नगर बुलेटीन 30-12-2020

 नगर बुलेटीन 30-12-2020

तेली समाजाचे विविध प्रश्‍न प्राधान्याने सोडविणार 

 ना.विजय वडेट्टीवार : तेली समाजाच्यावतीने ना.वडेट्टीवार यांचा सत्कार

    वेब टीम नगर : तेली समाजाचे संत संताजी जगनाडे महाराज यांच्या शिकवणीप्रमाणे तेली समाजाचे कार्य सुरु आहे. त्यांच्याच विचारांचा वारसा घेऊन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक संघटनेचे पदाधिकारी नगर जिल्ह्यात संघटन करुन समाजाच्या उन्नत्तीसाठी विविध समाजपयोगी कार्य करीत आहेत. तैलिक संघटनेचे कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे यांनी तेली समाजाचे अनेक वर्षांपासून असलेले प्रलंबित प्रश्‍न निवेदनाद्वारे मांडले आहेत. तेली समाजाचे विविध प्रश्‍न प्राधान्याने सोडविणार, असे प्रतिपादन बहुजन विकास, मदत, पुनर्वसन राज्य (ओबीसी) मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी केले.

     नगरमधील दाळ मंडई येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, तेली पंचाचा वाडा येथे मंत्री ना.वडेट्टीवार यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी तैलिक महासभेचे कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे, शहराध्यक्ष रमेश साळूंके, कृष्णकांत साळूंके, सचिव विजय दळवी, महाराष्ट्र ओबीसी आयोग सदस्य प्रा.डॉ.भुषण कर्डिले, उपाध्यक्ष सचिन म्हस्के, डॉ.कृष्णकांत दारुणकर, डॉ.शरदराव महाले, दिलीप साळूंके, प्रकाश सैंदर, प्रा.श्रीकांत सोनटक्के, दत्तात्रय करपे, अर्जुनराव देवकर, रमेश गवळी, नाशिक विभागीय महिला अध्यक्षा सौ.विद्याताई करपे,  निताताई लोखंडे, अशोक डोळसे आदि उपस्थित होते.

     ना.वडेट्टीवार पुढे बोलतांना म्हणाले, तेली समाज हा पूर्वीपासून लाकडी घाण्याचे तेल निर्माण करण्याचे कार्य करत आहेत. ते तेल शरीरास आरोग्यदायी आहे,  त्यामुळे पूर्वी आजाराचे प्रमाण नव्हतेच, आजचे बाजारातील तेल शरीराला घातक आहेत. जुने पारंपारिक व्यवसायांना गती मिळावी. तरुणांना, महिलांना व पुरुषांना रोजगार मिळावा व्यवसायासाठी करण्यासाठी उद्योगाकरिता महामंडळाने शिफारस करुन कर्ज सुविधा देऊन व्यवसायाला गती द्यावी, यासाठी प्रयत्नशील आहे.

     याप्रसंगी हरिभाऊ डोळसे म्हणाले की, तेली समाजामध्ये पारंपरागत असलेला व्यवसाय जागतिक स्पर्धेमुळे अडचणीत आला आहे. तरुण बेजरोजगार झाले आहेत. तसेच समाजाच्या उन्नत्तीसाठी शासन दरबारी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अनेक वर्षापासून पोलिस भरती, बँक भरती, एमपीएससी, युपीएससीची सर्व प्रवेश प्रक्रिया थांबलेली आहे. ही प्रक्रीया लवकरच सुरु व्हावी. लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे स्पर्धा परिक्षेची तयारी करत आहेत. घरापासून शहरात राहण्यासाठी त्यांना 7 हजार रुपये प्रतिमहिना खर्च आहे. यासाठी सरकारने विचार करावा व निर्णय घ्यावा. देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे लोटले तरी तेली समाजाला राजकीय क्षेत्रात प्रतिनिधीत्व मिळाले नाही. तेली समाजातील बौद्धीक गुणसंपन्नता, विचार, धार्मिक, सामाजिक, लोकहिताची जाणिव लक्षात घेऊन राजकीय क्षेत्रात तेली समाजाला आरक्षण मिळवून द्यावे.

     यावेळी ना.वडेट्टीवार यांना प्रांतिक तैलीक संघटनेच्यावतीने नाशिक विभागीय कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे यांनी तेली समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले.तसेच ना.वडेट्टीवार यांचा सत्कार तेली समाजाच्यावतीने करण्यात आला. यावेळी अनिल सैंदर, गोरख व्यवहारे, लक्ष्मण देवकर, परसराम सैंदर, संतोष दिवटे, श्रीराम हजारे, गोकूळ शिंदे, गणेश हजारे, देवीदास ढवळे,गोकुळ कोटकर,प्रसाद शिंदे, किसन क्षीरसागर, रामदास क्षीरसागर, बाबासाहेब दिवटे, पवन साळूंके,बंडोपंत शिंदे, शिवदास चोथे, देवीदास साळूंके, सागर काळे, दत्तात्रय डोळसे, मनोज क्षीरसागर, सचिन शेंदूरकर, गोकूळ बोकेफोड, रावसाहेब देशमाने, सौ.केदारेताई,  शशिकांत देवकर, नितीन फल्ले आदिंसह तेली समाज बांधव उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संस्थेचा वर्तमान काळ इतका उज्वल आहे की, भुतकाळालाही त्याचा अभिमान वाटावा

उद्धव महाराज मंडलिक : छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवकांची पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

    वेब टीम  नगर :  दिवसाची सुरुवात ही दिनदर्शिका पाहूनच होत असते. दिनदर्शिकेनुसार कुटूंबातील प्रत्येक सदस्याचे नियोजन ठरत असते. विविध सण, उत्सव बरोबरच इतर अनेक गोष्टी या दिनदर्शिकेवर अवलंबून असतात. त्यामुळे आपल्या जीवनात दिनदर्शिकेला फार महत्व आहे. दिनदर्शिकेच्या रुपाने सभासदांना वर्षभराचे नियोजनाची रुपरेषा दिली आहे.  संस्था आपल्या सभासदांना त्यांच्या मुल्यांचे योग्य नियोजन करुन चांगला परतावा देत आहे. संस्थेचा वर्तमान काळ इतका उज्वल आहे की, भुतकाळालाही त्याचा अभिमान वाटत असला पाहिजे. संस्थेचा भविष्यकाळ दैदिप्यमान असेल यात शंका नाही.  संस्थेच्या हिताशी कोणत्याही प्रकारे तडजोड न करता सभासदांचे कल्याण साधण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. एक सकारात्मक उर्जा संस्थेच्या उपक्रमातून सभासदांना मिळते.  पतसंस्थेचा प्रगतीचा आलेख असाच उंचावत जाईल, असे प्रतिपादन नेवासा येथील तुकाराम महाराज संस्थाचे अध्यक्ष हभप उद्धव महाराज मंडलिक यांनी केले.

     छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवकांची पतसंस्थेच्या सन २०२१ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन  नेवासा येथील तुकाराम महाराज संस्थाचे अध्यक्ष हभप उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष  सुदामराव बनसोडे,  उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर सुर्वे, चंद्रकांत तापकिर, सुनिता बर्वे, भास्करराव सिनारे, भाऊसाहेब पालवे, ज्ञानदेव शिंदे, पोपटराव वरखडे, संतोष देशमुख, भगवान भांड, ग्रामसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक भगत, डॉ.करण घुले, नगरसेवक सुनिल वाघ, विलासराव वाघ, आसाराम नायन, चंद्रकांत खाडे, मनोज बनकर, मुंगसे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी अध्यक्ष   सुदामराव बनसोडे म्हणाले, छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवकांची पतसंस्था ही सभासदांच्या आर्थिक हिताबरोबरच त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी काम करत आहे. संस्थेने मोबाईल बँकींग सेवा, ठेवीवर जास्तीत जास्त व्याज तर कर्जावर कमी व्याजदार असल्याने सभासदांचा याचा चांगला फायदा होत आहे.  अपघात विमा, मयत सभासदांच्या वारसांना मदत, पाल्यांचा शैक्षणिक मदत, अशा चांगल्या सेवा-सुविधांमुळे संस्थेला आयएसओ मानांकनासाठी प्रयत्न सुरु आहेत. पतसंस्थेचे संचालक मंडळ व सभासदांच्या सहकार्याने संस्था प्रगती करत आहे. पतसंस्थेच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या दिनदर्शिकेच्या माध्यमातून सभासदांना पतसंस्थेच्या कार्याची एकप्रकारे माहिती उपलब्ध करुन दिली आहे, असे सांगून लवकरच दिनदर्शिकेचे वाटप सर्वांना करण्यात येणार असल्याचे सांगितले.

     यावेळी उपाध्यक्ष  ज्ञानेश्‍वर सुर्वे यांनी पतसंस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन दिनदर्शिकेविषयी माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी ज्ञानेश्‍वर सुर्वे यांनी आभार मानले. कार्यक्रमास दादासाहेब शेळके, सुरेश खरड, प्रशांत सातपुते, किशोर जेजुरकर, राजेंद्र बागले, अर्चना कडू, रामदास जाधव, जयराम ठुबे, दादासाहेब डौले, संजय गवळी, अरुण गाढवे, संजय गिर्‍हे, बाळासाहेब मेहेत्रे, अशोक जगदाळे, पवनकुमार गिघे, सुरेश निवावे आदि उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भैरवनाथ देवस्थानच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

वेब टीम नगर : आगडगाव येथील काळ भैरवनाथ देवस्थानच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच नेत्रतज्ज्ञ डाॅ. रावसाहेब बोरुडे व डाॅ. सारिका बोरुडे यांच्या हस्ते झाले. ही दिनदर्शिका भाविकांना मोफत वाटप करण्यात आली.

देवस्थानच्या वतीने दरवर्षी दिनदर्शिकेचे प्रकाशन केले जाते. गेल्या तेरा वर्षांपासून गावचे सुपूत्र डाॅ. रावसाहेब बोरुडे यासाठी सहकार्य करतात. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक अडचणी असताना सुद्धा त्यांनी दिनदर्शिकेचे प्रकाशन करून देवस्थानला मदत केली. रविवारी भैरवनाथ मंदिराजवळ दिनदर्शिकेचे प्रकाशन डाॅ. बोरुडे दाम्पत्यांच्या हस्ते झाले. दिनदर्शिकेवरर देवस्थानजवळ सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे. या वेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी चंद्रकांत खाडे, देवस्थानचे अध्यक्ष बलभीम कराळे, सचिव त्र्यंबक साळुंके, दीपक गुगळे, मुरलीधर कराळे,  नितीन कराळे, संभाजी कराळे, दिलीप गायकवाड तसेच मान्यवर उपस्थित होते. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रविवारी महिलांसाठी मोफत मुळव्याध, हिमोग्लोबिन, शुगर तपासणी शिबीर

    वेब टीम नगर : चेडे अ‍ॅक्सिडंट अ‍ॅण्ड सर्जिकल हॉस्पिटलच्यावतीने व मखदुम सोसायटीच्या सहकार्याने रविवार दि. ३ जानेवारी २०२१ सवित्रीबाई फुले जयंती दिन महिला शिक्षक दिनानिमित्त महिलांसाठी मोफत मुळव्याध, हिमोग्लोबिन व शुगर तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मुळव्याध सर्जन डॉ.रेश्मा चेडे यांनी दिली.

     रविवार दि. ३ रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत चेडे हॉस्पिटल, विराज इस्टेट, तारकपुर बसस्टॅण्ड समोर, अहमदनगर होणार्‍या या शिबीरासाठी नावनोंदणी आवश्यक असून, त्यासाठी फोन :०२४१-२४२८६२८,२४११४९८ व ८८८८६५९५६८या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन डॉ.संतोष चेडे यांनी केले आहे.

     महिलांची मूळव्याधची तपासणी ही महिला डॉक्टर करतील. तरी या संधीचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मयुर सुरकुटला व आबीद दुलेखान यांनी केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

योग विद्या धामचे योगासने, प्राणायाम बेसिक वर्ग प्रवेश सुरू   वेब टीम नगर : लॉकडाऊनच्या प्रदिर्घ कालावधीनंतर योग विद्या धाम च्यावतीने योगासने व प्राणायामचे वर्ग अहमदनगर शहरात विविध ठिकाणी सुरू होत असल्याची माहिती अध्यक्ष डॉ सुंदर गोरे यांनी दिली.

     सध्याच्या कोरोना साथीच्या आजाराच्या काळात प्रत्येक व्यक्तीची प्रतिकारशक्ती वाढविण्यास तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास अत्यंत उपयुक्त असणारे योगासने व प्राणायाम नियमित वर्ग सुरु झाले आहेत. योग प्रवेश प्रक्रिया  रावसाहेब पटवर्धन स्मारक, कुष्ठधाम रोडवरील योग भवन, सिध्दीबाग येथील योग भवन आणि गुलमोहर रोडवरील नवले हॉल येथे  सकाळी व संध्याकाळी होणार आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी या वर्गाला यावे असे आवाहन  योग विद्या धामचे  कार्याध्यक्ष जयंत वेसीकर यांनी केले आहे.

