उड्डाण पूलास स्व.दिलीप गांधी यांचे नांव देण्यासाठी

उड्डाण पूलास स्व.दिलीप गांधी यांचे नांव देण्यासाठी

आत्मदहन आंदोलन लेखी आश्‍वासनाने मागे 

वेब टीम नगर : शहरातील नियोजित उड्डाण पूलास माजी केंद्रीय मंत्री स्व. दिलीप गांधी यांचे नांव देण्याच्या मागणीसाठी नरेंद्र मोदी आर्मीचे पारनेरचे तालुकाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी शिवजयंती दिनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. उड्डाणपुलास सदर नाव देण्यासाठीचा प्रस्ताव भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांना कळविले असल्याचे लेखी पत्र दिल्याने आंबेडकर यांनी ३१ मार्चचे आत्मदहन मागे घेतले. तसेच भविष्यात सदर उड्डाणपुलाला स्व. गांधी यांचे नांव न दिल्यास पुर्वसुचना न देता आत्मदहनाचा इशारा दिला आहे.   

माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांनी भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहून शहराच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांनी आयुष्यभर गोरगरीबांचे आश्रू पुसण्याचे व वंचितांचे प्रश्‍न सोडवण्याचे कार्य केले. जिल्ह्यासह महाराष्ट्रातील जनतेला त्यांचे योगदान ज्ञात आहे. शहरात उड्डाण पूल व्हावे ही त्यांची इच्छा होती. त्यांनी शेवट पर्यंत उड्डाण पूल होण्यासाठी केंद्र सरकारला वेळोवेळी पाठपुरावा केला होता. शहरातील उड्डाणपूल होण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे.  या उड्डाणपुलास त्यांचे नाव द्यावे ही जनसामान्यांची मागणी असल्याने नरेंद्र मोदी आर्मीच्या वतीने रघुनाथ आंबेडकर यांनी सदर मागणी केली होती.

 भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणचे प्रकल्प संचालक दिवान यांनी सदर मागणीचे पत्र भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांना यांच्याकडे पाठविलेला असून, मंजुरी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाहीचे आश्‍वासन दिल्याने आंबेडकर यांनी आत्मदहन आंदोलन मागे घेतले. तर सदर मागणीसाठी युवा नेते सुवेंद्र गांधी, प्रकल्प संचालक दिवान यांच्यासह केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments