प्रेमी युगालाची रेल्वे खाली आत्महत्या
वेब टीम श्रीगोंदे : तालुक्यातील येळपणे येथील प्रेमीयुगल राजू बाबा कोळपे (वय ३८) व राणी राजेंद्र साबळे (वय ३०) यांनी मनमाड दौड लोहमार्गावरील महादेववाडी शिवारात रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. ही दुर्देवी घटना सोमवारी रात्री घडली आहे.
या बाबत समजलेली अधिक माहिती अशी राजू व राणी दोघे विवाहीत होते. पण गेल्या महीन्यापासून राजू व राणी यांचे प्रेमसंबंध आले. सोमवारी सकाळी अकरा वाजता दोघेही घरातून बाहेर पडले घरच्यांनी बेलवंडी पोलिस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार केली. सोमवारी रात्री उशीरा दोघांनी महादेववाडी शिवारात रेल्वेखाली आत्महत्या केली. या घटनेनंतर येळपणे परिसरात खळबळ उडाली आहे. दोघांनी आत्महत्या का केली हे स्पष्ट झाले नाही. ते पोलिस तपासानंतर स्पष्ट होईल.
0 Comments