     अधिक माहितीसाठी ०२४१-२४२१२५५ , २३२५५९४ किंवा ९४२३६७६०५९ या नंबरवर संपंर्क साधावा.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ओबीसींचे मजबूत संघटन करुन प्रश्‍न सोडविणे ही जबाबदारी

ना.विजय वडेट्टीवार :ओबीसी महासभा शहराध्यक्षपदी अनिल निकम

      वेब टीम नगर : अखिल भारतीय ओबीसी महासभा महाराष्ट्र राज्य संघटनेच्या अहमदनगर शहर अध्यक्षपदी अनिल निकम यांची नियुक्ती करुन ओबीसी मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पत्र देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रा.भारत दिवटे माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, चंद्रकांत फुलारी, डॉ.सुदर्शन गोरे, आनंद लहामगे, हरिभाऊ डोळसे, राजेश सटाणकर आदि उपस्थित होेते.

     याप्रसंगी बोलतांना ना.विजय वडेट्टीवार म्हणाले, राजकीय, सामाजिक, आर्थिकदृष्ट्या ओबीसी समाज मागासलेला आहे.६० टक्के असलेला हा समाज गेल्या ७० वर्षांपासून उपेक्षित आहे. ओबीसींचे मजबूत संघटन करुन विविध प्रश्‍न आपल्यासमोर उभे आहेत ते सोडविणे त्यासाठी ओबीसींची वज्रमुठ अधिक बळकत करण्याची जाबाबदारी आपली आहे.  ओबीसी महासभा संघटनेच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांचे, उद्योजकांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्‍न सोडवणे आपली जबाबदारी आहे. ते सोडवून शासनाच्यावतीने ओबीसींसाठी सुरु करण्यात आलेल्या योजनांचा लाभ संबंधितांना मिळवून देण्याचा प्रयत्न संघटनेने करावा, यासाठी आम्ही आपल्या सोबत राहू, असे सांगितले.

     नियुक्तीनंतर नूतन शहराध्यक्ष अनिल निकम म्हणाले, आजही ओबीसी समाज हा विखुरलेला आहे, तो जागरुक होऊन एक झाल्याशिवाय ओबीसींना भवितव्य नाही. त्यासाठी संघटनेच्या माध्यमातून ओबीसी समाजाला एकत्र करुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार त्यांचे हक्क मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करु, असे सांगितले.

     अनिल निकम यांच्या नियुक्तीचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पदाचा उपयोग समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी करावा

सचिन नवगिरे : क्रांतिगुरु लहुजी महासंघाच्या नुतन पदाधिकार्‍यांची निवड

   वेब टीम नगर : महाराष्ट्रात दिवसेंदिवस समाजावर अन्याय अत्याचाराची मालिकाच सुरू आहे ती थांबली पाहिजे. समाजाच्या न्याय हक्क, विविध सामाजिक प्रश्‍नांसाठी क्रांतीगुरु लहुजी महासंघ लढा देत आहे.  या संघटनेत काम करतांना खर्‍या अर्थाने पदाचा उपयोग समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी  झाला पाहिजे. महासंघाची ध्येय-धोरणे समाजापर्यंत पोहचवून महासंघाशी सर्वसामान्यांना जोडण्याचे काम नवीन पदाधिकार्‍यांनी करावे, असे प्रतिपादन क्रांतिगुरु लहुजी महासंघाचे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन नवगिरे यांनी केले.

     क्रांतिगुरु लहुजी महासंघ सामाजिक संघटनेच्या बैठक नुकतीच भिंगार शहरात नुकतीच पार पडली. याप्रसंगी सचिन नवगिरे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख सचिन नवगिरे जिल्हाध्यक्ष मयूर लोखंडे व जिल्हा युवा अध्यक्ष राहुल सकट उपस्थित होते. या कार्यक्रमात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश वैराळ यांच्या आदेशानुसार प्रमुख पाहुणे सचिन शिरसाठ यांच्या हस्ते नूतन पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करुन पत्र देण्यात आले. त्यात अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी रामदास साळवे, पारनेर तालुका संघटकपदी अमोल साळवे, नगर तालुका संपर्क प्रमुखपदी अनिल वैराळ यांची निवड करण्यात आली.

