नगरटुडे बुलेटीन 19-01-2021

 नगरटुडे बुलेटीन 19-01-2021

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

घरकुल वंचितांची घरे होण्यासाठी आत्मनिर्भर आवास भूमीगुंठेशिवाय पर्याय नाही 

घरकुल वंचितांचा सत्यबोधी उत्तरायण सुर्यनामा : नियोजित प्रकल्पाच्या ठिकाणी वनश्री डोकेनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या फलकाचे अनावरण

वेब टीम नगर : राजकारणी, नेते, नोकरदार मोठ्या प्रमाणात आपला काळा पैसा शहरी भागातील जागेत गुंतवून देशात गुंठामंत्री अर्थव्यवस्था खोलपर्यंत रुजली असल्याचा मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने सत्यबोधी उत्तरायण सुर्यनामा करण्यात आला. तर घरकुल वंचितांची घरे होण्यासाठी आत्मनिर्भर आवास भूमीगुंठेशिवाय पर्याय नसल्याचे जाहीर करुन, निंबळक येथील घरकुल वंचितांच्या नियोजित प्रकल्पाच्या ठिकाणी वनश्री डोकेनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी अॅतड. कारभारी गवळी, प्रदिप झरेकर, संजय स्वामी, अशोक भोसले, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अंबिका जाधव, फरिदा शेख, सुशिला देशमुख, पोपट भोसले, बबती खंडीझोड, बाबा शेख, परवीन शेख, सुलभा आडेप आदींसह महिला उपस्थित होत्या.

अनेकांनी काळा पैसा शहरातील जमीनीत गुंतवल्याने जमीनीचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे गोर-गरीबांना घर घेणे अवघड झाले आहे. सर्व राजकारणी शहरी भागात कोट्यावधी रुपयांचा काळा पैसा जमीनीत गुंतवून सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा भोगत आहे. यासंदर्भात सरकारने कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलले नाहीत. जागेबाबत मागणी-पुरवठामध्ये कृत्रिम टंचाई निर्माण करून उघडपणे काळा पैसा पोसला जात असल्याचे सत्यबोधी उत्तरायण सुर्यनाम्यातून यावेळी सिध्द करण्यात आले.

 सत्ताधारी मंडळींनी घरकुल वंचित, अशिक्षित व संघटितांची मत पैश्याच्या जोरावर खरेदी करून मागच्या दाराने सत्ता मिळविली. या सत्तेसाठी गुंठामंत्री अर्थव्यवस्थेने त्यांना जमीनीच्या माध्यमातून आर्थिक साथ दिली. आत्मनिर्भर आवास भूमीगुंठेशिवाय घरकुल वंचितांना सामाजिक न्याय मिळणार नाही. हे उद्दीष्ट समोर ठेऊन संघटनेच्या माध्यमातून घरकुल वंचितांना ८० हजार रुपये मध्ये एक गुंठा जमीन उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याशिवाय९ मीटरचे रस्ते, पाणी, वीज व सरकारी अनुदानासाठी संघटना प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट करण्यात आले.  

देशातील गरिबी हटविण्यासाठी सामान्य लोकांनी संघटीतपणे सातत्याने लढा दिला पाहिजे. सर्वसामान्य हक्कासाठी संघटितपणे एकत्र येत नसल्याने त्यांच्या विचार केला जात नाही. सत्ताधारी सत्तेतून पैसा व पैश्यातून सत्ता मिळवण्यात पटाईत झाले असून, त्यामुळे त्यांना स्वत:च्या हिताशिवाय वंचितांचे प्रश्नव दिसत नाही. संघटनेच्या वतीने घरकुल वंचितांना हक्काची घरे मिळण्यासाठी मागील सहा वर्षापासून आंदोलने सुरु होती. मात्र एकही लोकप्रतिनिधी व मंत्री त्यांचे प्रश्नच सोडविण्यासाठी आस्थेने पुढे आला नाही. फक्त घोषणांचा पाऊस पाडून सत्ता भोगण्याचे काम राजकारणी करीत आहे. घरकुल वंचितांना स्वत:ची घरे स्वत:च्या संघर्षातून निर्माण करावी लागणार असल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 कोरोना योद्धे हेच खरे देवदूत आहे

