नगरटुडे बुलेटीन 03-02-2021

 नगरटुडे बुलेटीन 03-02-2021

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अनाम प्रेम संस्थेचे कार्य नगर शहराचा नावलौकिक वाढविणारे 

किरण काळे : ना. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस बळकटीकरण सप्ताहाचा शुभारंभ 

वेब टीम नगर  : दिव्यांग मुलांसाठी मागील पंधरा वर्षांपासून नगर शहरामध्ये अनाम प्रेम संस्था काम करत आहे. स्नेहलयाच्या माध्यमातून प्रेरणा घेत सुरू केलेल्या कामाचा आज वटवृक्ष झाला असून अनामप्रेमचे कार्य हे नगर शहराचा देशामध्ये नावलौकिक वाढविणारे आहे, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. 

महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसच्या वतीने बळकटीकरण सप्ताहाचा शुभारंभ अनामप्रेम संस्थेतील दिव्यांग मुलांसाठी मिष्ठान्न भोजन वाटप कार्यक्रमाच्या माध्यमातून झाला. त्यावेळी काळे बोलत होते. 

काळे म्हणाले की, ना. बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या चाळीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व दिलं. यांच्या वाढदिवसानिमित्त शहर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आनंदराव गारदे यांनी पुढाकार घेत या संस्थेतील दिव्यांग मुलांसाठी मिष्ठान्न भोजन वाटप कार्यक्रमाचे केलेले आयोजन कौतुकास्पद आहे. गारदे यांनी जपलेली सामाजिक बांधिलकी ही समाजातील अनेकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. 

अनामप्रेमच्या वतीने ब्रेल लीपीच्या माध्यमातून दिव्यांग मुलांना सामान्य मुलांप्रमाणेच दिले जाणारे शिक्षण, कौशल्य विकास कार्यक्रम, जॉब फॉर युथ या उपक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाणारा रोजगार यामुळे शिक्षणाबरोबरच या मुलांच्या हाताला काम देत त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न सोडविण्याचे संस्थेने केलेले काम अभिमानास्पद आहे. महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून संस्थेचे असणारे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काँग्रेस पूर्ण ताकतीने संस्थेच्या पाठीशी उभी आहे, असे यावेळी काळे म्हणाले. 

कार्यक्रमाचे संयोजक अनंतराव गारदे म्हणाले की, अनामप्रेम संस्थेच्या कार्याचा मी सुरुवातीपासूनचा साक्षीदार आहे. अत्यंत तळमळीने संस्थेचे कार्य सुरू असते. संस्थेतील दिव्यांग मुलांची धडपड करत आयुष्याला आकार देत जगण्याची जिद्द ही समाजाला निश्चितपणे अनेक गोष्टींची शिकवण देणारी आहे. 

माजीनगराध्यक्ष  दीप चव्हाण, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजामभाई जहागीरदार, प्रा.डॉ.बापू चंदनशिवे, सेवादल काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.मनोज लोंढे आदींची यावेळी भाषणे झाली. 

यावेळी शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, रियाज शेख, अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, शहर जिल्हा सचिव प्रशांत वाघ, सहसचिव नीता बर्वे, महिला सेवादल शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान, अनिसभाई चुडीवाल, डॉ.रिजवान अहमद, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, उषाताई भगत, सोशल मीडिया शहर जिल्हाध्यक्ष सौरभ रणदिवे, सचिन गारदे, सहसचिव गणेश आपरे, शरीफ सय्यद, कल्पना खंडागळे, वाहिद शेख, सीमा बनकर, इम्रान बागवान, श्यामवेल तिजोरे आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जिल्हानिसर्गप्रेमींच्या बर्ड हेल्प लाईनव्दारे ३६ जखमी पक्षांना मदत

जखमी पक्षांना १८वर्षांपासुन मिळत आहे मायेचा आधार

वेब टीम नगर : निसर्गातील महत्वाचा घटक म्हणजे पक्षी,ते विविध कारणांमुळे जखमी होत असतात विशेषत:संक्रांतीच्या कालखंडात त्यांचे जखमी होण्याचे प्रमाण प्रचंड वाढलेले असते.अमदनगर जिल्हा निसर्गप्रेमी संघटना तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्राच्या पुढाकाराने बर्ड हेल्प लाईन चा उपक्रम २००३ सालापासुन सातत्याने राबविला जात आहे.यावर्षी जखमी पक्षांवर उपचार करून निसर्गात पुन्हा मुक्त करण्यासाठी पक्षीअभ्यासक श्री.जयराम सातपुते यांच्यासह पक्षीमिञ

ऋषीकेश परदेशी,दिपक साळवे, प्रतिम ढगे,अमित गायकवाड,शिवकुमार वाघुंबरे,संदिप फंड आदींनी मोलाचे योगदान दिले.यावर्षी १ जानेवारी ते ३० जानेवारी या कालखंडात मांजात अडकुन जखमी झालेल्या  जिल्हाभरातील ३६ पक्षांवर यशस्वी उपचार करून त्यांना निसर्गात मुक्त करण्यात टिमच्या सदस्यांना यश आले. तसेच ५ पक्षी उपचारापुर्वीच मृत झाल्याची माहिती जयराम सातपुते यांनी दिली.

