आरोग्य आहार : काश्मिरी दम आलू

 आरोग्य आहार : काश्मिरी दम आलू

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बऱ्याच घरात कांदा लसूण खात नाही .आपण कांदा लसूण चा वापर न करता देखील चविष्ट दम आलू बनवू शकता. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.

साहित्य:

१/२ किलो लहान बटाटे, १ कप दही,३ चमचे काश्मिरी लाल तिखट,३/४ कप मोहरीचे तेल, चिमूटभर हिंग,१ दालचिनी,१ तमालपत्र , २लवंगा, १ मोठी वेलची, काळेमिरे, १ चमचा जिरे,१ चमचा सुंठपूड , शोप,मीठ चवीप्रमाणे .

कृती :

सर्वप्रथम लहान बटाटे स्वच्छ करून धुवून,अर्धा चमचा मीठ पाण्यात घालून उकळवून घ्या. कुकर मध्ये उकळवत असाल तर १ शिट्टी घेऊन गॅस बंद करा. बटाटे थंड झाल्यावर सोलून घ्या आणि टूथपिक ने छिद्र करा. आता एका कढईत तेल तापत ठेवा आणि त्या तेलात बटाटे तळून घ्या.

आता एका भांड्यात दही फेणून घ्या आणि एका वाटीत लाल तिखट घ्या त्याच्यात पाणी घालून पेस्ट बनवून घ्या. कढईत दोन चमचे तेल घालून हिंग, तिखटाची

पेस्ट आणि पाणी घाला.उकळी येऊ द्या. या मध्ये फेणलेले दही घाला आणि सतत ढवळत रहा हळू हळू पाणी घाला. या मध्ये १ चमचा शोप घाला .या मध्ये लवंग,काळी मिरी ,मोठी वेलची,तमालपत्र,दालचिनी,जिरे,सुंठपूड,घाला. आतातळलेले बटाटे घालून हळुवार ढवळा. मीठ घालून उकळी येऊ द्या. काश्मिरी दम आलू खाण्यासाठी तयार. आपण गरम गरम दम आलू

हे पोळी सह सर्व्ह करा.



Post a Comment

0 Comments