मनीषा राठोड  :  लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.तर्फे कोरोना योद्धा पुरस्कार वितरण                                                               

वेब टीम  नगर : कोरोना महामारीच्या काळात अनेकांना दुःखाला सामोरे जावे लागले.माणूस माणसापासून दुरावला गेला.लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे रोजगार गेले,उपासमारीची वेळ आली.अशा वेळेस माणुसकीचा धर्म पाळून कोरोना योध्यांनी किराणा किट वाटप करून,दोन वेळचे भोजन देऊन तसेच हॉस्पिटलच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य करून माणुसकीचे दर्शन घडविले.समाजाला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांना दूर करण्याचे काम कोरोना योद्ध्यांनी केले आहे.म्हणूनच कोरोना योद्धे हेच खरे देवदूत आहे.असे प्रतिपादन लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.च्या मॅनेजर मनिषा राठोड यांनी केले.                                            

 मनमाडरोड वरील लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.यांच्या तर्फे बूथ हॉस्पिटलचे मेजर देवदान कळकुंबे,महावीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्षल बोरा,उपाध्यक्ष चेतन भंडारी,रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर,नंदराज केटरर्सचे राजेंद्र उदागे,मनपाचे अभियंता सुरेश इथापे यांना ''कोरोना योद्धा'' हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.व महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ व तिळगुळ वाटप करण्यात आले.अरविंद गायकवाड, पुष्कर तांबोळी,राकेश भंडारी,निखिल गांधी,श्रीपाल शींगी,नितीन हातवळणे,भूषण खिस्ती, गायत्री खिस्ती,सुदीप मुळे,प्रतिभा मुळे,विवेक निसळ,हर्षल विटणकर,स्नेहल बडवे,महेश चौधरी,व्यंकटेश संभार आदी उपस्थित होते.                                                                

सत्काराला उत्तर देताना जयंत येलूलकर म्हणाले की,सामाजिक बांधिलकी जपून नगर शहरातील अनेक लोकांनी माणुसकीचा झरा जिवंत ठेवला.माणुसकीचा धर्म पाळून या कोरोना योद्ध्यांनी पदरमोड करून नागरिकांना मदतीचा हात देऊन शहराचे आरोग्य चांगले ठेवण्यास सहकार्य केले.सामाजिक बांधिलकी जपत लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी च्या वतीने कोरोना योध्यांचा सत्कार करून पुढील काळात असे सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी प्रेरणा दिली आहे.                              

   याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भंडारे म्हणाले की लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.या संस्थेची स्थापना १९९५ साली करण्यात आली.ही संस्था एक विश्वासू संस्था आहे.या संस्थेचा महाराष्ट्र,कर्नाटक,गोवा,दिल्ली या राज्यात विस्तार आहे.ट्रॅव्हल्स,टूर्स व हॉटेल्स अश्या अनेक व्यवसायात मोठी गुंतवणूक असून २५ वर्ष पूर्ण होऊन ५००० कोटींच्या ठेवी आहेत.नगर शाखेने ६व्या वर्षात पदार्पण केले आहे.या संस्थेची यशस्वी वाटचाल अखंड सुरु आहे.भारतातील ही पहिलीच को-ऑप संस्था असून संस्थेने आर्थिक व्यवहारात बरोबरच सामाजिक सामाजिक कार्यातही पुढाकार घेतला आहे.कोरोना योध्यांचा सत्कार करून त्यांनी समाजाला दिशादर्शक असे काम केले आहे.                                                                 

 कार्यक्रमाचे सूत्र संचालन हर्षल विटणकर यांनी केले तर आभार स्नेहल बडवे यांनी मानले.या कार्यक्रमासाठी सभासद मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नगर क्रीडा काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी प्रवीणभैय्या गीते पाटील यांची निवड 

वेब टीम नगर : काँग्रेस पक्षाच्या क्रीडा विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी राष्ट्रीय खेळाडू प्रवीणभैय्या गीते पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तसे पत्र शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिले आहे. 

