महिलेवर चाकू हल्ला करून सीए ची आत्महत्या

 महिलेवर चाकू हल्ला करून सीए ची आत्महत्या

 वेब टीम ठाणे : महिलेवर चाकूने वार करत सीएने हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याचा प्रकार ठाण्यातील बाळकूम नाका परिसरात घडला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिलेला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मृत सीएविरुद्ध कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

आत्महत्या करणारा सीए ५४ वर्षाचा असून तो कल्याणमधील वायलेनगरमध्ये राहत होता. तसेच तो विवाहित आहे. त्याची ठाण्यातील ३३ वर्षीय महिलेशी ओळख होती.  बाळकूम नाका येथील एका हॉटेलमध्ये भाड्याने खोली घेतली होती. याठिकाणी त्यांच्यात वाद झाले. आणि सीएने महिलेवर चाकूने वार केले. त्यानंतर सीएने हॉटेलच्या खिडकीमधून उडी मारत आत्महत्या केली. हा प्रकार २३ मार्च रोजी सायंकाळी घडला असून सीएच्या हल्ल्यामध्ये महिला गंभीर जखमी झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनेच्या ठिकाणी धाव घेतली होती. महिला सीएकडे पैशाची मागणी करत होती, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. याबाबत पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments