१०८८ व्यक्तींचा "ऑपरेशन मुस्कान" द्वारे शोध

 २५०१ व्यक्तींचा  "ऑपरेशन  मुस्कान" द्वारे शोध   

वेब टीम नगर : १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान जिल्हासह राज्यभरात राबवण्यात आलेले ऑपरेशन मुस्कान बद्दल तसेच १०८८ बेपत्ता व्यक्तींचा शोध घेऊन  जिल्हा पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

 दि. ०१/१२/२०२० ते दि. ३१/१२/२०२० दरम्यान ऑपरेशन मुस्कान संपुर्ण महाराष्ट्रभर राबविण्याबाबत तसेच महिला व बालके यांचा शोध घेण्याचे आदेश आले  होते.त्या अनुषंगाने संपूर्ण अहमदनगर जिल्हयामध्ये हरवलेल्या महिला, पुरुष तसेच अपनयन व अपहरण केलेली बालके यांचे शोधकामी विशेष मोहिम राबविण्यात आली आहे.ऑपरेशन मुस्कान दरम्यान अहमदनगर जिल्हयामध्ये २०० लहान मुलांचे अपहरणाचे गुन्हे दाखल असुन त्यापैकी ७७ बालकांचा शोध घेण्यात आला आहे. त्याचबरोबर एकुण २३०१ मोठया व्यक्ती हरवलेल्या होत्या त्यापैकी १०११ व्यक्तीचा शोध घेतलेला आहे.

१२१० महिलांपैकी ६२१ व १०९१ पुरुषांपैकी ३९० चा शोध घेण्यात आला आहे. १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीमध्ये १०८८ बालके / महिला व पुरुष यांचा शोध घेतलेला आहे.तसेच नगर शहर व अहमदनगर जिल्हयामध्ये शोध घेता रेकॉर्ड बाहेरील ४७ मुले मिळुन आली असुन त्यांच्या पालकांचा शोध घेवुन त्यांचे ताब्यात देण्यात आली आहेत.

हि यशस्वी कामगीरी पोलीस अधिक्षक  मनोज पाटील,सौरभकुमार अग्रवाल साहेब अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर , दिपाली काळे , अपर पोलीस अधिक्षक,श्रीरामपुर व प्रांजली सोनवणे, पोलीस उप अधिक्षक, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार व पोहेकॉ सोमनाथ कांबळे, मपोहेकॉ अर्चना काळे, मपोना रिना म्हस्के, मपोना मोनाली घुटे, मपोकॉ छाया रांधवन, व मपोकॉ रुपाली लोहाळे यांनी केलेली आहे.


Post a Comment

0 Comments