गीते पाटील यांनी आजपर्यंत तीन वेळा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये कराटे खेळामध्ये सुवर्णपदक पटकाविले आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावर डीसेबल प्रवर्गातून बॅडमिंटन  खेळाडू म्हणून त्यांनी आजवर अनेक स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळविली आहेत. 

शिवराज स्पोर्ट अकॅडमीच्या माध्यमातून गीते पाटील यांनी आजवर अनेक खेळाडू घडविले असून त्यांनी राज्य, राष्ट्रीय स्तरावरती उत्तम कामगिरी केलेली आहे. महाराष्ट्र डिसेबल क्रिकेट संघातून त्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आहे. 

गीते पाटील यांच्या निवडीचे पत्र दिल्यानंतर काळे म्हणाले की, नगर शहरामध्ये विविध क्रीडा प्रकार मोठ्या प्रमाणावर खेळले जातात. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी, युवावर्ग यांना उत्कृष्ट खेळाडू घडविण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम आम्ही करू.काँग्रेस पक्षाच्या क्रीडा विभागाच्या माध्यमातून शहरातली क्रीडा प्रशिक्षकांना, क्रीडा शिक्षकांना क्रीडा क्षेत्रात भरीव यश मिळण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल.

ना. बाळासाहेब थोरात, आ. डॉ.सुधीर तांबे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वखाली क्रीडा विभागाच्या माध्यमातून मजबूत संघटन शहरात उभे करण्याचे काम आम्ही करू असे प्रतिपादन यावेळी गीते पाटील यांनी केले आहे.  

गीते पाटील यांच्या निवडीबद्दल त्यांचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, आ. डॉ.सुधीर तांबे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, दिप चव्हाण, ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा आदींनी अभिनंदन केले आहे.

गीते पाटील यांच्या सत्कार प्रसंगी काँग्रेसचे शहर जिल्हा सरचिटणीस ॲड. चेतन रोहकले, शहर जिल्हाध्यक्ष चिरंजीव गाढवे, नगर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय कुलट, विद्यार्थी नेते सुजित जगताप, मच्छिंद्र साळुंखे, नारायण कराळे, साहिल शेख, निखील गलांडे, ऋषिकेश चितळकर, अमित गुंड, आदेश जाधव आदी उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही

 अंजली वल्लाकटी : महिला भाजपाचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

वेब टीम नगर : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळा मधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरूद्ध एका महिलेने ब्लॅकमेल करणे, अनैसर्गिक कृत्य व  बलात्कार केल्या प्रकरणी पोलिसात  तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाहीये. तसेच त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामाही दिला नाहीये. याच्या निषेधार्थ नगर शहर भाजपा महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करून जिल्हाधीकारींना निवेदन देण्यात आले. महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा अंजली वल्लाकटी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात प्रदेश सचिव सुरेखा विद्दे, गीता गिल्डा, वंदना पंडित, छावणी परिषदेच्या सदस्या शुभांगी साठे, भिंगार महिला अध्यक्षा जोत्सना मुंगी, केडगाव महिला अध्यक्षा संध्या पावसे, संगीता मुळे आदी उपस्थित होत्या.

          यावेळी बोलतांना अंजली वल्लाकटी म्हणाल्या , महाआघाडी सरकार मधील जवाबदार मंत्री धनंजय मुंडे यांनी एका महिलेवर अत्याचार केले आहेत. मात्र अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाहीये. त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामाही दिलेला नाहीये. महिला भाजपच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून त्यांचा त्वरित  राजीनामा घेतला नाहीतर महिला पदाधिकारिंनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होते. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयावर महिला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले आहे. महिलेवर अत्याचार करणारे मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही अधिकार राहिलेला नाहीये.

