दोन खूनाचे व दरोड्याचे गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
वेब टीम नगर : दि. १८/०१/२०२० रोजी हॉटेल मालक आशिष चंद्रकांत कानडे, वय- ३९ वर्षे, रा. कळंब, ता- आंबेगांब, जि- पुणे हे त्यांचे मालकोचे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग नं. ६० लगत घारगांव शिवारात असलेल्या हॉटेल प्राईडमध्ये झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे हॉटेलचे पाठीमागील जाळीची साखळी व कुलूप तोडून हॉटेल मालक आशिष चंद्रकांत कानडे यांचा खून करुन हॉटेलमधील ४०,००० रु. रोख रक्कम व दारुच्या बाटल्या दरोडा टाकून चोरुन नेल्या होत्या. सदर घटनेबाबत फिर्यादी सुनिल बळीराम पवार, वय- ४९ वर्षे, धंदा- वेटर, रा. सिंदखेडा, जि- धुळे यांनी घारगांव पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. 1 २४/२०२०, भादवि कलम ३०२, ३९७, ३९४, ४५९२ प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता.
हा गुन्हा यापुर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणून आरोपी नामे सगड्या उंबऱ्या काळे, वय- ३५ वर्षे, रा. सुरेगांव , ता- श्रीगोंदा या ताब्यात घेवून घारगांव पो.स्टे. ला हजर केलेले आहे. सदर गुन्हा दाखल झाल्यनंतर याच गुन्ह्यातील आरोपी मिथून उंबऱ्या काळे हा फरार झालेला होता. हा फरार आरोपीचा शोध घेणेकामी पोलीस अधीक्षक , अहमदनगर यांचे आदेशाने अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यांनी स्वतंत्र पथकाची नेमणूक केली होती. त्याप्रमाणे पथकातील पोहेकॉ दत्तात्रय हिंगडे, पोना सुनिल चव्हाण, पोहेकॉ बबन मखरे, पोनाआण्णा पवार, पोकॉ जालिदर माने, आकाश काळे, चालक पोहेकॉ संभाजी कोतकर असे फरार आरोपीचा शोध घेत असताना पोनि अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली कि, फरार आरोपी मिथून काळे सुरेगांव , ता- श्रीगोंदा येथे त्याचे घरी आला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांनी सुरेगांव येथे जावून आरोपीचे वास्तव्याबाबत गोपनिय माहिती काढून सापळा लावून आरोपी नामे मिथून उंबऱ्या काळे, वय- २२ वर्षे, रा. सुरेगांव शिवार, ता- श्रीगोंदा यांस ताब्यात घेतले.
आरोपी मिथून उंबऱ्या काळे याचे विरुध्द सुपा पो.स्टे. येथे गुरनं. 1 २८१/२०१९, भादवि कलम ३०२, ३६३ वगेरे प्रमाणे दाखल असून सदर गुन्ह्यात नमुद आरोपी फरार असल्याने त्यांस सुपा पो.स्टे. येथे हजर करण्यात आलेले आहे. पुढील कार्यवाही सुपा पो.स्टे. करीत आहे. अशा प्रकारे दोन खूनाचे गुन्ह्यामध्ये फरार असलेला आरोपी जेरबंद करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई मनोज पाटील, पोलीस अधीक्षक, . सौरभ कुमार अग्रवाल , अपर पोलीस अधीक्षक, अजित पाटील , उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग, अ.नगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
0 Comments