देशात ५ दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा

देशात ५ दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा 

वेब टीम नवी दिल्ली : अनेक राज्यांकडून लस तुटवड्याची तक्रार समोर येत असताना आता केंद्राकडून आणखीन चिंताजनक माहिती समोर येतेय. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात ज्या वेगानं लसीकरण सुरू आहे त्यानुसार देशात केवळ देशात केवळ ५.५ दिवस पुरेल एवढा लस साठा उपलब्ध आहे. तसंच आणखी एका आठवड्याचा अतिरिक्त पुरवठ्यासाठी लसीचा साठा पाईपलाईनमध्ये आहे. अतिशय वेगानं फैलावणाऱ्या करोनाच्या पार्श्वभूमीवर ही धोक्याची घंटा ठरू शकते.

काही राज्यांकडून लसीचा तुटवडा भासत असल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी लसीच्या वितरणासंबंधी माहिती जाहीर केली. यामध्ये कोणत्या राज्याला किती लसींचे डोस दिले आणि राज्यांकडून किती प्रमाणात त्याचा वापर करण्यात आला. राज्यांच्या साठ्यात किती लस उपलब्ध आहे, याची माहिती देण्यात आलीय.

यानुसार, आंध्र प्रदेश आणि बिहारमध्ये दोन दिवसांपेक्षाही कमी दिवसांचा लस साठी उपलब्ध आहे. तर महाराष्ट्राकडे ४ दिवसांहून कमी लस साठी उपलब्ध आहे. हरयाणा, केरळ, तेलंगणा या राज्यांकडे १० दिवसांहून जास्त तर तेलंगणा आणि गोवा या राज्यांकडे २० दिवसांहून जास्त लस साठा उपलब्ध आहे. तामिळनाडू या राज्याकडे जवळपास ४५ दिवस पुरेल इतका लस साठा उपलब्ध आहे.

कोविड लस निर्यात करण्यावर कोणतीही बंदी नाही आणि देशातील आवश्यकता लक्षात घेऊन परदेशांना लसीचा पुरवठा सुरूच राहील, असं गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय. गेल्या आठवड्यात परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतानं शेजारील आणि मित्र देशांना कोविड-१९ विरुद्ध लढण्यासाठी ६.४४ कोटी डोस उपलब्ध केले आहेत.

Post a Comment

0 Comments