          सुरेखा विद्दे म्हणाल्या, महाआघाडी सरकारच्या काळात राज्यात महिला सुरक्षित नाहीये. मोठ्या प्रमाणत महिलांवर अत्याचार वाढत आहेत. आता मंत्रीही महिलांवर अत्याचार करून उजळ माथ्याने फिरत आहेत. ही बाब अत्यंत निंदनीय आहे.

          गीता गिल्डा म्हणाल्या, भाजपाच्या महिला आघाडीच्या पदाधीकारींनी आज शांतेत आंदोलन केले आहे.  राज्य सरकारने मंत्री मुंडे यांचा त्वरित राजीनामा घेतला नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सारडा महाविद्यालयाच्या ५ प्राध्यापकांना प्रोफेसरपदी पदोन्नती

वेब टीम नगर : पेमराज सारडा महाविद्यालयाच्या ५ प्राध्यापकांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा कडून नुकतीच प्रोफेसर पदावर पदोन्नती मिळाली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र शिंदे (अर्थशास्त्र ), डॉ.गिरीष कुलकर्णी व डॉ.ज्योती बिडलान (राज्यशास्त्र), डॉ.महेश्वरी गावित (मराठी) व डॉ.माधुरी दिक्षित (इंग्रजी) यांची प्रोफेसर पदी पदोन्नती झाली आहे. याबद्दल सारडा महाविद्यालयात झालेल्या सत्कार समारंभात हिंदसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष अजित बोरा, माजी कार्याध्यक्ष ब्रिजलाला सारडा यांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी मंडळाचे संचालक प्रा.सुजित बेडेकर, प्रा.मकरंद खेर, डॉ.पारस कोठारी, मधुसूदन सारडा, रणजीत श्रीगोड, बी.यू.कुलकर्णी, प्रबंधक अशोक असेरी, वरद जोशी आदी उपस्थित होते.

          यावेळी बोलतांना प्रा. शिरीष मोडक म्हणाले, सारडा महाविद्यालाच्या ५प्राध्यापकांनी अतिशय कठीण परिक्षेत उतीर्ण होत प्रोफेसर पदाचा बहुमान मिळवला आहे. पेमराज सारडा महाविद्यालयाने  आधीपासूनच पीएचडी धारक डॉक्टरांचे महाविद्यालय असा लौकिक मिळवला आहे. आता उच्चविद्याविभूषित प्रोफेसरांचे महाविद्यालय असा नावलौकिक प्राप्त करेल यात शंका नाही. या महाविद्यालयातून बाहेर पडणारा विद्यार्थीही चांगले ज्ञान घेवून बाहेर पडत आहे. हिंदसेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी महाविद्यालयाचा शैक्षनिक दर्जा उंचावण्यासाठी कायम प्रयत्नशील असतात.

          संजय जोशी म्हणाले, सारडा महाविद्यालयाचा शैक्षनिक दर्जा वाढण्यासाठी सर्व भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना मिळत आहेत. महाविद्यालयाचे प्राध्यापकही तळमळीने विद्यार्थ्यांना ज्ञानदान करत आहेत.

          अजित बोरा म्हणाले, सारडा महाविद्यालयाच्या पाच प्राध्यापकांनी चांगली महेनात घेवून प्रोफेसर पदावर बढती मिळवली आहे. याचा हिंदसेवा मंडळाच्या पदाधीकारीना व संचालकांना अभिमान आहे.  कार्याक्रमचे सुत्रसंचलन अंकुश आवारी यांनी केले, आभार प्रबंधक अशोक असेरी यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

