नगरटुडे बुलेटीन 13-01-2021

 नगरटुडे  बुलेटीन 13-01-2021

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अहमदनगरमध्ये साकारतेय जिजाऊ संस्कार केंद्र 

 इंजि.अभिजित वाघ : मराठा सेवा संघ व इतिहास प्रेमी मंडळाच्यावतीने राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त अभिवादन

    वेब टीम  नगर : आज राष्ट्रमाता जिजाऊ यांची ४२२वी जयंती. जगभर साजरी होय आहे. महापालिकेने सावेडी उपनगरात भिस्तबाग येथे मराठा सेवा संघास दहा हजार स्क्वेअर फूट मोकळा भुखंड काही अटींवर विकसित करण्यासाठी दिलेला आहे. लवकरच या ठिकाणी ’जिजाऊ संस्कार केंद्र’चे भुमिपुजन मराठा सेवा संघाचे संस्थापक इंजि.पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या ठिकाणी महिला व मुलांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून सुंदर असे ’जिजाऊ संस्कार केंद्र’ सर्व समाज बांधवांसाठी उभारण्यात येणार आहे, असे मराठा सेवा संघाचे महानगर अध्यक्ष इंजि.अभिजित एकनाथ वाघ यांनी सांगितले.

     मराठा सेवा संघ व इतिहास प्रेमी मंडळाच्यावतीने राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त वस्तू संग्रहालय येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे महानगर अध्यक्ष इंजि.अभिजित एकनाथ वाघ, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष आसिफ दुलेखान, मुस्कान असोसिएशनचे शफाकत सय्यद, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजि.सुरेश इथापे, संध्या मेढे, दत्ता वडवणीकर, उबेद शेख, आबीद खान आदि उपस्थित होते.

     या संस्कार केंद्रात जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण, मार्गदर्शन शिबीरे आयोजित करण्यात येणार आहेत तसेच छोटेमोठे घरगुती व्यवसाय उभारुन त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. लहान मुलांना व्यक्तिमत्व विकास,  शैक्षणिक असे विविधांगी मार्गदर्शन केले जाईल. यामध्ये हस्ताक्षर सुधारणे, विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र, वाचनालय, क्रिडा मार्गदर्शन आदी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. असे इंजी.अभिजीत  वाघ यांनी सांगितले.

     याप्रसंगी  आसिफ खान, संध्या मेढे आदिंनीही जिजाऊंच्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या अनुपमा दारकुंडे, डॉ.कल्पना ठुबे, सुरेखा कळस, अनुराधा येवले, संपुर्णा सावंत, जयश्री कुटे, शारदा पवार, अण्णपुर्णा धस, रेणुका दौंड, अनिता काळे, कोमल वाकळे, वंदना निघुत, सुरेखा सांगळे, मिनाक्षी जाधव आदि उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जिजाऊंमुळे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे रयतेचे राजे घडले 


 किरण काळे : जिजाऊ जयंती निमित्त काँग्रेसच्या वतीने अभिवादन 

वेब टीम नगर : समाजामध्ये अनागोंदी माजलेली असताना जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष घडविला. जिजाऊंच्या शिकवणीमुळेच शिवाजी महाराज रयतेचे राजे होऊ शकले, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. 

जिजाऊ जयंतीनिमित्त काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अहमदनगर वस्तुसंग्रहालयातील जिजाऊंच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले. यावेळी काळे यांच्यासह खलील सय्यद,  नलिनीताई गायकवाड, अनंतराव गारदे, फारुखभाई शेख, अनिसभाई चुडीवाल, नाथा अल्हाट, चिरंजीव गाढवे, सुजित जगताप, ॲड.अक्षय कुलट, नीता बर्वे, कौसर खान, प्रमोद अबुज, अमित भांड, प्रवीण गीते,  सिद्धेश्वर झेंडे, अज्जूभाई शेख, प्रसाद शिंदे, प्रशांत वाघ, ॲड.चेतन रोहोकले आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

विद्यार्थी काँग्रेसचा सुसंस्कृत युवा घडविण्याचा संकल्प 

जिजाऊ जयंतीनिमित्त विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने विद्यार्थीचे शहर जिल्हाध्यक्ष चिरंजीव गाढवे, सुजित जगताप यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी, युवकांनी मोठ्या संख्येने एकत्रित येत छत्रपती शिवाजी महाराजांच्या एसटी स्टँड येथील पुतळ्याला हार घालून शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केला. यामुळे परिसर दणाणून गेला होता. 