संक्रांत सणाच्यावेळी मोठ्या प्रमाणावर संक्रांत येते ती पक्षीजीवनावर.स्वत:साठी व आपल्या पिलांसाठी अन्नाच्या शोधात बाहेर पडलेले असंख्य पक्षी या महिनाभरात पतंगाच्या विशेषत:नायलाॅन मांजामुळे घायाळ होवुन मृत्युमुखी पडतात अथवा जखमी होतात.त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी निसर्गप्रेमींच्या बर्ड हेल्पलाईन या उपक्रमामध्ये अनेक नवीन निसर्गप्रेमी जोडले जात आहेत तसेच नागरीकांमध्येही पक्षांबद्दल संवेदनशिलता व जागृकता वाढत आहे.दरवर्षी नगर जिल्ह्यात निसर्गप्रेमींच्या प्रयत्नाने संक्रांत काळात व पुढेही वर्षभर बर्ड हेल्पलाईनद्वारे जखमी पक्षांवर उपचार केले जातात.

यावर्षी जखमी पक्षांबाबत निसर्गप्रेमी टिमला कळवण्यासाठी व त्यांना तातडीने टिमपर्यंत पोहचवण्यासाठी श्री.मनोज बावा,मिखाएल शिंदे,शिवम येलुलकर,अशोक कदम,शरद वाघुंबरे,यश चोपडा,जयदिप कुलकर्णी,संदिप कुलकर्णी,निलेश गांधी,अभिषेक हंपे,केतन गोवेकर,भारत अंगीर,मंगेश रेवेकर,सांगेल निरावणे,गणेश पाखरे,अमोल घंगाळे,अक्षय टेमकर,श्रीहरी गोसावी,संतोष उंडे,नितीन पोखरणा,शरद सपाटे,धिरज कराचिवाला,राजकुमार गौतम,प्रविण गार्डे,देव गदादे,रोशन वडकर आदीं जागृक नागरीकांनी मोलाची मदत केली आहे.

शहरी भागात मोठ्या संख्येने निवास करणार्‍या पारवा या पक्षांची संख्या यावर्षीही जखमींमध्ये सर्वाधिक ७ इतकी होती.

याबरोबरच एकापाठोपाठ सापडलेले दोन दुर्मिळ चट्टेरीवनघुबड,घार,बगळे, शिक्रा,कापशी घार,शिंजीर,साळुंकी,कावळा,कोकीळ, भारव्दाज,होला,पिंगळा घुबड, पोपट,चिमणी अशा अन्नसाखळीतील महत्वाच्या स्तरांवरील अनेकप्रकारच्या पक्षांना वाचवण्यात कार्यकर्त्यांना यश आले.झाडांमध्ये अडकलेल्या मांजामुळे संक्रांतीनंतरही पक्षी त्यात अडकल्याच्या घटना घडत राहतात म्हणुनच आपल्या घरपरिसरातील हे धागे बांबुने काढुन टाकण्याचे आवाहनही निसर्गप्रेमी समुहातर्फे करण्यात आले आहे.

  जिल्हास्तरीय पक्षीगणना-२०२१ उपक्रमास सलग बाराव्या वर्षी सुरूवात झाली असुन या उपक्रमात सहभागी होवु इच्छिणार्‍यांनी९६०४०७४७९६  वर संपर्क करण्याबाबत आवाहनही करण्यात आले आहे.  

नागरिकांमध्ये जागरूकता वाढू लागली 

१८वर्षापुर्वी सूरू केलेल्या या सातत्यपुर्ण उपक्रमामुळे जखमी पक्षांबाबत नागरिकांमध्ये जागृकता वाढु लागली आहे.यावर्षी अनेक नव्या युवकांनी स्वयंस्फुर्तीने जखमी पक्षांना आमच्यापर्यंत झटपट हस्तांतरीत केल्यामुळे अनेक पक्षांवर वेळेवर उपचार होवुन त्यांचे प्राण वाचु शकले.या कार्यात मोलाचे योगदान दिलेल्या सर्वांना संस्थेतर्फे अभिनंदन प्रमाणपञाने गौरविण्यात येणार आहे. 