श्रीमद् देवी भागवत कथा महात्म्य आयोजन

    वेब टीम  नगर : श्री माता शाकंबरी देवी प्रसन्नत्तेसाठी महिला व्यासद्वारे दि.21 ते 28 जानेवारीपर्यंत 2021 दरम्यान अद्यगुरु शंकराचार्य परंपरेनुसार श्रीमद् देवी भागवत कथा महात्म्याचे आयोजन करण्यात आले आहे.  श्री शाकंबरी शक्तीपीठ, औदुंबर मेडिकलच्या मागे, रासनेनगर, सावेडी, नगर येथे होणार्याि  या कार्यक्रमात सायं. 4 ते 6 वाजेपर्यंत पाठ प्रवचन व उपासना चालणार आहे. नगर शहरातील व जिल्ह्यातील सर्व शाकंबरी भक्तांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे.

      तरी या कार्यक्रमास सहकुटूंब, मित्रपरिवारासह उपस्थित रहावे, असे आवाहन विठ्ठल भांड यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मो.9421436397 या क्रमांकावर संपर्क साधावा.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हायजीन फस्ट संस्थेच्या जनजागृतीमुळे खाद्यपदार्थ विक्रेत्यांना स्वच्छतेचे महत्व समजले आहे 

 संजय चोपडा : हायजीन हातगाडी उपक्रमास उत्फूर्त प्रतिसाद

वेब टीम नगर :  नगर शहरात हायजीन फस्ट संस्था करत असलेल्या जनजागृतीमुळे खाद्य पदार्थ विक्रेत्यांना स्वच्छतेचे महत्व समजले आहे. सर्व खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी हायजीन फस्टच्या स्वच्छता निकषांचे पालन केल्यास त्यांच्या व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे. स्वच्छ हॉटेलला ग्राहकांचे कायमच प्राधान्य असते. आनंदधाम चौकातील चौपाटी ही या भागातील शान आहे. हायजीन फस्ट संस्थेने राबवलेल्या हायजीन हातगाडी उपक्रमामुळे येथील खद्यपदार्थांच्या वक्रेत्यांना हायजीनचे महत्व पटले आहे. हायजीन फस्ट ही संस्था फक्त व्यावसायिकांचाच फायदा बघत काम करत आहे, असे प्रतिपादन माजी नगरसेवक संजय चोपडा यांनी केले.

          नगरमध्ये स्वच्छ अन्नपदार्थांसाठी जनजागृती करणाऱ्या हायजीन फस्ट या संस्थेच्या वतीने शहरातील विविध भागात रस्त्यवर हातगाडीवर खाद्याविक्रेत्यांनी स्वच्छतेचे निकष पाळावे यासाठी रोटरी क्लब सेन्ट्रल, आय लव्ह नगरच्या संयुक्त विद्यमाने ‘हायजीन हातगाडी पुरस्कार’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ६ मार्च २०२१ पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात शहरातील माळीवाडा, आनंदधाम चौक चौपाटी, प्रोफेसर कॉलनी चौक, दिल्लीगेट, पारिजात चौक येथील हातगाड्यांवर खाद्यपदर्थ विक्रेत्यांची पाहणी करण्यात येणार आहे. आनंदधाम चौक चौपाटी येथे माजी नगरसेवक संजय चोपडा यांनी तर माळीवाड्यात दत्ता जाधव यांनी सर्व खाद्य पदार्थ विक्रेत्यांना महत्व समजावून सांगितले. यावेळी  हायजीन फस्टच्या दिपाली चुत्तर, वैशाली मुनोत आदी उपस्थित होत्या.

