मूलमंत्र आरोग्याचा : योगसाधना, आरोग्य आहार

 मूलमंत्र आरोग्याचा 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

योगसाधना 
प्रसारित पादोत्तानासन - दोन 

आधीच्या आसनाच्या  हा पुढला टप्पा आहे या आसनात  तळहात जमिनीऐवजी  कमरेवर ठेवले जातात किंवा पार्श्वोत्तानासनात  सांगितल्याप्रमाणे पाठीमागे नमस्कार प्रमाणे जुळवलेले असतात . या कृतीमुळे पायांचा ताण अधिक वाढतो 

परिणाम : या आसनामुळे गुडघ्यातील शिरा आणि अवयव वर उचलणारे स्नायू पूर्णपणे विकसित होतात, त्याच वेळी धड आणि डोके यांच्याकडे रक्त प्रवाह वाहू लागतो.  ज्या लोकांना शीर्षासन करणे शक्य नसते त्यांना या असतानापासून फायदा होईल या आसनाने पचनशक्ती वाढते वर वर्णन केलेली उभे राहून करण्याची आसने  नवशिक्यांसाठी आवश्यक आहेत . अभ्यासकांची पुढे प्रगती होऊ लागली म्हणजे त्याच्या अंगी अधिक लवचिकपणा येऊ लागतो आणि मग उभे राहून करण्याचे आसने  केली नाही तरी चालते, तरी ही आसने  आठवड्यातून एकदा  करणे हिताचे असते.  उभे राहून करण्याच्या सर्व आसनामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

आरोग्य आहार 
 स्प्राऊट चाट 

साहित्य : वाफवलेले मिक्स कडधान्य २ वाट्या, मिरची पेस्ट १ चमचा,मीठ, बारीक शेव,बारीक चिरलेला कांदा,२ बटाटे उकडून ,लिंबूरस,खारे दाणे,थोडा चाट मसाला. 

कृती : एका बाउल मध्ये मिक्स कडधान्ये घेऊन त्यात मीठ , मिरची पेस्ट, लिंबाचा रस घालावा. सर्व्ह करतांना उकडलेल्या बटाटाचे काप, खारे शेंगदाणे, आणि कांदा घालावा वरून चाट मसाला आणि बारीक शेव घालून सर्व्ह करावा.        

Post a Comment

0 Comments