-जयराम सातपुते-पक्षीअभ्यासक  

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रोटरी मिडटाऊनच्या मोफत डायलिसिस सेंटरचे रविवारी लोकार्पण 

क्षितिज झावरे : रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनच्या सामाजिक उपक्रम

वेब टीम नगर :  येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनच्या वतीने ग्लोबल ग्रँट च्या माध्यमातून मॅककेअर हॉस्पिटल येथे अत्याधुनिक मशिनरी युक्त डायलिसिस सेंटर ची उभारणी केली गेली आहे. रविवार दि. ७ फेब्रुवारी रोजी या सेंटरचा लोकार्पण सोहळा होणार असल्याची माहिती क्लबचे अध्यक्ष क्षितिज झावरे यांनी दिली. रोटरी कोविड केअर सेंटर नंतर नगर शहरासाठी डायलिसिस सेंटर ची उभारणी म्हणजे ‘शहराच्या सेवेत रोटरी’  हे वाक्य पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.

द रोटरी फाउंडेशननेच्यातून उभे राहिलेल्या या उपक्रमास रोटरी क्लब ऑफ मियामी या अमेरिकेतील क्लब कडून अर्थ सहाय्य झाले आहे. अनेक रोटरी सभासदांनी या प्रोजेक्ट साठी सहकार्य केले आहे. या डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून नगर शहरातील आणि जिल्ह्यातील अनेक गरजू रुग्णांना विनामूल्य तथा अत्यल्प दरात डायलिसिस उपचाराची सुविधा मॅक केअर हॉस्पिटल येथे करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. आनंद काशीद यांनी दिली.

डायलिसिस ही सातत्याने करावी लागणारी उपचार पद्धती असल्याने सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक दृष्ट्या न परवडणारी आहे. म्हणूनच रोटरीने हे सेंटर उभे करून रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देत असल्याची माहिती माजी प्रांतपाल प्रमोद पारीख यांनी दिली.

 रविवारी दिनांक ७ फेब्रुवारी रोजी रोटरी इंटरनॅशनल डायरेक्टर डॉ. महेश कोटबागी आणि प्रांतपाल हरीश मोटवानी यांच्या हस्ते व अनेक रोटरी सभासदांच्या उपस्थितीत मॅक केअर हॉस्पिटल येथे हा लोकार्पण सोहळा होणार असल्याची माहिती विजय इंगळे यांनी दिली आहे.

तरी आपल्या नगर शहरातील, जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क साधावा (८४५९४९५८९५) असे आवाहन सचिव दिगंबर रोकडे यांनी केले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

समाजाकरिता आपणास काय करता येईल, यादृष्टीने काम केले पाहिजे

सुवर्णा जाधव : सावता परिषदेच्या १४ वा  वर्धापन दिन विविध कार्यक्रमाने साजरा

     वेब टीम नगर : महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाज जागृतीचे मोठे काम केले. त्यांनी केलेल्या कार्याचा आदर्श आज आपण सर्वानी पुढे चालवला पाहिजे. समाजातील वंचित, दुर्लक्षित घटकांसाठी काम करणे हीच शिकवण आपल्या संत व थोर राष्ट्रपुरुषांनी दिलेली आहे. सावता परिषदेच्या माध्यमातून तोच वारसा पुढे चालविण्याचे काम होत आहे. समाज काय म्हणेल, यापेक्षा समाजांकरिता आपणास काय करता येईल, यादृष्टीने काम केले पाहिजे. सावता परिषदेच्या माध्यमातून गेल्या अनेक  वर्षांपासून सुरु असलेल्या उपक्रमांतून अनेकांना फायदा झाला आहे. या उपक्रमातून लोक जोडण्याचे काम होत असल्याने एक चांगला समाज निर्मिती करण्याचा प्रयत्न सावता परिषदेच्या माध्यमातून होत असल्याचे प्रतिपादन नगरसेविका सुवर्णा जाधव यांनी केले.

          सावता परिषदेच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे  नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी  सावता परिषद जिल्हाध्यक्ष गणेश बनकर, निखिल शेलार, उपाध्यक्ष सुदाम लोंढे, सरचिटणीस गुलाब गायकवाड, शहराध्यक्ष नितीन डागवाले, दत्ता जाधव, सुनिल गायकवाड, आदिनाथ गायकवाड, संदिप गाडिलकर, राजू नगरे, बाळासाहेब व्यवहारे, प्रकाश नेमाणे, रोहित सुरतवाले, ओंकार नेमाणे, निखिल सुरतवाले, सागर चौरे आदि उपस्थित होते.