यानंतर शांततेच्या मार्गाने विद्यार्थी, युवक जिजाऊ पुतळ्याच्या ठिकाणी एकत्र जमले. यावेळी बोलताना चिरंजीव गाढवे म्हणाले की, जिजामातांनी शिवाजी महाराजांना वैचारिक शिकवण दिली. जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नगर शहरामध्ये विद्यार्थी, युवक यांचे संघटन काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मजबूत करत असताना जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शहरात सुसंस्कृत युवापिढी निर्माण करण्याचा संकल्प जिजाऊ जयंती निमित्त केला आहे. 

सुजित जगताप म्हणाले की, विद्यार्थी, युवक हे देशाचे भविष्य आहेत. शहरातील राजकारणाचे झालेले गुन्हेगारीकरण हे किळसवाणे असून आम्ही विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून सदमार्गाने जाणारे, शहराबद्दल आत्मीयता असणारे, तसेच उद्योजकता, स्वयंरोजगार त्याचबरोबर युवकांसाठी रोजगार निर्मितीसाठी धडपडणारे युवा घडवण्याचा व्यापक विचाराने प्रेरित होवून काम करीत आहोत. या मोहिमेत ना. बाळासाहेब थोरात, आ. सुधीर तांबे, युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे, किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तरुण निश्चित यशस्वी होऊ असा विश्वास जगताप यांनी यावेळी व्यक्त केला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पिढी घडविण्यात थोर व्यक्तीमत्वाच विचार मोलाचे 

 बाळासाहेब बोराटे : श्री सावताश्रम शिक्षण संस्थेच्यावतीने  राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

    वेब टीम  नगर : राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांनी समाजाला जागृत करुन राष्ट्र निर्माण कार्यात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यकर्तुत्व आजही आपणासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे विचार विद्यार्थी, युवकांमध्ये रुजविले गेले पाहिजे. एक आदर्श पिढी घडण्यासाठी राष्ट्र पुरुषांचे विचार मोलाची भुमिका बजावत असतात. श्री सावताश्रम शिक्षण संस्थेच्यावतीने या थोर महापुरुषांच्या कार्याचा आठवण भावी पिढीला देण्याचे कार्य केले जात आहे, असे प्रतिपादन श्री सावताश्रम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केले.

     श्री सावता श्रम शिक्षण संस्थेच्यावतीने महात्मा फुले विद्या मंदिर व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, मुख्याध्यापक राजकुमार शिंदे, मुख्याध्यापिका सुनिता पालवे, हर्षल म्हस्के आदिंसह शिक्षकवृंद उपस्थित होते.

     यावेळी मुख्याध्यापक राजकुमार शिंदे यांनी राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्यात मोठी भुमिका बजावली आहे. अशा थोर व्यक्तीमत्वाच्या मार्गादर्शनाने अवघा महाराष्ट्र उभा राहिला आहे. त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद यांनी अवघ्या जगाला बंधू-भगिनीची उमपा देऊन युवकांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत केले. अशा थोर व्यक्तीमत्वांचा जीवन कार्याचा गौरव केल. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

थोर व्यक्तीमत्वांचे विचाराने आजची युवा पिढी घडत आहे 

 भैय्या गंधे : भाजपा युवा मोर्चाच्यावतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ  जयंतीनिमित्त अभिवादन

