गौतम हिरणचे मारेकरी जेरबंद

 गौतम हिरणचे मारेकरी जेरबंद  

वेब टीम श्रीरामपूर : दि०१/०३/२०२१ रोजी बेलापूर , ता . श्रीरामपूर येथील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण हे त्यांचे बेलापूर येथील दुकान बंद करुन मोटार सायकलवरुन सायंकाळी ७ वा . चे सुमारास बोराबके नगर , श्रीरामपूर येथील घरी जाण्यासाठी निघाले असता कोणीतरी अज्ञात इसमांनी त्यांचे अपहरण केले होते .

त्याबाबत गौतम हिरण यांचे भाऊ पंकज झुंबरलाल हिरण , वय- ४५ वर्षे , रा . बोरावके नगर , वार्ड नं . ७ , श्रीरामपूर यांनी श्रीरामपूर शहर पो.स्टे . येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं . 1 १३७/२०२१ , भादवि कलम ३६३ प्रमाणे दाखल करण्यात आला होता . त्यानंतर अपहरणकर्त्यांनी गौतम हिरण यांची हत्या करुन त्यांचे प्रेत श्रीरामपूर ते वाकडी जाणारे रोडवर यशवंत चौकी परिसरात आणून टाकल्याने दि. ०७/०३/२०२१ रोजी अपहरणकर्त्या विरुध्द वरील नमुद गुन्ह्यात भादवि कलम ३०२ , २०१ ही वाढीव कलमे लावण्यात आली होती .

हा  गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेवून  प्रताप दिघावकर  , विशेष पोलीस महानिरीक्षक , नाशिक परिक्षेत्र , नाशिक , मनोज पाटील  , पोलीस अधीक्षक , अहमदनगर ,  दिपाली काळे  , अपर पोलीस अधीक्षक , श्रीरामपूर यांनी सदरचा गुन्हा घडले ठिकाणी भेट देवून सदर गुन्ह्याचे तपासकामी वेगवेगळी पथके तयार करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणून आरोपींचा शोध घेणे बाबत सुचना दिल्या होत्या .

त्याप्रमाणे अनिल कटके , पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांनी त्यांचे मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके तयार करुन स्वत : पथकाचे नेतृत्व करुन गुन्ह्याचा तपास सुरु केला . सदर गुन्ह्यातील आरोपींनी गुन्हा करताना कोणताही पुरावा मागे राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेतलेली होती 

तसेच श्रीरामपूर शहर हे मोठी व्यापारी बाजारपेठ असल्यामूळे व गुन्हा घडलेल्या कालावधीमध्ये व त्यानंतरचे कालावधीमध्ये श्रीरामपूर येथे मोठ्या प्रमाणात लोकांची ये – जा झालेली असल्यामूळे आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते .

अशा परिस्थितीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामधील अधिकारी व अंमलदार यांनी सहा दिवस अहोरात्र मेहनत घेवून तांत्रीक विश्लेषणाचे आधारे काही संशयित इसम निष्पन्न करुन त्यांचेवर लक्ष केंद्रीत करुन प्रथम १ ) संदीप मुरलीधर हांडे , वय- २६ वर्षे , रा . माळेगांव , ता- सिन्नर , जि . नाशिक यांस नाशिक येथून ताब्यात घेतले .

पुढील तपासामध्ये आरोपी नामे ( २ ) जुनेद उर्फ जावेद बाबु शेख वय २५ वर्षे , रा . सप्तश्रृंगीनगर , नायगांव रोड , सिन्नर जि . नाशिक , ( ३ ) अजय राजू चव्हाण वय २६ वर्षे रा . पास्तेगांव , मारुती मंदीरासमोर , सिन्नर , जि . नाशिक ( ४ ) नवनाथ धोंडू निकम , वय- २ ९ वर्षे , रा . उक्कडगांव , ता- कोपरगांव , जि- अहमदनगर व एक २२ वर्षीय आरोपी यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले .

वरील  आरोपी श्रीरामपूर शहर पो.स्टे . येथे हजर करण्यात आले असून तपासी अधिकारी  संदीप मिटके , उपविभागीय पोलीस अधिकारी , श्रीरामपूर विभाग यांनी तपासामध्ये आरोपीताकडून मयत गौतम हिरण यांचा रियल – मी कंपनीचा मोबाईल तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली मारुती व्हॅन क्रं . मारुती न नं . एम एच – १५ – जी एल - ४३८७ असा मुद्देमाल भारतीय पुरावा कायदा कलम २७ प्रमाणे जप्त केलेला आहे .

पुढील तपास  संदीप मिटके , उपविभागीय पोलीस अधिकारी , श्रीरामपूर विभाग हे करीत आहेत . सदरची कारवाई मनोज पाटील  , पोलीस अधीक्षक , अहमदनगर ,  दिपाली काळे  , अपर पोलीस अधीक्षक , श्रीरामपूर व . संदीप मिटके साहे , उपविभागीय पोलीस अधिकारी , श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके व त्यांचे पथकातील सपोनि मिथून घुगे , पोसई गणेश इंगळे , सफौ सोन्याबापु नानेकर , पोहेकॉ मनोहर गोसावी , दत्तात्रय गव्हाणे , विजयकुमार वेठेकर , संदिप घोडके , विश्वास बेरड , पोना  शंकर चौधरी , विशाल दळवी , रवि सोनटक्के , विजय ठोंबरे , सचिन आडबल , संतोष लोढे , ज्ञानेश्वर शिंदे , दिपक शिंदे , विशाल गवांदे , पोकॉ  योगेश सातपूते , संदीप दरंदले , रविन्द्र धुंगासे , शिवाजी ढाकणे , सागर ससाणे , मयूर गायकवाड , मेघराज कोल्हे , राहूल सोळंके , रोहीत येमूल , आकाश काळे , चालक हेकॉ . उमाकांत गावडे पोना भरत बुधवंत , अर्जून बडे , चा . पोहेकॉ  बबन बेरड , चंद्रकांत कुसळकर तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालय , श्रीरामपूर सायबर सेल येथील पोना फुरकान शेख , पोकॉ प्रमोद जाधव यांनी केलेली आहे .

Post a Comment

0 Comments