ग्रामीण भागातल्या महिलांना उद्योजक बनविणाऱ्या निर्मलाताई मालपाणी

 



                   "स्वयंसिद्धा"

ग्रामीण भागातल्या  महिलांना उद्योजक बनविणाऱ्या निर्मलाताई मालपाणी  

 सहकार चळवळीतून राज्यात खेडोपाड्यात व्यवसायाचे जाळे उभे राहिले.  पतसंस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली.  त्याचबरोबर बचत गटाच्या माध्यमातून स्त्रियांच्या आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरणाला सुरुवात झाली. बचत गटांचे जाळे खेडोपाड्यात पर्यंत पोहोचले जिल्ह्यातील बचतगटांच्या चळवळीला ज्या महिलांमुळे बळ मिळालं त्यात निर्मला मालपाणी यांचा सिंहाचा वाटा आहे. 

2000 सारी शरद पवार यांनी राज्यातून २५ महिलांची टीम जया अरुणाचलम यांच्याकडे पाठवली.  तेथे या महिलांना ,महिलांचे संघटन कसे करावे, महिलांनी कोणते उद्योग करावे ,त्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ कोठून उभे करायचे याबाबतचे तीन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.  मग या महिलांनी महाराष्ट्रात राज्य महिला विकास सहकारी पतसंस्था फेडरेशन च्या माध्यमातून बत्तीस संस्था उभ्या केल्या.  सुप्रिया सुळे यांनी यशस्विनी सामाजिक अभियान हे खास बचत गटांचे अभियान सुरू केले.  पुण्याच्या माजी महापौर राजलक्ष्मी भोसले या त्याच्या अध्यक्ष तर निर्मला मालपाणी उपाध्यक्ष आहेत. बघता-बघता बचत गटाच्या चळवळीच्या वृक्षाची पाळंमुळं खेड्यापाड्यापर्यंत पोहोचू लागली.  उत्तर महाराष्ट्र विभागाच्या नगर, नाशिक ,धुळे ,जळगाव ,नंदुरबार जिल्ह्याच्या समन्वयकपदी निर्मलाताई मालपाणी यांची वर्णी लागली. 

नुसते बचत गट स्थापन करण्या पेक्षा त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण संकुलात प्रदर्शन भरविण्यात आले . तेथे निर्मलाताईंच्या बचत गटांनी उत्पादित केलेल्या गव्हाच्या कोंड्याच्या पापड्याची मोठ्या  प्रमाणात विक्री झाली . अर्थात त्यांना जवळपास पाच हजार  किलोची ऑर्डर मिळाली कायमस्वरूपी बाजार मिळण्यासाठी सुप्रिया सुळेंनी बिग बाजार अशी करार केला.  प्रत्येक 'बिग बाजार' च्या शाखेत 'स्वाद महाराष्ट्राचा' हा ब्रँड सुरू केला.  यशवंतराव चव्हाण संकुलातील प्रदर्शना प्रमाणेच अन्य जिल्ह्यातही प्रदर्शने भरविण्यात आली.  त्यातही सिंहगड, पुणे येथील प्रदर्शनांत  निर्मलाताई मालपाणी यांना निरीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली.  सुनंदा पवार यांच्या भीमथडी जत्रेतही यशस्विनीच्या महिलांनी सहभाग घेतला.  भाकरी - आमटी -थालपीठ आणि अन्य पदार्थांना  मोठी मागणी मिळू लागली.  साईज्योती यात्रेमध्ये यशस्वीनी  बचत गटाचे पंचवीस स्टॉल्स असतात.  या बचत गटातील महिला आता स्वतःच्या पायावर उभे राहून व व्यावसाय करत आहेत.  पंचायत समितीच्या माध्यमातूनही 'उमेद' बचत गट चालविले जातात, अशी चळवळ फोफावू  लागली तसतशी आर्थिक चणचण भासायला लागली, त्यामुळे विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना बचत गटांना चार टक्के इतक्या अल्प दरात कर्ज पुरवठा करण्याचा ठराव केला, त्यामुळे ही चळवळ आणखीनच जोमाने रुजली. 

लहान गावापासून ते मोठ्या गावात बचत गटाचे जाळे पसरले महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हायला लागल्या . दहा महिलांचा बचत गट करायचा आणि व्यवसाय करायचा.  कोणा महिलेवर रात्री-अपरात्री काही प्रसंग गुदरला तरी त्यांना हक्काचे पैसे उपलब्ध झाल्याने त्या वेळ निभावू शकतात.  लोणचे, पापड, कुरडया या पारंपारिक उत्पादनाबरोबरच बाकीचे उद्योगही त्या करू लागल्या आहेत . कोरोना प्रादुर्भावाच्या  काळात अनेक बचत गटांनी लाखो मास्क शिवू न व्यवसाय केला, तर प्लास्टिकच्या पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचा पर्याय उपलब्ध करून दिला.  महिलांसाठीच्या कपड्यांचे उत्पादन सुरू केले.  अनेक ठिकाणी फळांवर प्रक्रिया करून जाम, जेली ,आवळा कॅन्डीची ही उत्पादने घेतली जातात, या माध्यमातून महिलांमध्ये उद्योजिका बनण्याची वृत्ती निर्माण झाली, याची पावती म्हणून 'यशस्विनी' या पुरस्काराने निर्मला ताईंना गौरविण्यात आले . मात्र एवढ्यावरच न थांबता यशस्विनी आणि खादी ग्रामोद्योगाच्या माध्यमातून निर्मला ताईंनी १००महिलांचा प्रशिक्षण वर्ग चालवला.  जिल्ह्यात त्यांचे एक हजारच्या आसपास बचत गट असून या बचत गटांच्या माध्यमातून  महिलांना एकत्र राहण्याची सवय झाली.  त्यामुळे ग्रामीण भागातील बचत गटांना शासनाच्या पोषण आहाराच्या योजनेचे काम मिळू लागले . साईज्योती प्रदर्शनात प्रत्येक बचत गट लाख ते दोन लाख रुपयांची उलाढाल करू लागला अगदी अलीकडे 'उमेद ' च्या माध्यमातून बांधकाम, सॅ निटरी  वेअर ची दुकानेही उघडली गेली आहेत, जेणेकरून बचत गटातील महिलेला आता घर बांधताना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, एवढेच नव्हे तर जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या माध्यमातून कार्यालयीन कामकाजासाठी लागणाऱ्या फाईल व अन्य सामग्री तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना लागणारे गणवेष  त्याची खरेदी स्थानिक बचत गटा कडूनच करावी अशी मागणी निर्मलाताई मालपाणी  या महिला दिनी करणार आहेत. 

निर्मलाताई मालपाणी यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना शासकीय- अशासकीय पुरस्कारांनी वेळोवेळी गौरविण्यात आलं  आहे.  जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धारी या उक्तीप्रमाणे आता जिच्या हाती गावची दोरी ती गावाला उद्धारी या न्यायाने शरद पवारांनी राजकारणात महिलांना 33 टक्के जागा दिल्याने आता महिला सरपंच, नगराध्यक्ष, महापौर अशी पदे भूषवित आहेत.  महिला प्रामाणिक असल्याने ते चांगले काम करू शकतात हा विश्वास महिलांनी सार्थ करून दाखवला आहे.  या महिला दिनापासून महिला सुरक्षा अभियान सुरू करणार असून पोलिस अधीक्षकांपासून ते पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांपर्यंत सर्व ठिकाणी महिलांच्या बाबतीत घडणाऱ्या अत्याचाराच्या घटनांची माहिती घेऊन पोलिस कारवाई वर लक्ष ठेवणार असल्याचे सांगतानाच महिलांनी महिलांची बदनामी करू नये ,कोठेवाडी कोपर्डी सारख्या घटनांमध्ये आम्ही  सातत्याने आवाज उठविला आणि उठणार आहोत असा निर्धार निर्मला ताईंनी व्यक्त केला. 


Post a Comment

0 Comments