          या उपक्रमाबद्दल माहिती देतांना वैशाली मुनोत म्हणाल्या, नागरिकांना स्वच्छ व निर्जंतुक अन्नपदार्थ मिळावेत यासाठी हायजीन फस्ट या संस्थेच्या व्हॉलेंटीयर्सनी सर्व हातगाडी चालकांनाची भेट घेवून हयाजीनचे महत्व समजावून सांगितले आहे. यामध्ये विक्रेत्यांनी स्वतःची, गाडीची व परिसराच्या स्वच्छतेवर अधिक लक्ष द्यावे. सर्व भांडी स्वच्छ ठेवून अन्न झाकून ठेवावे या छोट्या नियामंचे पालन करावेत. काही दिवसांनी ग्राहकांचा फीडबॅक घेतला जाणार आहे. प्रत्तेक चौकातील ज्या ५ हातगाड्या ज्या हायजीन फस्टच्या स्वच्छतेचे सर्व निकषांचे पालन करेल त्यांना ‘हायजीन हातगाडी’ हा पुरस्कार देवून हायजीन कीट देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व खाद्याविक्रेत्यांनी या उपक्रमात भाग घेवून स्वच्छता पळून हा पुरस्कार मिळवावा, असे आवाहन केले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

२६ जानेवारीला अहमदनगरमधे 'ट्रॅक्टर तिरंगा रॅली' ; दिल्ली किसान आंदोलनाच्या सहभागासाठी अ.भा.किसान संघर्ष समन्वय समितीचा निर्णय

वेब टीम नगर : अहमदनगर येथील हमाल पंचायतच्या कार्यालयात  अ.भा.किसान संघर्ष समन्वय समितीच्या आज झालेल्या बैठकीत ट्रॅक्टर तिरंगा रॅली काढण्याचा   निर्णय घेण्यात आला.

 दिल्ली येथे भारतभरातील शेतकरी संघटना आपल्या न्याय्य हक्कासाठी २६ नोव्हेंबर पासून आंदोलन करत आहेत. शेतकरी, कामगार व सर्वसामान्य भारतीयांच्याविरोधात असलेले आणि जागतिक भांडवलदारांच्या दबावाखाली केलेले तीन नवीन देशविरोधी कृषी कायदे रद्द करणे आणि कामगार, कर्मचारीविरोधी श्रमसंहितेलाला विरोध करण्यासाठी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. सरकार देशप्रेमी अन्नदाता शेतक-यांचे ऐकायला तयार नाही. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे जाचक कायदे रद्द झालेच पाहिजे. ही भूमिका व भावना देशभरातील लोकांची आहे. महाराष्ट्रातील शेतकरी कामगार संयुक्त मोर्चाची बैठक दि.१२ जानेवारी रोजी मुंबई येथे पार पडली. त्यामधे २३ ते २६ जानेवारीला मुंबईत आझाद मैदान येथे महापडाव आणि ध्वजवंदन करण्याचे ठरवले आहे. ज्यांना तेथे जाणे शक्य नाही त्यांनी आपापल्या गावी, वाडी, वस्ती व शेतात आपल्या ट्रॅक्टरला तिरंगा लावून मी दिल्ली येथील शेतकरी आंदोलकांसोबत आहे. असे सरकारच्या निदर्शनास आणून द्यावे. येथे आज झालेल्या बैठकीत २६ जानेवारी रोजी अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी आणि अहमदनगर शहरात सकाळी ११ वाजता एसटी स्टँड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ट्रॅक्टर तिरंगा रॅलीची सुरूवात होईल.

 रॅलीचा मार्ग पुढे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, चांदनी चौक, स्टेट बँक चौक, इदगाह मैदान, डीएसपी चौक आणि पत्रकार चौकातील शहीद भगतसिंह यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करून रॅलीची सांगता होईल. सदर बैठकीस राज्य कर्मचारी संघटनेचे नेते रावसाहेब निमसे, सुभाष तळेकर, भा.क.प.चे राज्य सहसचिव ॲड. कॉ.सुभाष लांडे, मा.क.प.चे कॉ.प्रा.डॉ.महेबुब सय्यद, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, विडीकामगार संघटनेचे अंबादास दौंड, अ.भा.किसानसभेचे ॲड.कॉ. बन्सी सातपुते, पीस फौंडेशनचे आर्कि.अर्शद शेख, ग्रामपंचायत आणि पतसंस्था कर्मचारी संघटनेचे ॲड.कॉ.सुधीर टोकेकर, कामगार संघटना महासंघाचे भैरवनाथ वाकळे आदी उपस्थित होते. अहमदनगर जवळपासच्या ट्रॅक्टरधारक शेतकरी बांधवांनी आपापल्या ट्रॅक्टरवर तिरंगा लावुन आपली जबाबदारी म्हणून या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांना ट्रॅक्टरसह या रॅलीमधे सहभागी व्हायचे आहे त्यांनी अविनाश घुले -९७६५१६१६१६  भैरवनाथ वाकळे ९४०५४०१८००या व्हॉट्सॲप क्रमांकावर नोंदणी करावी. असे कॉ भैरवनाथ वाकळे यांनी कळविले आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कृतीतून दिला अंडी, कोंबड्या खाण्यापासून धोका नसल्याचा संदेश