          याप्रसंगी जिल्हाध्यक्ष गणेश बनकर म्हणाले, सावता परिषदेचे संस्थापक कल्याण आखाडे यांच्या नेतृत्वाखाली परिषदेच्या माध्यमातून समाजातील प्रश्‍न सोडविण्याचे काम सुरु आहे. यामध्ये युवक, विद्यार्थी, महिला यांच्याबरोबरच समाजातील प्रत्येक घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न परिषदेच्या माध्यमातून करण्यात येतो. त्याचबरोबरच वृक्षारोप, शालेय विद्यार्थ्यांना मदत, महिला बचत गटांतून महिलांचे संघटन आणि सक्षमिकरण, युवकांना नोकरी, रोजगाराविषयी मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांद्वारे गेल्या १४ वर्षापासून संघटन सुरु आहे. परिषदेच्या या कार्यात अनेकजण जोडले जाऊन सहकार्यही करत आहेत. जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांच्या सहकार्याने संघटनेचे कार्य वाढत असून, यापुढील काळात आणखी व्यापाक स्वरुपात परिषद काम करेल, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

     याप्रसंगी निखिल शेलार, दत्ता जाधव, सुनिल गायकवाड आदिंनी मनोगतातून सावता परिषदेच्या कार्याचा गौरव करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

     याप्रसंगी गणेश शिंदे, गोरक्षनाथ गाडेकर, दिनेश बेल्हेेकर आदि उपस्थित होते.  प्रास्तविकात उपाध्यक्ष सुदाम लोंढे यांनी सावता परिषदेच्या गेल्या १४ वर्षांपासून सुरु असलेल्या कार्याचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन डागवाले यांनी केले तर आभार गुलाब गाडिलकर यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

दीनदयाळ परिवारातर्फे माऊली प्रतिष्ठानला दोन स्ट्रेचर भेट

वेब टीम नगर : दीनदयाळ परिवारा तर्फे पंडित दीनदयाळ नागरी पतसंस्थाचे संस्थापक अध्यक्ष वसंत लोढा यांच्या पुढाकाराने व जागरूक नागरिक मंच यांच्या सहकार्याने माऊली प्रतिष्ठान या मनोविकलांग  महिनासाठी काम करणाऱ्या संस्थेला यांना दोन स्ट्रेचर देण्यात आले. पेशंटला वाहण्यासाठी तसेच दुर्दैवाने कोणाचा मृत्यू झाल्यास मृतदेह वाहण्यासाठी माउली प्रतिष्ठान कडे स्ट्रेचर उपलब्ध नव्हता. त्यामुळे बेडशीट मध्ये गुंडाळून रुग्णाची वाहतूक करावी लागत असे. हे समजल्या वरतातडीने दोन स्ट्रेचर संस्थेला भेट म्हणून देण्यात आले.  या प्रसंगी वसंत लोढा, जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे, सुनील पंडित, कैलास दळवी, अभय गुंदेचा योगेश गणगले, भैरवनाथ खंडागळे, घंगाळे , देशपांडे  इत्यादी उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अल-करम हॉस्पिटल व हलिमा क्लिनिकच्याशिबीरात १३७ जणाचे रक्तदान

     वेब टीम नगर : अल-कमर सोशल अ‍ॅण्ड एज्युकेशन सोसायटी, मुकुंदनगर येथील हलिमा क्लिनिक व अल-करम मॅटरनिटी व नर्सिंग होमच्या संयुक्त विद्यमाने नालंबद खुंट येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी इंजि.फिरोज तांबोळी, डॉ.जहिर मुजावर, मनपा आरोग्य अधिकारी अनिल बोरगे, डॉ.संध्या इंगोले, डॉ.कवडे, ज्ञानेश्‍वर मगर आदि उपस्थित होते. या शिबीरासाठी जिल्हा रुग्णालय व अर्पण ब्लड बँकेच्या टिमने रक्तसंकलनाचे कार्य केले.

     याप्रसंगी इंजि.फिरोज तांबोळी म्हणाले, कोरोनानंतर आरोग्य क्षेत्रातील परिस्थिती सुधरत आहे. परंतु रक्त संकलन कमी होत असल्याने आज सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे, अशा परिस्थितीत या शिबीराचे आयोजन करुन रुग्णांना दिलासा देण्याचे काम केले आहे. अशा उपक्रमातून समाजातील आवश्यक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असाच आहे, असे सांगून संयोजकांचे कौतुक केले.

     डॉ.जहिर मुजावर म्हणाले, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. एकाजणांच्या रक्तदानाने अनेकांना त्याचा उपयोग होत असल्याने नियमित रक्तदान होणे गरजेचे आहे. रक्तदानाने दुसर्‍याचे तर प्राण वाचतातच परंतु त्याबरोबर आपलेही आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होत असते. त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे. संस्थेच्यावतीने गरजेच्यावेळी रक्तदान शिबीराचे आयोजन करुन समाजापुढे आदर्श ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले.

