मूलमंत्र आरोग्याचा : योगसाधना ,आरोग्य आहार

 मूलमंत्र आरोग्याचा 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

योगसाधना 
परिघासन

परिघासन म्हणजे दरवाजा बंद करण्यासाठी लावला जाणारा अडसर, या आसनात शरीर अडसरा  सारखे दिसते म्हणून याला हे नाव दिले आहे. 

 पद्धती :  

1) घोटे एकत्र जुळवून जमिनीवर गुडघे टेकवाउजवा पाय बाजूला लांबवा आणि तो धड व डावा गुडघा यांच्या रेषेत  ठेवा.उजवे पाऊल उजवीकडे वळवा,उजवा पाय गुडघ्याशी घट्ट आवळलेला असू द्या. 

2) श्‍वास घेऊन हात लांब असणारा दोनदा श्वास घ्या .

3)श्वास सोडा धड आणि उजवा हात लांबलेल्या उजव्या पायाकडे वळवा उजव्या हाताचा कोपरा पुढील भाग आणि उजवे मनगट अनुक्रमे उजव्या पायाची नडगी आणिघोटा यावर टेकवा.उजवा तळहात वर वळवलेला असू द्या,उजवा  कान  उजव्या दंडावर टेकला जाईल डावा हात डोक्यावरून घ्या आणि डावा तळहात उजव्यातळ हाताशी  जुळवा आता डावा खांदा दंडाला लागून राहिल.  

4) या स्थितीत नेहमीप्रमाणे श्वसन करत ३०ते ६० सेकंद राहा.

5) श्वास घ्या धड क्र.३ च्या स्थितीत आणा  आणि हात उजवा पाय जमिनीवर वाकवून गुडघे जमिनीवर टेकवा घोटे पुन्हा जुळलेले असू द्या. 

6) उजव्या बाजूची कृती डाव्या  बाजूने करत सर्व संपूर्ण आसन पुन्हा करा.दोन्ही बाजूकडील आसनांचा वेळ सारखाच असू द्या. 

 परिणाम: या आसनामुळे ओटीपोटी चा भाग ताणला जातो, पोटाची एक बाजू ताणलेली असते तर दुसरी बाजू वळविली जाते.  त्यामुळे पोटाचे स्नायू व अवयव सुस्थितीत राहतात आणि पोटावरील त्वचा सैल न पडता निकोप राहते.  पाठीच्या कण्याची कुशी कडे  होण्याची हालचाल करण्याचा त्रास असलेल्या लोकांना सहाय्यकारी होते. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आरोग्य आहार 
 फ्रूट चाट

 साहित्य : दोन केळी सोलून मध्यम तुकडे, दोन पेरू चिरून मध्यम तुकडे , थोडे द्राक्ष, एक मोठे सफरचंद सालासकट अथवा साल काढून मोठे तुकडे, जिरेपूड एक चमचा, अर्धा चमचा मिरपूड, एक लिंबाचा रस,  चवीनुसार मीठ, चाट मसाला. 

 कृती : सर्व फळांच्या एकसारख्या फोडी करून त्याला लिंबाचा रस जिरेपूड मिरपूड मीठ मसाला व चवीनुसार मीठ लावावे व सर्व करावे या फळा बरोबर थोड्या उकडलेल्या बटाट्याच्या फोडी व टोमॅटोच्या फोडी घातल्या तरी चांगले लागते. 

Post a Comment

0 Comments