मूलमंत्र आरोग्याचा : योगसाधना,आरोग्य आहार

  मूलमंत्र आरोग्याचा 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

योगसाधना

सर्वांगासन 

भूमिका : सर्वांगासन ही विपरीत करणी च्या पुढची अवस्था आहे.एकूण अगणित अशा योगासनांची आठ-दहा महत्त्वाची योगासने मानले जातात त्यात सर्वांगासनाचा क्रमांक बराच वर लागतो.सर्व शरीरावर परिणाम करणाऱ्या ग्रंथींची कार्यक्षमता या आसनामुळे वाढविली जाते.म्हणून याला सर्वांगासन असे म्हटलेले आहे.योग विषयक बहुतेक जुन्या ग्रंथात या सणाचा प्रामुख्याने उल्लेख केलेला आढळतो. 

क्रिया :

आसनस्थिती घेणे

पूर्वस्थिती शयानस्थिती : 

1.श्वास सोडा व श्वास घेत घेत दोन्ही पाय सरळ वर उचला व जमिनीशी काटकोनात ठेवून उत्तानपादासन अशी अवस्था घ्या.  

2.श्वास सोडत सोडत कंबर वर उचला व पाय डोक्याच्या दिशेने मागे न्या. 

3.श्वास घेत पाठ आणखी वर उचला व दोन्ही पाय सरळ करुन पाठही त्या रेषेत सरळ करा व दोन्ही हाताच्या पंजांनी बरगडी जवळ आधार देऊन पाय,कंबर व पाठ एका सरळ रेषेत जमिनीशी लंब स्थिर करा.  दृष्टी पायाच्या अंगठ्याकडे स्थिर करून श्वसन संथपणे चालू ठेवा. 

आसनस्थिती सोडणे: 

१.श्वास घ्या व श्वास सोडत कमरेत वाकून पाय मागे डोक्याच्या दिशेने न्या व दोन्ही हात जमिनीवर टेकवा. 

२.श्वास घेत घेत हळूहळू पाठ जमिनीवर टेकवा व पाय जमिनीशी काटकोनात उभे करून द्विपाद उत्तानपादआसनाची अवस्था घ्या. 

३.श्‍वास सोडत दोन्ही पाय सावकाश खाली आणून जमिनीवर टेकवा व शयनस्थिती घ्या. 

 कालावधी 

हे  आसन चांगले जमले तर ते सहजपणे अधिक वेळ पर्यंत स्थिर ठेवता येते.उलट अर्धवट जमलेले असं थोडा वेळ सुद्धा राहू शकत नाही.अभ्यासाने हे असं अर्धा एक तासात पर्यंत सुद्धा स्थिर ठेवता येते.याच आसनाचा स्वतंत्रपणे अभ्यास करण्याकरता एवढा वेळ खर्च करणे ठीक आहे परंतु कमीत कमी 3 मिनिटे तरी हे असं स्थिर ठेवता आले तर यापासून अपेक्षित असे फायदे मिळतात.

विशेष दक्षता : डोकेदुखी,मेंदूचे विकार,रक्तदाब वगैरेसारख्या रोगांनी पीडित झालेल्यांनी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शिवाय या आसनाचा अभ्यास करू नये. सामान्य अभ्यासकांनी सुद्धा पास सहा मिनिटांपेक्षा अधिक कालावधी वाढवायचा असेल तर तत्पूर्वी तज्ञांचा सल्ला घेतलेला चांगला. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आरोग्य आहार 
कारल्याची भरली भाजी 


साहित्य : पाव किलो कोवळी कारली, मोठे कांदे किसून, एक टेबल स्पून आमचूर पावडर, एक चमचा धने जिरे पावडर, १ टी. स्पून गरम मसाला, १ टी स्पून  लाल तिखट, ५-६ लसूण पाकळ्या सोलून बारीक चिरून,  मीठ चवीनुसार,दोन डाव तेल.

कृती :

कारल्याचा वरचा कडबडीत भाग खरवडून काढावा व मधोमध काप देऊन आतला बियांचा भाग काढून टाकावा. 

किसून घेतलेल्या कांद्याचे पाणी काढून टाकावे. त्यात लाल तिखट, मीठ,जिरे पावडर,गरम मसाला, आमचूर पावडर, चिरलेला लसूण सर्व मिसळावे.   

कारल्याच्या कापलेल्या भागात हा मसाला भरावा व कारलं डोरा गुंडाळून घट्ट बंद करावा. 

कदाचीत २ डाव तेल गरम करून सर्व कारली त्यात टाकावीत व मंद आचेवर कारली शिजेपर्यंत परतावेत. 

कारली शिजल्यावर दोरा काढून टाकावा व कारली सर्व्ह करावीत. 

टीप : या भाजीत किसलेला कांदा न घालता , दोन कांदे चिरून सोनेरी रंगावर टाळून , हाताने कुस्करून मसाल्यात घ्यावेत व त्यात १ टी.स्पून, बडीशेप अर्धवट कुटून घालावी. १ टे. स्पून धने जिरे पावडर घ;ऊन कोरडा मसाला भरावा.छान कोरडी भाजी होते.व २ ते ३ दिवसांपर्यंत टिकते.   

Post a Comment

0 Comments