     शिबीर यशस्वीतेसाठी तौफिक तांबोळी, तौसिफ सय्यद, शेरअली शेख, शोएब शेख, इम्रान शेख, शाहिद काझी, समीर तांबोळी, सैफुद्दीन शेख, एजाज तांबोळी, समीर शेख आदिंनी परिश्रम घेतले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मुंबई आर्ट मॅरेथॉन चित्रप्रदर्शनात नगरच्या कलाकारांचे कौतुक

   वेब टीम नगर : दिल्ली येथील कलाआकार फाऊंडेशन आयोजित मुंबई आर्ट मॅरेथॉन २०२१ अंतर्गत बॉम्बे आर्ट सोसायटी या ठिकाणी भरविण्यात आलेल्या प्रदर्शनात  अहमदनगर मधील कलाकारांचे चित्रे झळकली.  कलाआकार फाऊंडेशनच्या संचालिका जया अरोरा  यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून प्रदर्शनाची सुरुवात झाली. दोन दिवसीय प्रदर्शनातील कलाकृतींना उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

     या चित्र प्रदर्शनात  अहमदनगरच्या  ’आकार आर्टिस्ट ग्रुप’ चे आडेप दत्तात्रेय, वल्लाल बालाजी, थोरात भाऊसाहेब, आरे मुकुंद, शिंदे अनुपम,  थिगळे प्राची,  बेंद्रे पांडुरंग,  पुरी विठ्ठल, कुंटला हरीश, वैभव मोहरे, अशोक वागस्कर, प्रवीण नेटके व  नेटके ड्रॉइंग अकॅडमी मधील विद्यार्थी चित्रकार सहभागी झाले होते.

     या चित्रप्रदर्शनात नगरमधील चित्रकांरांनी काढलेल्या चित्रांची उपस्थित मान्यवरांनी व येणार्‍या चित्रप्रेमींनी विशेष कौतुक केले.

  जया अरोरा यांनी नगरमधील चित्रकारांसाठी नेहमीच प्रोत्साहन देऊन त्यांचे चित्रे विविध शहरातील चित्र प्रदर्शनासाठी निवड करुन सहभागी केली आहेत. याबद्दल नगरचे चित्रकार बालाजी वल्लाल यांनी त्यांचे आभार मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आरोग्य शिबिराबरोबरच सामुदायिक विवाह,धार्मिक कार्यक्रम

 एकदंत कॉलनीत गणेश जयंती उत्सवाचे निमित्त     

  वेब टीम  नगर :  दातरंगे मळा येथील एकदंत कॉलनीत गणेश जयंती उत्सवानिमित्त आरोग्य शिबिराबरोबरच सामुदायिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  मंडळाचे हे१७ वे वर्षे असून दर वर्षी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो. तसेच विविध कार्यक्रमांनी या उत्सवाची शोभा वाढते. तसेच या गणेश जयंती निमित्त मंडळाच्यावतीने सामुदायिक विवाह सोहळा करण्यात येतो. यामध्ये दरवर्षी ३-४ जोडप्यांचा विवाह लावण्यात येतात. या जयंती उत्सवास लोक दर्शनासाठी येऊन महाप्रसादाचा लाभ घेतात. कोरोना या महामारीमुळे मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत उत्सव मुर्ती मिरवणुक, डान्स स्पर्धा कार्यक्रम रद्द करुन यावर्षी आरोग्य शिबीरे आयोजित केली आहे. एकदंत गणेश मंदिर, मंडळाचे सर्व सदस्य व एकदंत परिवार व एकदंत महिला मंडळ यासाठी विशेष परिश्रम घेतात.

     एकदंत गणेश जन्मोत्सव १५ फेब्रुवारी २०२१  रोजी आहे. शुक्रवार दि. १२ फेब्रुवारी २०२१ रोजी दिप प्रज्वलनाने गणेश जयंती उत्सवास स.९ वा. प्रारंभ होईल., रात्री ८  ते ११ पर्यंत हनुमान चालिसा (श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ, नवीपेठ), शनिवार दि.१३ फेब्रुवारी २०२१ रोजी स.१० ते दु.४ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी करुन मोफत औषधे वाटप तसेच दंतरोग तपासणी, नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, रविवार दि.१४ फेब्रुवारी२०२१ रोजी सकाळी ९ ते दु. ५ पर्यंत रक्तदान शिबीर, रात्री ७ ते ९ यावेळेत एकदंत महिला मंडळ व परिवाराच्या वतीने हळदी कुंकू समारंभ, तसेच रात्री ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम (बत्कम्मा) होईल.

