कॉ.बाबा आढाव यांचा व्हेलनटाईन डे च्या दिवशी वर्किंगक्लास लॉरिस्टर ऑफ इंडिया सन्मानाने होणार गौरव

 कॉ.बाबा आढाव यांचा व्हेलनटाईन डे च्या दिवशी वर्किंगक्लास लॉरिस्टर ऑफ इंडिया सन्मानाने होणार गौरव 

वंचित, दुबळे व श्रमिक कामगारांप्रती असलेली आस्था व प्रेमापोटी 

वेब टीम नगर :वंचित, दुबळे व श्रमिक कामगारांना न्याय मिळण्यासाठी संपुर्ण आयुष्य खर्च करणारे कॉ. बाबा आढाव यांना पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने व्हेलनटाईन डे च्या दिवशी रविवारी (दि.14 फेब्रुवारी) वर्किंगक्लास लॉरिस्टर ऑफ इंडिया हा सन्मान बहाल केला जाणार आहे. त्यांनी वंचित, दुबळे व श्रमिकांप्रती दाखवलेल्या प्रेमाबद्दल हा सन्मान सोहळा वर्चुअल पध्दतीने हुतात्मा स्मारक येथे पार पडणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

कॉ. बाबा आढाव यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन ठेऊन पुरोगामी विचाराचा प्रसार करुन समाजात जागृतीचे काय केले. समाजातील अस्पृश्यता कमी होण्यासाठी योगदान देऊन एक गाव एक पाणवठा ही संकल्पना राबवली. त्यांनी कष्टकरी, माथाडी, हमाल आदी असंघटित कामगारांना संघटित करुन चळवळीच्या माध्यमातून त्यांना न्याय देण्याचे कार्य केले. त्यांनी हमाल माथाडींसाठी कायदा करुन घेतला. भारत सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्याची गरज होती. मात्र जनता व श्रमिक कष्टकरी कामगारांच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील कष्टकरी कामगारांचे नेते स्व. शंकरराव घुले यांच्या स्मृतीस अभिवादन करुन कॉ. आढाव यांना वर्किंगक्लास लॉरिस्टर ऑफ इंडिया हा सन्मान प्रदान केला जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. कॉ. बाबा आरगडे, माजी कुलगुरु सर्जेराव निमसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सन्मान सोहळा होणार आहे. 

कॉ. बाबा आढाव यांनी नगर जिल्ह्यात स्व. शंकरराव घुले यांच्यासारखे कार्यकर्ते तयार केल्याने येथील श्रमिक कष्टकर्‍यांना न्याय मिळाला. स्व. घुले यांनी कामगार चळवळ व्यापक बनवली. तर मंडळ आयोगाच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष असलेले स्व. घुले कॉ. आढाव यांच्या सांगण्यावरुन स्वत: पत्र घेऊन घरी येतात. हा त्यांच्या मनातील मोठेपणा व चळवळीप्रती असलेला आदर व्यक्त होत असल्याची भावना अ‍ॅड. गवळी यांनी व्यक्त केली. 

Post a Comment

0 Comments