लालूंना सशर्त जामीन मंजूर, सुटकेचा मार्ग मोकळा

लालूंना सशर्त जामीन मंजूर,  सुटकेचा मार्ग मोकळा

वेब टीम रांची : चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगणारे दोषी, राष्ट्रीय जनता दल प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्रीलालू प्रसाद यादव यांना अखेर झारखंड उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. दुमका कोषागारातून १३.३ कोटी रुपये काढण्याच्या प्रकरणात त्यांना सशर्त जामीन मिळाला आहे. त्यामुळे, आता लालूंचा तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झालाय. सध्या, लालू दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत.

झारखंड उच्च न्यायालयानं अर्धी शिक्षा पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर लालूंना हा सशर्त जामीन मंजूर केला आहे. या दरम्यान त्यांना एक लाखांचा जात-मुचलकाही भरावा लागणार आहे. तसंच परवानगीशिवाय लालू देशाच्या बाहेर जाऊ शकणार नाहीत. आपला पासपोर्ट त्यांना जमा करावा लागणार आहे. लालूंना राहण्याचा पत्ता, मोबाईल क्रमांकही बदलण्याची परवानगी नसेल.

गेल्या काही महिन्यांपासून लालू प्रसाद यादव हे प्रकृती अस्वास्थ्यालाही सामोरे जात आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांकडून प्रकृती अस्वास्थ्याच्या कारण देत जामीन मिळवण्याची धडपड सुरू होती.

यापूर्वी लालूंना चारा घोटाळ्यातील आणखी तीन प्रकरणांत जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे दुमका प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर आता लालू प्रसाद यादव तुरुंगातून बाहेर येऊ शकतात. 

Post a Comment

0 Comments