सौरव गांगुलीला ह्रदयविकाराचा सौम्य झटका, रुग्णालयात दाखल

 सौरव गांगुलीला ह्रदयविकाराचा सौम्य झटका, रुग्णालयात दाखल

वेब टीम कोलकाता : बीसीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना कोलकाताच्या वुडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्यायामशाळेत व्यायाम करताना त्याची तब्येत बिघडली आहे. हात आणि पाठीत दुखत असल्याने आणि डोळ्यासमोर अंधारी आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सौरव गांगुलींवर रुग्णालयाकडून अँजियोप्लास्टी करण्यात येणार आहे. डॉक्टर सरोज मंडल तसेच इतर ३ डॉक्टर हे गांगुलीवर अँजियोप्लास्टी करणार आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्वीट करत, सौरव गागुंलीची तब्येत लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे. हर्षा भोगले यांनीही गांगुली लवकरात लवकर बरे व्हावे अशी असं म्हटलं आहे.


Post a Comment

0 Comments