मूलमंत्र आरोग्याचा : योगसाधना , आरोग्य आहार

 मूलमंत्र आरोग्याचा 

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

योगसाधना : ऊर्ध्व प्रसारित एकपादासन 

ऊर्ध्व म्हणजे सरळ उभा,वरचा किंवा उंच. प्रसारित म्हणजे पसरलेला किंवा ताणलेला. हे आसन एका पायावर उभा राहून पुढे वाकून जाणीव दुसरा पाय वरच्या दिशेने जास्तीत जास्त उंची पर्यंत नेऊन करायचे असते. 

पद्धती :   

१. ताडासनात उभे राहा 

२. श्वास सोडा व धड खाली वाकवा. डाव्या हाताने उजव्या घोट्याची मागची बाजू पकड , उजवा हात उजव्या पावलाच्या शेजारी जमिनीवर टेकवा आणि डोके किंवा हनुवटी गुडघ्यावर विसावु द्या. 

३. डावा पाय उचलून हवेमध्ये जास्तीत जास्त उंच उचलून धरा. दोन्ही गुडघे घट्ट आवळून धरा.उचलेल्या पायाची बोटे वरच्या दिशेला असूद्यात. पायाची बोटे सरळ समोर रोखलेली राहावीत, बाजूला वाकू नयेत, यासाठी दोन्ही पाय ताठ ठेवावेत. 

४. या स्थितीत समतोल शवसं करत सुमारे २० सेकंद रहा. श्वास घ्या. दावा पाय जमिनीवर आणा आणि पुन्हा ताडासनात या. 

५. आता डावा पाय जमिनीवर आणि उजवा पाय हवेत ठेवून दुसऱ्या बाजूने हेच आसन पुन्हा करा. दोन्ही बाजूंकडील आसनांमध्ये सारखाच वेळ रहा. 

परिणाम : 

या आसनांमुळे पायांचे स्नायू सुदृढ बनतात आणि कमरेच्या भागाचा मेद कमी होतो. 


-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आरोग्य आहार : मूगाच्या डाळीचा हलवा 

साहित्य : 

मुगाची डाळ १ वाटी,पाऊण वाटी साजूक तूप,पाव किलो खवा, २ वाट्या दूध, २ वाट्या साखर, ५,६ वेलदोड्यांचंही पूड, केशर किंवा केशरी रंग, बदामाचे काप आणि बेदाणे. 

कृती : 

१.मुगाची डाळ ४-५ तास भिजवून ठेवावी व भिजल्यावर पनू उपसून डाळ बारीक वाटावी. 

२.जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून डाळ घालून मंद आचेवर सतत ढवळावे. 

३.डाळ गुलाबी रंगावर भाजावी. भाजत आली कि तूप सुटू लागते 

४.डाळ भाजली गेली कि दूध घालावे व मंद आचेवर वाफ येऊन डाळ शिजू द्यावी. 

५.शिजलेल्या डाळीत खवा घालून चांगले परतावे. हे मिश्रण आळत आले कि त्यात साखर घालून परतावे. 

६. सखाहर घातल्यावर खमंग परतावे. परततांना तूप सुटायला लागले पाहिजे. 

७ वेलची पूड, बादमचही काप व बेदाणे घालून उतरवावे. 

टीप : डाळ भाजताना जास्त काळजी घ्यावी, पातेल्याच्या बुडाला डाळ लागत काम नये.          

                    

Post a Comment

0 Comments