     समाजामध्ये शैक्षणिक क्रांती घडवून आणण्यासाठी संघटना प्रभावी माध्यम असून शैक्षणिक चळवळ उभी करण्यासाठी युवकांनी एकसंघ होणे गरजेचे असल्याचे लहुसंग्राम प्रतिष्ठाणचे मार्गदर्शक सचिन शिरसाठ यांनी सांगितले.   यावेळी जिल्हाध्यक्ष मयूर लोखंडे,  युवा अध्यक्ष राहुल सकट, लहुसंग्राम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर गायकवाड, मानवहित लोकशाही पार्टीचे भिंगार शहराध्यक्ष कैलास साळवे, मारुती वैराळ, शंकर पवळ, सागर वैराळ, निशांत ननवरे, मनेश ननवरे आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आरपीआय पुढे घेऊन जात आहे 

ना. रामदास आठवले : सावेडी येथील आरपीआय मराठा आघाडीच्या संपर्क कार्यालयाचे शुभारंभ

वेब टीम नगर : छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आरपीआय पुढे घेऊन जात आहे. याच विचाराने पक्ष चळवळीत व राजकारणात कार्यरत आहे. आरपीआयची मराठा आघाडी देखील अधिक सक्षमपणे कार्यरत असून, युवकांना यामध्ये संधी देण्यात आली आहे. आरपीआय एका समाजा पुरता मर्यादित नसून, संपुर्ण बहुजन समाजाला बरोबर घेऊन पक्षाची वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले. तसेच आरपीआय मराठा आघाडीचे राज्य संघटक सिद्धार्थ सिसोदे यांच्या कार्याचे कौतुक करुन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

सावेडी येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीच्या संपर्क कार्यालयाचे शुभारंभ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आरपीआय मराठा आघाडीचे राज्य संघटक सिद्धार्थ सिसोदे, डॉ. सुरेखा जाधव सिसोदे, संध्या सिसोदे, आरपीआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबालकर, नगर जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, भिमसेना महासंघाचे दीपक साठे, विभागीय प्रमुख भिमराव बागुल, शहाजी कदम, शिवाजी पालवे, रविकिरण मगर, भीमसेनेचे युवक अध्यक्ष अ‍ॅड. सुमेध डोंगरे आदि उपस्थित होते. मराठा आघाडीचे राज्य संघटक सिद्धार्थ सिसोदे यांनी पक्षाच्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्याची यावेळी माहिती दिली. सिसोदे परिवाराच्या वतीने ना. आठवले यांचा सत्कार करुन शहरात स्वागत करण्यात आले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय व सामजिक कार्य अफाट समुद्राप्रमाणे 

ना. रामदास आठवले : ना. आठवले यांच्या हस्ते अजिंक्य योध्दा पुस्तकाचे व आयुष्य फाऊंडेशनच्या बोधचिन्हाचे प्रकाशन

वेब टीम नगर : स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनप्रवासावर लिखीत अजिंक्य योध्दा (हुंदक्यांना आठवणींची किनार) या पुस्तकाचे तसेच आयुष्य फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या बोधचिन्हाचे अनावरण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते झाले.

सावेडी येथे एका कार्यक्रमानिमित्त आलेले ना. आठवले यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी पुस्तकाचे लेखक इंजि. जनार्धन जायभाय, माजी सैनिक संघटनेचे शिवाजी पालवे, सिध्दार्थ सिसोदे, अ‍ॅड.सुमेध डोंगरे, डॉ.सुरेखा जाधव, अ‍ॅड.संदिप जावळे, संतोष शिंदे, भास्कर गोपाळघरे, चंमपती मोरे, भगवान डोळे, भाऊसाहेब देशमाने, रामकृष्ण काकडे, हरिदास भाबड, खंडेराव लेडाळ, नारायण जायभाय आदिंसह माजी सैनिक व नागरिक उपस्थित होते.

ना. रामदास आठवले म्हणाले की, स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय व सामजिक कार्य अफाट समुद्राप्रमाणे आहे. आजच्या युवकांसाठी ते खर्‍या अर्थाने एक आयडॉल आहेत. सामाजिक कार्य व संघटन कसे असावे? त्यांच्या कार्यातून शिकण्यासारखे आहे. खर्‍या अर्थाने ते राजकारणात अजिंक्य योध्देच होते. नवीन संघटनेची मुहुर्तमेढ रोवत असताना स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांचा व कार्याची प्रेरणा घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