    वेब टीम नगर : स्वामी विवेकानंदांनी ‘माझ्या बंधू आणि भगिनीनों’ असे म्हणत मानवतावादी दृष्टीकोन जगासमोर मांडला. माझा देश धर्मनिरपेक्ष व राष्ट्रीय एकात्मता बाळगणारा आहे, असे विचार शिकागो परिषदेत मांडले. स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत जीवनात अडीअडचणींना डगमगु नका, स्थिर राह, अडीअडचणींना हसत सामोरे जा. युवकांना अन्यायाविरुद्ध चिड असली पाहिजे, त्या संघर्षातून नवभारताची निर्मिती होणार आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना 18 पगड जाती-धर्माच्या लोकांना एकत्र करुन स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली. जिजाऊ या स्वराज्याच्या प्रेरणास्थान होत्या. समान न्याय देण्याची वृत्ती, स्त्री हक्क आणि अन्याय करणार्‍याला कठोर शिक्षा देण्यातही जिजाऊ सर्वपरिचित होत्या. थोर व्यक्तीमत्वांचे विचार आचारणात आणून आजची युवा पिढी घडत आहे. आजचा युवक हा देशाचे भवितव्य असून, तो देशाचा सुजान नागरिक घडणार आहे, असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी केले.

     भाजपा युवा मोर्चाच्यावतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, ज्येष्ठ नेते सुनिल रामदासी, उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष महेश तवले, अमोल निस्ताने, आशिष आनेचा, यश शर्मा, आदेश गायकवाड आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी महेश तवले, म्हणाले, स्वामी विवेकानंदांनी आपल्या ज्ञानाच्या जोरावर भारताचे नाव जागतिक पातळीवर नेले. त्यांचे विचारांचा अनेक देशातील युवकांनी पुरस्कार केला होता. त्यांची व्यापक दृष्टी सर्वांना बरोबर घेऊन एक सक्षम समाज घडविणारी होती. तसेच आलेल्या प्रत्येक प्रसंगाला धैर्याने व खंबीरपणे सामोरं जाण्याचं बळ जिजाऊंकडे होते. हिंदवी स्वराज्याची संकल्पना सत्यात उतरवण्यास शिवाजी राजेंना सामाजिक ज्ञान, राजकीय चातुर्य संघटन कौशल्य व अंगी असलेलं पराक्रमाचे धडे देणार्‍या जिजाऊंनी नेहमीच रयतेच्या कल्याणावर भर दिला.     कार्यक्रमास अभिजित सोनवणे, सुबोध रसाळ, अजित कोतकर, साहिल शेख, आशिष देशमुख, आदिनाथ दहिफळे, मुकुंद पंत आदि उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शक्यतेची सीमा जाणुन घेण्यासाठी,अशक्यतेच्या पुढे निघुन जायला हवे  : प्रविण मुत्याल

वेब टीम नगर :  आज आपल्या आचरणात आणि वर्तणुकीत खूप मोठा बदल घडत आहे. आपण स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ यांचे आचार आणि विचारांवर काम केले पाहिजे. स्वामी विवेकानंद यांनी अध्यात्मिक शिक्षणाचे महत्व समजावून सांगितले आहे. अध्यात्मिक विचारांच्या जोरावर आपण जग जिंकु शकतो, असे ते म्हणायचे.  आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात युवकांनी अध्यात्मिक आचार–विचार अंमलात आणावेत. शक्यतेची सीमा जाणुन घेण्यासाठी, अशक्यतेच्या पुढे निघुन जायला हवे, असे प्रतिपादन बाल कल्याण समितीचे सदस्य प्रविण मुत्याल यांनी केले.

स्नेहालय संस्थेत जागतिक युवा दिन, स्वामी विवेकानंद जयंती आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताचे औचित्य साधून अभिवादन कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मा. विशाल अहिरे (प्रकल्प व्यवस्थापक, युवा निर्माण प्रकल्प), मा. संजय चाबुकस्वार (नियंत्रण अधिकारी, स्नेहालय), मा. कजोरी दास (प्राचार्य, स्नेहालय इंग्लिश मेडीयम स्कूल) आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणले की, दिवसभरातून एकदा तरी स्वतःशी संवाद साधा, तसे केले नाही तर तुम्ही या जगातील एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल.विशाल अहिरे यांनी स्वामी विवेकानंदानी सांगितल्याप्रमाणे उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत तुमचे लक्ष्य साध्य होत नाही तो पर्यंत थांबू नका, असे उपस्थितांना कानमंत्र दिला. कार्यक्रमाच्या प्रास्तविकतेत कजोरी दास यांनी स्नेहालय इंग्लिश मेडीयम स्कूल बालकांसाठी राबवित असलेले विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रम, कला– गुण–कौश्यले विकसित करण्यासाठी वार्षिक स्नेह संमेलन, हिवाळी क्रीडा स्पर्धा आदी उपक्रमाविषयी माहिती दिली. 

कार्यक्रमाचे सूत्र संचालन दिपक माळवी यांनी केले तर उपस्थितांचे आभार सचिन ढोरमले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कावेरी रोह्कले, बेबी केंगार, संदीप क्षिरसागर, जयश्री खरात, नवनाथ उंडे, राजेंद्र देवकर, निखील मन्तोडे आदींनी परिश्रम घेतले. 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आदर्श व्यक्तीमत्वांचे विचाराच समाजातील अनिती संपवू शकते

 सुरेखा कदम : लायनेस क्लब ऑफ मिडटाऊनच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

    वेब टीम  नगर : संत, महंत, विचारवंत, क्रांतिकारक यांनी मानव कल्याण आणि स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचले, तर काहींनी प्राणपणास लावले. मानव कल्याणाचा विचार सार्‍या विश्‍वाला देत हिंदू संस्कृतीची जगाला नव्याने ओळख करु देत मानवी जीवनाला व युवा शक्तीला ऊर्जा प्राप्त करुन देण्याचे काम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांनी केले आहे. आज या थोर व्यक्तींचे विचार आणि कार्य कृतीतून दिसले पाहिजे. समाजात स्त्रीयांवर वाढत चालले अत्याचार, विकृतीने युवा पिढी भरकटत चालली आहे. अशा परिस्थिती थोरांची शिकवण आणि विचार समाजात रुजविण्याची गरज आहे. माँ जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडविले तर विवेकानंदांनी युवा पिढीला ‘बंधू-भगिनी’च्या रुपाने विश्‍वाला प्रेरणा दिली. आज या व्यक्तीमत्वांचे विचाराच समाजातील अनिती संपवू शकते. त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन

     लायनेस क्लब ऑफ मिडटाऊच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षा सुरेखा कदम, माजी अध्यक्षा राजश्री मांढरे, सचिव शारदा होशिंग, नगरसेविका सुवर्णा गेनप्पा, सविता जोशी, सविता शिंदे, सुरेखा भोसले, अरुणा गोयल, कांता बोठे आदि उपस्थित होत्या.

     यावेळी शारदा होशिंग म्हणाल्या समाजाच्या उद्धारासाठी आपले आयुष्य पणाला लावणारे अनेक थोर-महात्म्या होऊन गेले आहेत. समाजातील दु:ख कमी व्हावे, समाज जागृत व्हावा यासाठी त्यांनी कार्य केले. त्यांचे विचार व कार्याची आठवण प्रत्येक पिढीला झाली पाहिजे. यासाठी विविध उपक्रमांची गरज आहे. अशा उपक्रमातून समाजप्रबोधनाचे काम होत असते. माँ जिजाऊ कर्तुत्व व स्वामी विवेकानंद यांचे विचार सक्षम समाज घडविण्यासाठी प्रेरक आहेत.

     याप्रसंगी राजश्री मांढरे यांनी लायनेस क्लबच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बासरी वादन स्पर्धेत शिवराज भोर भारतात प्रथम

     वेब टीम नगर : छत्तीसगड येथील नाट्य नर्तन संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या ऑल इंडिया संगीत, नृत्य, नाट्य कला स्पर्धा फेस्टीव्हलमध्ये नगरच्या संगीत बहार गुरुकुल विहाराचा साधक शिवराज बाबा भोर याने हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत वाद्य वादन ऑनलाईन स्पर्धेत ज्युनिअर गटात सहभागी होऊन बासरी वादनात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. देशपातळीवर झालेल्या या स्पर्धेत अनेक राज्यातून कलाकार सहभागी झाले होते. ही स्पर्धा गेला महिनाभर सुरु होती. त्याचा अंतिम निकाल ११ जानेवारी २०२१ रोजी जाहीर झाला.

     शिवराज बाबा भोर हा प्रख्यात बासरी वादक जितेंद्र रोकडे यांचा शिष्य आहे. शिवराज हा या आधीही एका नामांकित स्पर्धेत भारतात तिसरा आला होता. तसेच त्यास अनेक वेगवेगळ्या स्पर्धेत बक्षिस मिळाले आहे. संगीत क्षेत्रात काम करणार्‍या अनेक संस्थेत त्याचे सोलो वादन झालेले आहे. तसेच डॉ.केशव गिंडे, पंडित राजेंद्र प्रसन्ना, पं.पारसनाथ यासारख्या नामवंत दिग्गज कलाकारांची आशिर्वादरुपी बक्षिसांची  थाप शिवराजला मिळाली आहे.

     अशा या मराठी बाल कलाकाराने महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करत पारितोषिकाच्या रुपाने सांगतिक क्षेत्रात भर घातली आहे.  शिवराजला त्याचे आई-वडिल, बहिण, गुरुकुलातील साधक बंधू-भगिनी व गुरु जितेंद्र रोकडे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्वातंत्र्याची स्फुर्ती देण्याचे अतुलनीय कार्य जिजाऊंनी केले

मुशताक कुरैशी : मुस्लिम समाजाच्या वतीने जिजाऊंना अभिवादन

वेब टीम नगर : जुलमी, अत्याचारी, परकीय सत्ताधीशांच्या जोखडात शेकडो वर्षे खितपत पडलेल्या महाराष्ट्रासह मराठी मनाला स्वातंत्र्याची स्फुर्ती, प्रेरणा देण्याचे अतुलनीय कार्य राजमाता जिजाऊ यांनी केले, असे प्रतिपादन माजी नगरसेवक मुशताक कुरैशी यांनी केले.

जिजाऊ जयंतीनिमित्त मुस्लिम समाजाच्यावतीने ऐतिहासिक वस्तू संग्रहालयातील जिजाऊं व शहाजी राजे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी प्राचार्य कादीर सर, कांग्रेसचे उबेद शेख,ईकबाल भाई अड्डेवाले, शरीफ खान, मुन्नाभाई चमडेवाले, वहाब सैय्यद, राजा सौदागर, जुबेर शेख, सैय्यद अ.रहेमान,शफकत सय्यद,आसिफ दुलेखान, सलीम रेडियमवाला, आबीद खान, आदि उपस्थित होते.

पुढे बोलताना मुशताक कुरैशी म्हणाले, रयतेच्या स्वतंत्र्य-सार्वभौम स्वराज्य निर्मितीची संकल्पनाच जिजाऊंची होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत इतिहासाला कलाटणी देण्याचे कार्य शिवछत्रपतींकडून जिजाऊंनी करवून घेतले. राष्ट्र निर्मितीच्या व्यापक भावनेने केलेले हे कार्य आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे, असे सांगितले.

यावेळी बोलताना उबेद शेख म्हणाले, शिवछत्रपतींना घडविणार्‍या आणि आयुष्यभर निरपेक्ष बुद्धीने कार्य करणार्‍या जिजाऊ श्रीमान योगिनी ठरल्या. राजाचं जनतेशी कल्याणकारी नात असतं, याउपर जिजाऊंचे जनतेच्या वेदनेशी नातं होतं. आपल्या रयतेची पोटच्या पोराप्रमाणे काळजी करणार्‍या राजमाता- राष्ट्रमाता जिजाऊच होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उबेद शेख यांनी केले तर प्रास्तविक कादीर  यांनी केले तर आभार आबीद खान यांनी मानले. याप्रसंगी मुस्लिम समाजातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.(फोटो-जिजाऊ )


Post a Comment

0 Comments