     श्री गणेश जयंतीदिनी शुक्रवार दि.१५ फेब्रुवारी २०२१ रोजी स.७ते ९ श्री विघ्नेश्‍वर पूजन व श्री गणपती अथर्वशिर्ष नाममुर्ती अभिषेक, स.९ ते १०. ३० होम हवन, स.९ ते दु.१२, श्री सत्यनाराण महापूजा,  दु१. ३०  ते ३ महाप्रसाद (भंडारा), दु.४ ते  सायं.७यावेळेत लहान बालकांसाठी गंमत जंमत व बाल मेळावा, असे कार्यक्रम होतील. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकदंत गणेश मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी केले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पदापेक्षा कामाला महत्व द्या

 माऊली गायकवाड : ओबीसी बारा बलुतेदार जिल्हा उपाध्यक्ष अनिल इवळे तर शहराध्यक्ष शाम औटी यांची निवड

        वेब टीम नगर : समाजात काम करताना एक सेवा म्हणून व्रत स्विकारले पाहिजे आपण काही तरी देणे लागतो हि भावना ठेवून तळमळीने काम करा आपल्या पदापेक्षा कामाला महत्व द्या. तुम्हाला दिलेले पद हे काम करण्यासाठी आहे त्याला न्याय द्या असे प्रतिपादन जिल्हध्यक्ष माऊली गायकवाड यांनी केले आहे.

     ओबीसी बारा बलुतेदार महासंघाच्या अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष अनिल इवळे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख राजेश सटाणकर, नगर शहराध्यक्ष शाम औटी, शहरसंपर्क प्रमुख संजय उदमले तर पाथर्डी तालुकाध्यक्षपदी सिताराम शिंदे यांच्या नवीन नियुक्त्या करुन श्री गायकवाड यांचे हस्ते पत्रे देण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

     यावेळी जालिंदर बोरुडे, राजेंद्र पडोळे, बबनराव कुसाळकर, दिलीप मते, संदीप घुले, मल्हारी गीते, स्वप्निल नांदुरकर, संतोष शिंदे, आदिनाथ गायकवाड उपस्थित होते.

 गायकवाड पुढे बोलताना म्हणाले कि, ओबीसी बारा बलुतेदार महासंघाच्या माध्यमातून सर्व समाज एकत्र येत आहे. समाजासाठी काम करताना एकीचे बळ महत्वाचे असते ते या आपल्या उपस्थितीवरुन दिसते, तुमच्या पदापेक्षा तुम्ही केलेले काम मोठे असते, त्या पदाला न्याय द्या असे आवाहन त्यांनी केले.

     यावेळी राजेश सटाणकर यांनी समाजात वावरताना काम करताना त्याची सुरुवात आपल्या घरातून करा याचे उदाहरणे देत त्यांनी सर्वांना एकसंघ राहा असे आवाहन केले. नवनिर्वाचित उपाध्यक्ष इवळे, शहराध्यक्ष औटी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. शेवटी जिल्हा योगप्रचारक दिलीप मते यांचा महासंघातर्फे सन्मान करण्यात आला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हमीदभाई शेख ‘छत्रपती पुरस्कारा’ने सन्मानित

माजी आ.स्नेहलता कोल्हे, इंदुरीकर महाराज यांच्या हस्ते वितरण

    वेब टीम  नगर : उंबरे ता राहुरी येथील छत्रपती प्रतिष्ठानच्यावतीने  जिल्हास्तरीय मानाचा ‘छत्रपती पुरस्कार’ अहमदनगर जिल्हा प्रहार सचिव हमीदभाई शेख यांना माजी आ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी पोलिस उपनिरिक्षक गणेश शेळके, हभप इंदुरीकर महाराज, प्रहार अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.लक्ष्मणराव पोकळे, जिल समन्वय आप्पासाहेब ढोकणे, , विजय हजारे, संदेश रपारिया, किशोर सुर्यवंशी, संजय पुंड, मधुकर धाडगे,  कडूभाई पठण, गणेश शिंदे, निलेश शिंदे, चिंतामण तनपुरे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी स्नेहलता कोल्हे यांनी म्हणाल्या, प्रतिकुल परिस्थितीसी लढा देत आत्मविश्‍वासाने आपल्या क्षेतात आजवर चौफेर घोडदौड सुरु ठेवून समाजातील वंचित घटकांसाठी काम करणार्‍यांची छत्रपती प्रतिष्ठानने दखल घेऊन  त्यांच्या परिश्रमाची पावती म्हणून हा गौरवरुपी पुरस्कार बहाल केला आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्यास बळ मिळेल असे सांगितले.

     पुरस्कारनंतर हमीदभाई शेख म्हणाले,  राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या आशिर्वादाने व सर्व प्रहार दिव्यांग सैनिक यांच्या आपुलकीमुळे आज आपण योगदान देत आहोत. दिव्यांचे प्रश्‍न सोडून त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून सुरु आहे. हा पुरस्कार मला साथ देणार्‍यां सर्वांचा आहे. त्यामुळे आमच्या कार्यास प्रेरणा मिळणार असल्याचे सांगितले.

