शिवसेनाच सर्वात जास्त ग्रामपंचायती जिंकणारा पक्ष

शिवसेनाच सर्वात जास्त ग्रामपंचायती जिंकणारा पक्ष 

वेब टीम मुंबई : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी मतमोजणीनंतर शांत झाली आहे.काल १८ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला. राज्यात जवळपास  १२ हजार ७११ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले आहे.  या निकालात राज्यातली अनेक मोठ मोठ्या नेत्यांना मतदारांनी धक्का दिला तर काही काही नेत्यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिध्द केले . या निकालानंतर राज्यामधील सर्वच राजकीय पक्षांकडून आपल्या आपल्या प्रमाणे दावे करून यानिवडणुकीत आपल्याच पक्षाला विजय मिळाल्याचं सांगितलं. 


मात्र आता या ग्रामपंचायत निवडणुकीचं चित्र स्पष्ट झाले असून ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक जागा शिवसेनेने जिकंल्या  आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर भारतीय जनता पक्ष आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्र्वादी काँग्रेस  तर काँग्रेस चौथ्या स्थानावर आहे. काल भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपला पक्ष नंबर एकचा पक्ष आहे असे विधान करत महाविकास आघाडीवर टीका केली होती . तर दुसरी कडे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाने ४ हजार ग्रामपंचायत जिंकेल असे विधान त्यांनी केला होता.

पक्षीय पातळीवर किंवा पक्षांच्या चिन्हावर राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका या लढविल्या जात नाहीत. परिणामी सर्वच राजकीय पक्षांकडून सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला जातो व तसाच दावा या वेळीही सर्वपक्षीयांनी केला होता. भाजपा व महाविकास आघाडीतील पक्षांच्या नेत्यांकडून १४,२३४ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा करण्यात आला आहे. 

१२,७११ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत ३ हजार ११३ जागा शिवसेनेनं जिंकल्या असून, सर्वाधिक जागा जिंकणारा पहिल्या क्रमाकाचा पक्ष ठरला आहे. तर २ हजार ६३२ जागा भाजपने जिंकत दुसऱ्या क्रमांकावर आहे. २४०० जागांसह राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमाकावर आहे. काँग्रेसनेही राज्यात १८२३ जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ३६ जागी विजय मिळविला आहे. तर २ हजार ३४४ अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

Post a Comment

0 Comments