 जिल्हाधिकारी भोसले , कोरोना विषयक सल्लागार म्हैसेकर सहभागी :  बर्ड फ्लूची भिती , गैरसमजूतीमधून बाहेर येण्यासाठी जनजागृतीचा अनोखा उपक्रम

वेब टीम नगर : बर्ड फ्लूच्या भितीने गैरसमज व अफवा पसरुन नागरिकांनी अंडी व कोंबड्याचे मास खाण्याचे बंद केल्याने कुक्कटपालन करणार्या  व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वयभूमीवर अहमदनगर जिल्हा पोल्ट्री असोसिएशनच्या वतीने सोमवारी (दि.१८जानेवारी) चिकन मेजवाणीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्वत: जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले व राज्य शासनाचे कोरोना विषयक सल्लागार डॉ.दिपक म्हैसेकर यांनी या मेजवाणीत सहभागी होऊन कृतीतून चिकन व अंडी खाण्यास सुरक्षित असल्याचा संदेश दिला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ.सुनिल तुंबारे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त बी.एन. शेळके, पोल्ट्री असोसिएशनचे डॉ.देवीदास शेळके, विनय माचवे, रोहीदास गायकवाड, दत्ता सोनटक्के, संतोष कानडे, दीपक गोळख, डॉ.उमाकांत शिंदे, विठ्ठल जाधव, कैलास झरेकर, संदीप काळे, रविंद्र गायकवाड आदींसह पोल्ट्री असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी भोसले व कोरोना विषयक सल्लागार डॉ.दिपक म्हैसेकर यांनी महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव दिसत असला तरी अंडी व कोंबड्या खाण्यापासून कोणताही धोका नसल्याचे सांगून, चुकीच्या गोष्टी व अफवाला बळी न पडण्याचे आवाहन केले. जिल्ह्यात अफवा व गैरसमज पसरल्याने पोल्ट्री व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. कोंबडी व अंडी खाल्ल्याने बर्ड फ्लू होतो. याला कोणताही शास्त्रीय आधार नसून, यापासून धोका नाही. कोरोनानंतर बर्ड फ्लूचे संकट महाराष्ट्रात आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. काही जिल्ह्यात बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने समाजमाध्यमांवर चुकीचे संदेश पसरल्याने नागरिकांनी कोंबड्याचे मास व अंडी खाने बंद केले आहे. यामुळे जिल्ह्यातील कुक्कटपालन करणार्याक व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. नुकतेच पोल्ट्री असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. केवळ गैरसमज व अफवा यामुळे हा व्यवसाय अडचणीत येऊ नये, शेतीपुरक व्यवसायात पशुधनानंतर कुक्कटपालनात जिल्हा आघाडीवर आहे. याची घडी बिघडू नये, यासाठी पोल्ट्री असोसिएशनने घेतलेला पुढाकार व त्याला जिल्हाधिकारी व कोरोना विषयक सल्लागारांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद कौतुकास्पद ठरला. तर या चिकनच्या मेजवाणीतून चिकन व अंडी खाणे पुर्णत: सुरक्षित असल्याचा संदेश देण्यात आला आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------        


Post a Comment

0 Comments