     प्रहार अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.लक्ष्मणराव पोकळे यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यास मिळाला पुरस्कार हा आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद असाच आहे. हमीदभाई शेख यांनी संघटनेच्या माध्यमातून अपंगांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करत आहेत. त्याची दखल घेऊन हा पुरस्कार मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढविणार आहे. तसेच त्यांनी यावेळी  अहमदनगर महापालिका हद्दीतील दिव्यांग बांधवांनी हयातीचा दाखले महापालिकेत जमा करावा असे आवाहन प्रहार दिव्यांग क्रांती सेनेच्या वतीने केले.हमीदभाई शेख यांना मिळालेल्या पुरस्कारबद्दल मंत्री बच्चू कडू, वरिष्ठ पदाधिकारी व जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी अभिनंदन केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आयुर्वेद ते दिल्लीगेटपर्यंत उड्डाणपुल करा

शिव राष्ट्र सेना पक्षाच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

   वेब टीम नगर : आयुर्वेद रस्ता ते दिल्लीगेट रस्ता हा छोट्या वाहनांने व मोठ्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. कल्याण रोड, मनमाड रोडवरुन येणारे वाहतुक याच रस्त्यावरुन जात असल्याने वाहतुकीची समस्या नियमित निर्माण होत असते. कल्याणरोड, काटवन, केडगांव परिसरातील असंख्य नागरिकांची ये-जा सुरु असते. तसेच रस्त्यावर अतिक्रमण करुन अनेकांनी आपली दुकाने, पाट्या, भाजी विक्रेते, फळांच्या गाड्या रस्त्यावरच असल्याने   या रस्त्यावर वाहतुक कोंडी निमाृण होते.  पर्यायाने रस्त्या लगतच्या गल्लीबोळातून ही वाहने जात असल्याने अनेक छोटे-मोठे अपघातही होत आहे. याच विचार करता या रस्त्यावर उड्डाणपुलाची आवश्यकता आहे, अशी मागणी शिव राष्ट्र सेना पक्षाच्यावतीने पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे यांनी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे.

     यावेळी शिवराष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे, दलितज महाघाडीचे अनिल शेकडकर, ओबीसी आघाडीचे बाबासाहेब करपे, युवा प्रमुख शंभु नवसुपे, युवा अध्यक्ष मुकुंद आंबेकर, देखरेख समितीचे समीर खडके, शेतकरी आघाडीचे भैरवनाथ खंडागळे, कामगार सेनेचे राधाकिसन कुलट, ओमकार जाधव आदि उपस्थित होते.

     जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहर झपाट्याने वाढत आहे. अंत्यविधीसाठी अमरधाम हे महत्वाचे ठिकाण असल्याने बर्‍याचवेळेस येथील गर्दीचा मोठा त्रास संबंधितांना सहन करावा लागता. अनेकवेळी अंत्यसंस्कारासाठी येणार्‍यांना अडचणीचे ठरत असल्याने व या रस्त्यावरील वाहतुक सुरळीत होण्यासाठी आयुर्वेद रस्ता ते दिल्लीगेट पर्यंत उड्डाणपुल होणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने लवकरात लवकर या पुलाचा आराखडा करुन त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा आम्हाला या विरोधात उपोषण करावे लागेल, असेही निवेदनात म्हटले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

दहा महिन्यानंतर जिल्हा व तालुका न्यायालय पुर्ववत सुरु

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या पाठपुराव्याला यश : न्यायदान प्रक्रियेत गती येण्यासाठी वर्चुअल कोर्ट संकल्पना स्विकारण्याची मागणी

 वेब टीम नगर : कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर दहा महिन्यानंतर अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील जिल्हा व तालुका स्तरावरील न्यायालय पुर्ववत सुरु झाले आहे. न्यायालयांचे कामकाज पुर्ववत व नियमीत सुरु होऊन कायद्याच्या राज्याची प्रचिती येण्याकरिता न्यायव्यवस्थेचा सत्यबोधी सुर्यनामा करण्याचा इशारा पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने देण्यात आला होता. संघटनेच्या या मागणीला यश आले असून, संघटनेने आपले आंदोलन मागे घेतले आहे. न्यायदान प्रक्रियेत गती येण्यासाठी जिल्हा व तालुका न्यायालयांनी वर्चुअल कोर्टची संकल्पना स्विकारुन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची मागणी करण्यात आली असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

