मुख्याध्यापक सुधाकर दातीर यांनी सेवानिवृत्तीनंतर विद्यालयाला दिला अनोख्या पद्धतीने निरोप

 मुख्याध्यापक सुधाकर दातीर यांनी सेवानिवृत्तीनंतर विद्यालयाला दिला अनोख्या पद्धतीने निरोप

वेब टीम संगमनेर : अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या श्री अमृतेश्वर विद्यालय कोठे  ता.संगमनेर येथील मुख्याध्यापक सुधाकर काशीनाथ दातीर हे आपली प्रदीर्घ सेवा देऊन ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. शाळेतील विद्यार्थ्यांना घडविताना त्यांच्यावर  शैक्षणिक संस्कारा बरोबरच सामाजिक आणि आध्यात्मिक संस्कार झाले पाहिजेत थोर मोठ्यांचा आदर ठेवत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे हा माझा एक शिक्षक म्हणून नेहमीच प्रयत्न होता.शिक्षक पिढी घडवतो याचे भान मला सतत होते असे प्रतिपादन सुधाकर दातीर यांनी विद्यालयाला निरोप देताना केले.शाळेतील विद्यार्थ्यांना साने गुरुजी लिखित श्यामची आई, राष्ट्रपिता महात्मा गांधी लिखित माझे सत्याचे प्रयोग , कवयित्री कमल दातीर लिखित दीपांश हा अभंग काव्यसंग्रह या पुस्तकांच्या १०० प्रति दातीर यांच्या वतीने भेट स्वरूपात देण्यात आल्या.

       कोठे ग्रामस्थ व विद्यालयातील शिक्षक यांच्या वतीने सुधाकर दातीर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला . सोशल डिस्टन्स,सॅनिटायजर व मास्कचा वापर तसेच कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करून सत्कार समारंभ मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.

सुधाकर दातीर यांच्या पत्नी कमल नजान-दातीर याही शिक्षिका असून दोन्ही मुले गौरव,ओंकार व सून कृतिका उच्च शिक्षित आहेत.आपल्या कुटुंबा कडून शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात कार्य व्हावे अशी ईच्छा सुधाकर दातीर यांनी यावेळी व्यक्त केली.

   अहमदनगर जिल्हा मराठा  विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष  नंदकुमारजी  झावरे पाटील, सचिव..जी. डी.  खानदेशे व पदाधिकारी तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अहमदनगर जिल्हा मुख्य समन्वयक शशिकांत नजान आणि समाजातील विविध स्तरातून .सुधाकर दातीर यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या . 

Post a Comment

0 Comments