून नेले त्यावेळेला महिपती महाराज म्हणाले मी गरीब झालो परंतु अंतर्यामी पूर्ण सुखी आहे.  त्यावेळेला पत्नीला महाराज म्हणाले हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे त्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे. 

ही बातमी जागीरदार यांना समजली त्या वेळेला त्यांना वाटले आपणही काही मदत करावी म्हणून त्यांनी महाराज यांची खूप तारीफ केली व बारा बैलगाडी भरून धान्य पाठवले त्याचा स्वीकार करावा.  परंतु महाराजांनी माफी मागितली व म्हणाले मला कोणाचीही मदतीची गरज नाही माझा पांडुरंग मला देण्यास भक्कम आहे .  ती मदत त्यांनी परत पाठवली आणि जागीरदार यांना भेटून म्हणाले आपण खरे अवलिया आहात माझा नमस्कार स्वीकारावा. 

एकदा एक कुष्ठरोगी त्यांच्याकडे आला व मला व्याधीमुक्त करा असे म्हणाला.  त्या वेळेला महिपती महाराजांनी  पांडुरंगाचे नामस्मरण करून पांडुरंगाच्या मूर्तीवर लोटाभर पाणी ओतले. त्या रोग्याला त्या पाण्याने तू आंघोळ कर म्हणून सांगितले.  महारोग्याने  त्या पाण्याने अंघोळ केली तर बघताबघता व्याधी मुक्त झाला ही बातमी गावातील लोकांना समजली तसे रोगग्रस्त माणसे स्नानासाठी महाराजांकडे येऊ लागली . महाराजांच्या कृपे मुळे  खूप रोगी बरे झाले . आजही महाराजांच्या  समाधीजवळ महाराजांनी बांधलेल्या विहिरीवर  समाधीचे दर्शन घेऊन अनेक भाविक आंघोळ करतात व व्याधीमुक्त होतात अशाप्रकारे आणखी काही चमत्कार महिपती महाराजांनी केले. ते म्हणजे राक्षसांना वाराणसीला शंकर भगवान कडे पाठवले व त्यांना मुक्ती दिली.  नागराजाला तामसगुण टाकून देण्यास   सांगून सर्पाला सदगती  मिळाली व त्याचा  उद्धार केला. कार्तिक वध्य  पक्षात महाराज आळंदीला गेले असता त्यांनी अजाण वृक्षा खाली बसून श्रद्धेने पारायण केले. ज्ञानेश्वर माऊलींनी लगेच प्रकट होऊन त्यांना दर्शन दिले व म्हणाले भगवंतांचा आपल्यावर वरदहस्त आहे  भक्तीची वर्णन करणारी आपली वाणी व लेखणी जगाला तारकच आहे. (क्रमशः)

Post a Comment

0 Comments