कोरोनानंतर महाराष्ट्रातील जिल्हा व तालुका स्तरावरील न्यायालयात फक्त १० टक्केच कामकाज सुरु होते. महत्त्वाची प्रकरणे जामीन व कोठडी संदर्भात फौजदारी प्रकरणे वगळून सर्व कामकाज ठप्प होते. मागील तीन महिन्यापासून सर्व व्यवहार, उद्योगधंदे आदी शासकीय कार्यालयांचे कामकाज सुरळीत सुरु झाले. जिल्हा व तालुकास्तरावरील न्यायालय शंभर टक्के सुरु नसल्याने कायद्याच्या राज्याची संकल्पना मोडीत निघत होती. ही न्यायालय सुरु होण्यासाठी संघटनेने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती व कायदे मंत्री यांना निवेदन पाठवून आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेत कोरोना बचावाच्या नियमांचे पालन करुन न्यायालयाचे कामकाज पुर्णत: सुरु झाले असून, संघटनेने आपले आंदोलन स्थगित केले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

कॉन्टम फिजिक्स ऑब्झर्वर इफेक्ट ही संकल्पना लोकशाही तत्त्वाचा आत्मा आहे. देशातील कायदे मंडळ, कार्यकारी मंडळास जाब विचारण्याचा अधिकार जनतेला आहे. कोरोनानंतर जगातील न्यायालयीन व्यवस्थेत मोठी क्रांती झाली. नवीन तंत्रज्ञानाचा आत्मसात करुन वर्चुअल कोर्ट ही संकल्पना असतित्वात आली. देशात देखील उच्च व सर्वोच्च न्यायालयाने याचा स्विकार केला. मात्र जिल्हा व तालुका स्तरावरील न्यायालये वर्चुअल कोर्ट या संकल्पनेपासून लांब राहिली. कोरोना नंतरच्या काळात या तंत्राचा स्विकार करुन अनेक प्रकरणे निकाली काढता आली असती, मात्र नवीन तंत्रज्ञान स्विकारण्यात आले नसल्याने कोर्ट अधिक काळ बंद राहिले. पक्षकार, वकिल सर्वांकडे स्मार्ट फोन असल्याने ही संकल्पना चांगल्या पध्दतीने राबवली जाऊ शकते. यामुळे न्यायदान प्रक्रियेत गती येणार असल्याची भावना अ‍ॅड. गवळी यांनी व्यक्त केली आहे. जिल्हा व तालुका स्तरावरील न्यायालयात वर्चुअल कोर्ट ही संकल्पना स्विकारण्यासाठी अ‍ॅड. गवळी, कॉ. बाबा आरगडे, अर्शद शेख, अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले, वीरबहादूर प्रजापती आदी प्रयत्नशील आहेत.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पल्स पोलिओ मोहिमेतील आरोग्य व अंगणवाडी कर्मचारींसह मदतनीसांचा सन्मान

केडगाव जागृक नागरिक मंचचा उपक्रम

वेब टीम नगर : पल्स पोलिओ मोहिम यशस्वीपणे पुर्ण करुन समर्पित भावनेने कार्य करणार्‍या केडगाव येथील आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, मदतनीस व सफाई कर्मचारी यांचा केडगाव जागृक नागरिक मंचतर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी महेश येवले, मंचचे अध्यक्ष विशाल पाचारणे, सिकंदर शेख, शाकीर शेख, आयाज शेख, शुभम बोरुडे, मल्हारी पाचारणे, सलीम शेख, शोहेब शेख, बाळासाहेब पाचारणे, अल्ताफ पठाण, जालिंदर वडेवाले, अभिजीत काळे, बच्चू कोतकर, कचरू पाचारणे, संतोष पाचारणे, गणेश पाचारणे, कल्पना चेमटे, सीमा घुले, प्रवीण पाटसकर, अनिल मरकड, एकनाथराव पाचारणे, रेणुका लोंढे, वनश्री राऊत, अश्‍विनी जोशी, विमान गुंजाळ, ज्योती क्षीरसागर, शिवानी वाघ, संगीता खामकर, सुजाता गाडीलकर, कविता सातपुते, अर्चना ढुमणे, रुक्मिणी शेंडगे, अनुराधा तुंगार, वैजंती सांगडे, बबीता भाबरकर, अमिता वाळुंजकर, कल्पना जाधव, आरती माने, छाया केळगंद्रे, अश्‍विनी पाचारणे आदी उपस्थित होते.

विशाल पाचारणे म्हणाले की, सर्व नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, मदतनीस व सफाई कर्मचारी योगदान देत असतात. पल्स पोलिओ मोहिमदेखील त्यांच्या प्रयत्नाने यशस्वी होते. कोरोनाच्या संकटकाळात देखील त्यांनी योगदान देऊन देवदूताची भूमिका पार पडली. त्यांचे ऋण न फेडता येण्यासारखे असून, त्यांची अविरतसेवा ही समाजसेवा असल्याचे त्यांनी सांगितले.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments