आमची गांधीगिरी ... शिर्डी ग्रामस्थांचे तृप्ती देसाईंना पत्र

आमची गांधीगिरी ... शिर्डी ग्रामस्थांचे तृप्ती देसाईंना पत्र  

वेब टीम शिर्डी : काल भूमाता ब्रिगेडच्या काही कार्यकार्त्यांनी शिर्डी देवस्थानच्या वतीने ड्रेसकोड बाबत लावण्यात आलेल्या फलकावर गामिनीकाव्याने काळी शाई टाकली त्यानंतर शिर्डी ग्रामस्थांनी तृप्ती देसाई यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाची गांधीगिरी करत तृप्ती देसाईंना उद्देशून एक पत्र लिहिले आहे हे पत्र सामाजिक कार्यकर्त्या रेखा वैद्य यांनी नगरटुडेला दिले असून ते पत्र नगरटुडेच्या वाचकांसाठी देत आहोत.  


शिर्डी ग्रामस्थांचे भूमाता ब्रिगेडला पत्र 

 तृप्ती ताईंच्या कार्यकर्त्यांनी बाबांच्या मंदिर परिसरातील ड्रेसकोड विनंती बोर्डाला काळे फासले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार, कारण शिर्डीत येणारा भाविकांचे त्याकडे लक्ष जात नव्हते तर वाचण्या एव्हडा वेळही त्यांच्याकडे नव्हता पण हा माझा भारत देश आहे आणि देशातील करोडो भक्तांची श्रद्धेची नाळ साईबाबांशी जुळलेली आहे ती कधीच तुटू शकत नाही हाच आमचा विश्वास आहे.आपल्या कृत्यामुळे निदान प्रत्येकाला ह्या बोर्डवरचा मजकूर नक्कीच समजला आणि आता भाविकांनीच मंदिरातील सात्विकता जपण्याचा मानस केला आहे.गुरुवारच्या आपल्या आंदोलनाचे चित्रीकरण करणारा गद्दाराचे आभार, आणि ज्यांना माहीत असूनही त्यांनी केवळ स्टंटमुळे प्रसिद्धी मिळते ह्या केविलवाण्या गैरसमजातून पाठिंबा दिला त्यांचेही आभार !

तृप्तीताई तुम्हाला श्रद्धा सबुरीचा अर्थच कळाला नाही त्यासाठी कृपया साई सच्चरित्र नक्की वाचा.एका फकिराच्या नगरीत तुम्ही आंदोलन करून प्रसिद्धीचा कट जरी यशस्वी झाला असला तरी बाबांना व बाबांच्या भक्तांना वेदना नक्की झाल्या आहेत.कदाचित आपल्याला माहीत नसेल की, बाबांच्या हयातीपासून सटका हा शिक्षेसाठी प्रचलित हत्यार आहे आणि त्याचा प्रत्यय आजही अनेक जणांना आला आहे, त्याच सटक्याचा मार दिसत नसला तरी तुम्हाला त्याची प्रचिती नक्की येईल हे येत्या काळातच सर्वांना दिसेल.तृप्तीताई एक महिला म्हणून तुमचा आदर नेहमी राहील परंतु साई सचरित्रातील एका अध्यायात असाच बदनामीचा डाव एका महिलेने केला होता परंतु पायातील घुंगराचा चाळ तुटून पडला आणि तीच महिला बाबांच्या चरणी लीन झाली हा इतिहास आहे.आपला प्रसिद्धीचा केविलवाणा प्रकाराने आपल्याला नक्कीच समाधान मिळाले तरी भाविकांच्या आणि शिर्डी ग्रामस्थांच्या न भरून येणाऱ्या जखमा तुम्हाला वेदना देणार आहेत, आपण कधीही शिर्डीत या आणि साईंचे दर्शन घ्या आम्ही छत्रपतींच्या संस्काराचा वारसा जपत तुम्हाला साडी चोळी अर्पण करून वाटी लावू ! खरं तर पोलिसांनाही विनंती करणार आहोत की त्यांना माफ करा कारण त्याच कार्यकर्त्यांमुळे आमच्या भारतीय संस्कृतीचा मेसेज अर्थात भारतीय पोशाख हा देश विदेशात पोहचला आहे त्याबद्दल तुमचे आणि तुमच्या कार्यकर्त्यांचे आभार मानावे तेव्हडे कमीच आहे.तुम्ही फक्त बोर्डाला काळे फासले परंतु श्रद्धा असेल तर आरशात नक्की पहा तुमचेच काळे झालेले तोंड त्यात दिसेल हाच आमच्या बाबांचा चमत्कार असेल.

आमचा शिर्डीकर निषेध करणार नाही परंतु एक भक्त असाही आहे जो लेखणीतून गांधीगिरी करून आपल्या भावनांना वाट करून भविकांसमोर मांडत आहे. 

असे पत्र शिर्डीतील सर्व ग्रामस्थांचे प्रतिनिधी म्हणून  पत्रकार राजेंद्र भुजबळ यांनी लिहिले आहे असे सामाजिक कार्यकर्त्या रेखा वैद्य यांनी सांगितले आहे .



    

Post a Comment

0 Comments