माय स्काय स्टार कंपनीने केलेल्या करोडो रुपयांच्या फसवणुकीबद्दल पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात तक्रार दाखल

माय स्काय स्टार कंपनीने केलेल्या करोडो रुपयांच्या फसवणुकीबद्दल पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात तक्रार दाखल

वेब टीम पिंपरी - चिंचवड :  माय स्काय स्टार या फसव्या कंपनीने राज्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये शहरी व ग्रामीण भागामध्ये वीस हजार रुपये  भरल्यानंतर दुचाकी गाडी मिळेल आणि वीस हजार रुपये भरणारे अन्य तीन सभासद एकत्र केले, तर गाडीचे सर्व हप्ते माय स्काय स्टार कंपनी फेडणार! अशा पद्धतीचे आमिष दाखवून पंचवीस हजाराहून जास्त नागरिकांना माय स्काय स्टार कंपनीचा मालक आकाश शिंदे आणि आणि त्याच्या साथीदारांनी करोडो रुपयांचा गंडा घातल्याचे नुकतेच समोर आले आहे.

 याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातील एका ज्येष्ठ नागरिकाने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयामध्ये यामध्ये नुकतीच एक लेखी तक्रार दाखल केली आहे. यातील मुख्य आरोपी आकाश शिंदे याने पुन्हा एकदा नव्याने कार्यालय थाटून लोकांना फसविण्याचा धंदा सुरूच ठेवला आहे याबद्दल पोलिस काही करणार आहेत की नाही? असा प्रश्न आता फसवणूक झालेले लोक विचारत आहेत. 

       रुग्ण हक्क परिषदेच्या अंतर्गत भारतीय ग्राहक आणि गुंतवणूकदार न्याय संघर्ष समितीच्या माध्यमातून सदर तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारी मध्ये पिंपरी-चिंचवड शहरामध्ये माय स्काय स्टार कंपनी नावाने कार्यालय निर्माण करून राज्याच्या कानाकोपऱ्यातील असंख्य नागरिकांना दुचाकी आणि दुचाकीचे हप्ते मोफत मिळवून देऊ अशी बतावणी करून करोडो रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. याबाबतीत भारतीय ग्राहक आणि गुंतवणूकदार न्याय संघर्ष समितीच्या वतीने येत्या आठवड्यात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयावर मोठ्या संख्येने ग्राहकांच्या सहभागाने मोर्चा काढला जाईल, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

           माय स्काय स्टार कंपनी मध्ये जाण्याची त्यांची फसवणूक झाली, त्यांनी खालील क्रमांकावर ९९२३६९३०८० आपल्या तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 

Post a Comment

0 Comments