दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

 दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद 

वेब टीम श्रीरामपूर :  दरोड्याच्या  तयारीत  असणारे व चैन स्नँकिंग करण्यात  पटाईत गुन्हेगारांची टोळी हत्यारासह अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली. रियाज शफी शेख (वय २४रा. वार्ड नंबर६ बसस्टॅन्डमागे श्रीरामपूर), आजम नसीर शेख (वय २८, रा. गोपीनाथनगर साई भुयारीमार्गसमोर वॉर्ड नंबर २ श्रीरामपूर), करण अनिल अवचिते (वय२२, रा. श्रीरामपूर बस स्टॅन्डमागे वार्ड नं.६ श्रीरामपूर ), दानिश अयुब पठाण (वय २० रा. एकतानगर संगमनेर ता. संगमनेर), बाबर जानमोहमंद शेख (वय ४५ अचानकनगर झोपडपट्टी वार्ड नंबर १ श्रीरामपूर) असे पकडण्यात आलेले यांची नावे असून बल्ली उर्फ बलीराम यादव ( रा. श्रीरामपूर) हा आरोपी फरार झाला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, मिळालेल्या माहितीनुसार पो.नि.अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना दिल्या. त्यानुसार श्रीरामपूर येथील नाॅर्दन ब्रँच जवळील भुयारी रेल्वे मार्गाजवळ पोलिसांनी सापळा लावून ही कारवाई केली यावेळी अंधाराचा फायदा घेत एक एक जण फरार झाल्यात आहे दरम्यान, पकडण्यात आलेल्या आरोपींची पंचासमस्या अंगझडती घेतली असता, स्टीलचा सुरा, लोखंडी कत्ती, स्टीलचा चाकू, एक लोखंडी कटावणी, मिरचीपूड, चार मोबाईल, एक विना क्रमांकाची डिलक्स दुचाकी, एक्टिव्ह मोपेड दुचाकी असा एकूण १ लाख ३हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सराईत गुन्हेगार शफी शेख याच्यावर श्रीरामपूर, तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आजम नसीर शेख याच्यावर मनमाड रेल्वे पोलीस स्टेशन, नाशिक रोड पोलीस स्टेशन, नेवासा, श्रीरामपूर येथे गुन्हे दाखल आहेत. बाबर जानमहंमद शेख याच्यावर श्रीरामपूर, कोतवाली पोलिस ठाण्यात तर करण अनिल अवधिते याच्यावर तोफखाना, श्रीरामपूर, कोपरगाव, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिशिरकुमार देशमुख, सफौ नानेकर, पोहेकाँ भाऊसाहेब काळे, विजयकुमार विटेकर, मनोर गोसावी, पोना ज्ञानेश्वर शिंदे, विशाल दळवी, शंकर चौधरी, विजय ठोंबरे, चापोना चंद्रकांत कुसळकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments