जिल्हा बँकेवर थोरातांचे वर्चस्व

 जिल्हा बँकेवर थोरातांचे वर्चस्व 

वेब टीम नगर : जिल्हा बँकेचे सोसायटी मतदार संघातील तीन आणि बिगरशेती मतदारसंघातील १ जागांसाठी झालेल्या  निवडणूतिच्या माता मोजणी कडे अख्ख्या जिल्ह्याचे लक्ष लागलेले होते . त्यात शिवाजी कर्डीले ,अंबादास पिसाळ ,उदय शेळके ,प्रशांत गायकवाड हे निवडून आले.   २१ पैकी १७ जागा आधीच बिनविरोध झालेल्या  आहेत.त्यामुळे जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे.  

आजच्या मतमोजणीत कर्जत मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे जोरदार चुरस दिसून आली. विखे गटाच्या अंबादास पिसाळ यांना३७ मते मिळाली, तर राष्ट्रवादीच्या मीनाक्षी साळुंके यांना ३६ मते मिळाली. साळुंके यांच्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोठी ताकद लावली होती. त्यांना अवघ्या एका मताने पराभवाचा सामना करावा लागला.सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातील तीन जागांवर माजी मंत्री शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे उदय शेळके व विखे गटाचे अंबादास पिसाळ हे विजयी झाले. उदय शेळके व शिवाजी कर्डिले यांनी एकतर्फी विजय मिळवला. पारनेर मतदारसंघातून उदय शेळके यांना १०५ पैकी तब्बल ९९ मते मिळाली.विरोधी असलेल्या शिवसेनेच्या भोसले यांना अवघी ६ मते मिळाली. नगर तालुका मतदारसंघातून १०९ मतदारांपैकी शिवाजी कर्डिले यांना ९४ मते मिळाली, तर सत्यभामाबाई बेरड यांना १५ मते मिळाली. या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांचा एक तर्फी विजय झाला.जिल्हा बँकेच्या बिगर शेती मतदारसंघातून गायकवाड यांना ७६३ तर विरोधी पानसरे यांना ५७४ मते मिळाली यात जिल्हा बँकेचे संचालक व श्रीगोंद्यातील दत्तात्रय पानसरे यांचा दारुण पराभव झाला आहे, पारनेर चे प्रशांत गायकवाड यांनी तब्बल १८९ मतांनी पानसरे यांचा पराभव केला आहे.

जिल्हा बँकेत  मंत्री बाळासाहेब थोरात यांचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले आहेत . त्यामुळे बॅंकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला असून बॅंकेच्या अध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे .

Post a Comment

0 Comments