छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या 

वेब टीम नगर : अहमदनगर शहरांमधील तपोवन रोडवरील साई नगर येथे आपल्या सासरी होणाऱ्या छळास कंटाळून एका २४ वर्षीय विवाहितेने आपल्या घरांमधील बाथरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 

प्रतिमा दीपक दाणे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे या प्रकरणी प्रतिमा हिचे वडील भानुदास शंकरराव कोरडे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पती दीपक प्रभाकर दाणे व सासरा प्रभाकर रामदास दाणे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की दीपक दाणे हा प्रतिमा  हिला दारू पिऊन मारहाण करत होता . तसेच तीन मार्च रोजी गावी जाण्याचा कारणावरून प्रतिमा हिला दीपक व प्रभाकर यांनी मारहाण व शिवीगाळ करून आत्महत्येस प्रवृत्त केले असे या फिर्यादीत म्हटले आहे . याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण सुरसे पुढील तपास करत आहे. 

Post a Comment

0 Comments