हिवरेबाजारात ३० वर्षानंतर पहिल्यांदाच होणार ग्रामपंचायतीसाठी मतदान

हिवरेबाजारात ३० वर्षानंतर पहिल्यांदाच होणार ग्रामपंचायतीसाठी मतदान 

वेब टीम नगर : देशात दिशा दर्शक ठरलेल्या आदर्शगांव हिवरेबाजार ची बिनविरोध निवडणुकीची परंपरा ३० वर्षानंतर प्रथमच खंडित होणार आहे.ग्रामविकासामुळे केवळ राज्यातच नव्हे देशातील इतर गावांना आतापर्यत बिनविरोध निवडणुकीचा कानमंत्र देणार्‍या गावात आता प्रथमच निवडणुकीच्या  प्रचाराची रणधुमाळी दिसणार आहे. ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी यंदा दुरंगी लढत होत आहे. हिवरे बाजार गावात पद्मश्री पोपटराव पवार यांच्यामुळे सन १९९० पासुन गावात बिनविरोध निवडणुकीची परंपरा सुरू झाली. तेव्हापासुन हे गाव कधीच निवडणुकीला सामोरे गेले नाही. गावची ग्रामपंचायत व सेवा संस्थेच्या निवडणुका नेहमी बिनविरोध होत आहेत. मात्र यंदा प्रथमच गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोधची परंपरा तीस वर्षानंतर खंडीत झाली आहे. देशातील इतर गावासांठी याच गावातील बिनविरोध निवडणुकीचे तंत्र प्रेरणादायी होते

गाव आदर्श करायला जीवन झिजवावे लागले. ग्रामपंचायत निवडणुक गेल्या ३० वर्षापासुन बिनविरोध होत होती. मात्र प्रत्येक आदर्श गावात काही विघ्नसंतोषी असतात.  त्यांच्या प्रयत्नातुन आमचे गाव निवडणुकीला सामोरे जात आहे. शेवटी लोकशाही आहे प्रत्येकाला उभे राहण्याचा अधिकार आहे. मी लोकशाहीचा आदर करतो.जी चूक यावेळी झाली त्यातुन धडा घेऊन किमान पुढचे २५ वर्ष हिवरेबाजार मध्ये निवडणूक होणार नाही यासाठी प्रयत्न करणार. त्यासाठी हि निवडणूक विघ्नसंतोषींना धडा असेल.

-पद्मश्री पोपटराव पवार, (आदर्शगाव हिवरेबाजार)

Post a Comment

0 Comments