अजिंक्य योध्दा या पुस्तकाचे प्रकाशक नवनरेंद्र प्रकाशन आहे. या पुस्तकात लोकनेते स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास उलगडण्यात आला असून, ते आजच्या युवकांना व कार्यकर्त्यांना दिशादर्शक आहे. यामध्ये त्यांच्या बालपणीच्या, महाविद्यालय जीवनाच्या, राजकीय व सामाजिक जीवनप्रवासातील घटनांचा समावेश आहे. त्यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदानासह भावनिक मुद्दयांना देखील हात घालण्यात आला आहे. सामाजिक प्रश्‍न सोडवून दुर्बल घटकांना आधार देत त्यांचे आयुष्य सुखी बनविण्यासाठी युवकांनी एकत्रित येऊन आयुष्य फाउंडेशची स्थापना केली आहे. संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा, शैक्षणिक, पर्यावरण आदि क्षेत्रात कार्य केले जाणार असल्याची माहिती पुस्तकाचे लेखक तथा फाऊंडेशनचे इंजि. जनार्धन जायभाय यांनी दिली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नगर-पुणे लोकल रेल्वेसेवा सुरु होण्याकरिता मिशन अंगण पुणे

मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदचा उपक्रम 

वेब टीम नगर : अहमदनगरचा सर्वांगीन विकास साधण्यासाठी नगर-पुणे लोकल रेल्वेसेवा सुरु होण्याकरिता मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने मिशन अंगण पुणे सुरु करण्यात आले आहे. या मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन रेल्वेमंत्री यांच्याशी चर्चा करुन नगर-पुणे लोकल रेल्वेचा प्रश्‍न सोडविण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

नगरकरांसाठी पुणे शहर अंगण ठरल्यास पुण्याच्या धर्तीवर शहराच्या झपाट्याने सर्वांगीन विकास साधला जाणार आहे. नगर-पुणे लोकल रेल्वेसाठी संघटना आग्रही असून, ही नवीन वर्षाची भेट नगरकरांना पाठपुराव्याने मिळवून घ्यावी लागणार आहे. यासाठी सर्व राजकीय पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

नगर-पुणे लोकल रेल्वे सुरु झाल्यास नगरच्या उद्योगधंदे व व्यापाराला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. शहरातील बेरोजगार युवकांना पुणे येथे अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मुंबईशी ठाणे लोकल रेल्वेने जोडले गेल्याने ठाणे शहराचा मोठा विकास झाला. त्याप्रमाणे अहमदनगरचा विकास देखील साधता येणार आहे. अहमदनगर शहर पुण्याशी रेल्वेने जोडणे अत्यंत महत्त्वाचे व विकासात्मक दृष्ट्या गरजेचे आहे. नगर-पुणे लोकल रेल्वेसेवा सुरु झाल्यास नगरकरांना पुणे हे अंगणप्रमाणे वाटणार असून, सहजपणे एक ते दीड तासात पुण्याला जाणे शक्य होणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. मिशन अंगण पुणे चळवळीसाठी सुहास मुळे, नाना बोज्जा, अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अंबिका जाधव, उषा निमसे, अशोक भोसले, पोपट भोसले, सखूबाई बोरगे आदि प्रयत्नशील आहेत.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाचा प्रश्‍न केंद्र सरकारने तातडीने समन्वयाने सोडवावा

 शीख, पंजाबी समाजाचे  निवेदन : समाजाची बदनामी करणार्‍या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी

वेब टीम नगर: दिल्ली येथे मागील ३२ दिवसापासून कडाक्याच्या थंडीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा प्रश्‍न केंद्र सरकारने तातडीने समन्वयाने सोडवावा, तसेच शेतकरी आंदोलनाच्या मुद्दयावरुन समाज माध्यमांवर शीख, पंजाबी समाजाची बदनामी करणार्‍या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी शहरातील शीख, पंजाबी समाजाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देण्यात आले. यावेळी हरजीतसिंग वधवा, प्रितपालसिंग धुप्पड, राजू मदान, चमनलाल कुमार, पुनीत भूतानी, राजा नारंग, रामसिंग कथुरिया, किरपाल सिंग, अमरजितसिंग वधवा, हरजिंदर सिंग, सुरेंद्रसिंग चावला, जस्मीत वधवा, सनी वधवा, अजितसिंग वधवा, संदीप आहुजा, ए.सी. कंत्रोड, हरविंदरसिंग नारंग, सरबजितसिंग अरोरा, बलजितसिंग बिलरा, हरवीरसिंग मक्कर, बॉबी सिंग आदि उपस्थित होते.

