अ.भा.मराठी चित्रपट महामंडळ भरारी पथक समितीची स्थापना

अ.भा.मराठी चित्रपट महामंडळ भरारी पथक समितीची स्थापना 


सदस्यपदी अनंत रिसे,काशीनाथ सुलाखे पाटील, राम  पाटोळे तर महिला ब्रिगेड समिती सदस्यपदी  नंदा बागुल यांची निवडवेब टीम नगर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या विविध समितीवर अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील तालुका स्तरावर निवड जाहीर झाल्या असून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी

काशिनाथ सुलाखे पाटील नगर तालुका ,अनंत रिसे,राम पाटोळे अहमदनगर भरारी पथक समिती सदस्य तर नंदा बागुल महिला ब्रिगेड समिती सदस्य यांची निवड केली असून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अहमदनगर जिल्हा मुख्य समन्वयक शशिकांत नजान यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.नजान यांच्या शिफारशीनुसार सदर निवड झाल्या असून अ. भा.म.चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून सन्माननीय समिती सदस्यांनी मराठी चित्रपट क्षेत्राचा विकास होण्यासाठी तसेच शहरी आणि ग्रामीण भागातील कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सकारात्मक कार्य करावे असे मेघराज राजेभोसले यांनी शुभेच्छा देताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

      यावेळी शशिकांत नजान म्हणाले की अहमदनगर जिल्ह्यातील नाट्य-सांस्कृतिक आणि चित्रपट क्षेत्र दैदिप्यमान अशी वाटचाल करीत असून विविध वेबसिरीज, टीव्ही मालिका आणि चित्रपट निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष ,पदाधिकारी आणि संचालक यांनी ग्रामीण भागापर्यंत महामंडळाचे कार्य पोहोचविले आहे.प्रत्येक कलाकार तंत्रज्ञ तसेच चित्रपट क्षेत्रातील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन त्यांना न्याय आणि संधी देण्याचे महत्वपूर्ण कार्य करीत असून अहमदनगर जिल्ह्यातील सर्व समिती प्रमुख व सभासद हे कार्य अधिक प्रभावी आणि दर्जेदार करण्याचा प्रयत्न करतील.

         वरील सर्व समिती सदस्यांची पुणे कार्यालयातून निवड जाहीर झाल्यानंतर नजान यांच्या निवासस्थानी नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी जेष्ठ कलाकार .श्रेणीक शिंगवी,राहुल सुराणा,युवा दिग्दर्शक स्वप्नील नजान, उपस्थित होते.

       नवनिर्वाचित विविध समिती सदस्यांचे अ. भा.म.चित्रपट महामंडळ खजिनदार संजय ठुबे,सल्लागार अनिल गुंजाळ,जेष्ठ अभिनेते प्रकाश घोत्रे, निर्माते दिग्दर्शक अभिनेते बलभीम पठारे, नाट्य परिषद मुंबईचे सहकार्यवाह सतीश लोटके, रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर भरारी पथक सदस्य रघुनाथ आंबेडकर,संदीप रसाळ,बी.आर.गांडोळे, प्रशांत जठार,विराज मुनोत,वैभव पवार, प्रणिता पांडुळे-सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.


Post a Comment

0 Comments