भारतातील शेतकरी मागील एक महिन्यापासून दिल्ली येथे कडाक्याच्या थंडीत आंदोलन करीत आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात हे आंदोलन सुरू असून, शेतकरी विरोधी असलेले कृषी कायदे रद्द करण्याची मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.  

पंजाब-हरियाणाच्या सिंधू बॉर्डर जवळ पोलिसांनी आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर पाण्याचा मारा केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. हरियाणाकडून दिल्लीकडे येणार्‍या सीमा पोलिसांनी बॅरिकेट्स टाकून बंद केल्या आहेत. हजारो शेतकरी ट्रॅक्टर, ट्रॉली आणि इतर वाहनांनी दिल्लीकडे येण्याचा प्रयत्न करत आहे. या आंदोलनात अनेक आंदोलक शेतकर्‍यांचा जीव गेला आहे. पुर्वी पंजाब आणि हरियाणाच्या शेतकरी या आंदोलनात उतरले होते. सध्या महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड आणि बिहार मधील शेतकरी आंदोलनात उत्सफुर्तपणे सहभागी होत आहेत. शेतकर्‍यांच्या शेतमालाला किमान हमी भाव मिळेल असे पंतप्रधानांनी घोषणा केली होती. मग केंद्र सरकार स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार किमान हमीभाव निश्‍चित करणारा कायदा का आणत नाही?, अत्यावश्यक वस्तू सुधारणा विधेयकातून सरकारने अत्यावश्यक वस्तूच्या यादीतून अनेक उत्पादने हटविले असून, आणीबाणीचा मुद्दा मांडून कोणतीच गोष्ट कधीच अत्यावश्यक वस्तू ठरणार नसल्याचे कारस्थान केले आहे. शेतकर्‍यांसाठी काही बदललेले नाही. माल साठवून ठेवण्याचे स्वातंत्र्य त्यांच्याकडे कायमच होते. धान्य साठवून ठेवण्याची कमाल मर्यादा ही फक्त मोठ्या कॉर्पोरेटसाठी होती. आता ही मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांकडे भाव ठरविण्याचा अधिकार राहिलेला नाही. तर मोठ्या कॉर्पोरेटच्या हातात भाव ठरविण्याचा अधिकार असेल. या विधेयकाचा मध्यमवर्गावर मोठा परिणाम होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

 तसेच या आंदोलनामुळे समाज माध्यमांवर शीख, पंजाबी समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. खलिस्तानवादीचा मुद्दा उपस्थित करुन आंदोलक शेतकर्‍यांना खलिस्तानवादीची उपमा दिली जात आहे. शेतकरी आंदोलनातील सर्व शीख, पंजाबी बांधव हे भारतीय असून, त्यांचे अनेक सपुत्र भारतीय सेनेत देशसेवा करीत आहे. तर लंगर सेवेच्या माध्यमातून संकटकाळात संपूर्ण मानवजातीसाठी त्यांनी योगदान दिले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. शेतकरी आंदोलनाचा प्रश्‍न केंद्र सरकारने तातडीने समन्वयाने सोडवावा, तसेच शेतकरी आंदोलनाच्या मुद्दयावरुन समाज माध्यमांवर शीख, पंजाबी समाजाची बदनामी करणार्‍या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी शीख, पंजाबी समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 चोरी गेलेली गाय परत मिळण्यासाठी गाठले पोलीस अधिक्षक कार्यालय

चोरांचा शिरजोरपणा गुन्हा मागे घेण्यासाठी फिर्यादीस धमकी

वेब टीम नगर : चोरी गेलेली गाय परत मिळण्यासाठी शिवाजी मांडे यांनी थेट पोलीस अधिक्षक कार्यालय गाठून, आरोपी दाखल केलेला चोरीचा गुन्हा मागे घेण्यासाठी धमकावत असून, पोलीस प्रशासन आरोपींवर कारवाई न करता सदर प्रकरणाचा तपास करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप केला. तर गाय चोरांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.

मार्केटयार्ड येथील भवानीनगर येथील अरुणा शिवाजी मांडे या गो पालनाचा व्यवसाय करीत आहे. मागील वर्षी शिवाजी यांच्या बंधूकडून गाय आणण्यात आली होती. ती गाय दि.१३ डिसेंबरला चोरीस गेली. याप्रकरणी चौकशी केली असता वाकोडी (ता. नगर) येथील एका दलालाकडे ही गाय पाहण्यात आल्याचे कळले. त्यांच्या घरी चौकशी केली असता काही व्यक्तींनी गाय विकण्यास दिली असल्याचे समजले. याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनला प्रविण फुलसौंदर, रविंद्र फुलसौंदर व दत्तात्रय फुलसौंदर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दलाला गाय विक्रीसाठी देणार्‍या आरोपींना घरी जाऊन विचारणा केली असता त्यांनी गाय चोरीचा दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी धमकावले असल्याचा आरोप शिवाजी मांडे यांनी केला आहे.  

गाय चोरणारे व्यक्ती गुन्हा मागे घेण्यासाठी धमकावत असून, आमच्या कुटुंबीयांस धोका निर्माण झाला आहे. तर उरलेली जनावरे देखील चोरीस जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणी पुरावा असलेले व्हिडिओ रेकॉर्डिंग घेऊन पोलीस स्टेशनला सदर व्यक्तींविरोधात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलीसांनी व्यवस्थितपणे तक्रार दाखल करुन घेतली नाही. यापूर्वी अशाच प्रकारे गाई-म्हशी चोरीला गेल्याचे घटना घडलेल्या असून, अनेक तक्रारी पोलीस स्टेशनला दाखल आहेत. मात्र कोणत्याही आरोपीचा अद्यापि शोध लागलेला नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे. याप्रकरणी सखोल चौकशी केल्यास यामधील मुख्य आरोपी व सूत्रधार मिळण्याची शक्यता आहे. तातडीने संबंधीत व्यक्तीकडून गाय मिळवून द्यावी, अन्यथा कुटुंबीयांसह पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा मांडे कुटुंबीयांनी दिला आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अमृत भुयारी पाईपलाईन , फेज  टू चे चालू असलेल्या कामाची चौकशी  करण्याची मागणी

                             

वेब टीम नगर : भुयारी पाईप लाईन व फेज  टू चे चालू असलेल्या कामाची चौकशी समिती स्थापन करून चौकशी करण्याची मागणी समाजवादी पार्टी च्या वतीने मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी समाजवादी पार्टीचे  जिल्हाध्यक्ष अजीम राजे समवेत  जहीर सय्यद, मोहम्मद हुसेन, मुन्ना भाई, राजेंद्र गायकवाड, दिनेश गायकवाड, मुबीन सय्यद, परवेज खान, शफी सय्यद, जिशान शेख, तौसीफ शेख आदि  शहरांमध्ये चालू असलेल्या भुयारी पाईपलाईन व फेस टू लाईनचे काम निष्क्रिय पद्धतीने ठेकेदार कडून चालू काम करण्यात येत आहे शहरातील रस्ते खोदून ठेकेदाराने पाईप टाकले पण पाईप टाकलेली जागा नीटनेटकी करत नाही रस्त्यांवर पडलेले मातीचे ढीग दगड-गोटे जागेवरच पडुन आहे मातीमुळे सर्वत्र धूळ झाली आहे धुळीमुळे दुकानदार, रहिवासी, नागरिकांना सर्दी खोकल्याच्या त्रास होत आहे अमृत भुयारी गटार योजने अंतर्गत  जिल्हाधिकारी कार्यालय ते जुने मनपा कार्यालय माळीवाडा, हातमपुरा, डावरे गल्ली, माणिक चौक, आशा टॉकीजचौक, बेलदार गल्ली, मंगलगेट आदी भागातील रस्ते पाईप टाकण्यासाठी खोदण्यात आले आहे मात्र पाईप टाकल्यानंतर रस्त्याच्या मध्यभागी मातीचे ढीग पडलेले आहेत इंजिनीयर व ठेकेदार उपस्थित राहत नाही व कामे कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सोडून देतात हे कामे व्यवस्थित केली जात नाही शहरातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे कोरोनामुळे सहा महिने व्यवसाय ठप्प होता आत्ता दुकाने सुरू झाली त्यात रस्ते खोदून ठेवले  या कामांमध्ये ठेकेदार हा हलगर्जीपणा करत असल्याचे निदर्शनास दिसून येत आहे हे काम लवकरच उरकून ठेकेदार आपले बिल काढायच्या तयारीत आहेत त्यामुळे या कामाच्या संदर्भात एक समिती स्थापन करून चालू असलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी अन्यथा महानगरपालिकेमध्ये समाजवादी पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा समाजवादी पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे.-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------


Post a Comment

0 Comments