रेल्वे ट्रॅक जवळ सापडला उपसभापती धर्मेगौडा यांचा मृतदेह
वेब टीम बंगळुरू : कर्नाटक विधान परिषदेचे उपसभापती एस एल धर्मेगौडा यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅकजवळ सापडल्यामूळे राज्याला मोठा धक्का बसलाय. धर्मेगौडा यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवल्याचं प्राथमिकदृष्टया समोर येतय. धर्मेगौडा यांच्या मृतदेहाजवळ पोलिसांना एक सुसाईड नोटही आढळली आहे. आत्महत्येचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. काही दिवसांपूर्वी कर्नाटक विधान परिषदेत विरोधकांकडून झालेल्या धक्काबुक्कीमुळे धर्मेगौडा चर्चेत आले होते.
धर्मेगौडा यांचा मृतदेह चिकमंगळुरूमध्ये कादूरनजिक एका रेल्वे ट्रॅकजवळ आढळलं. मध्यरात्री जवळपास २.०० वाजल्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू केलीय.
काही दिवसांपूर्वी कर्नाटक विधान परिषदेत काँग्रेस नेत्यांनी धर्मेगौडा यांच्यासोबत धक्काबुक्की केली होती. इतकंच नाही तर त्यांना खुर्चीतून खालीही खेचलं होतं. त्यामुळे ते चर्चेत आले होते.(फोटो-धर्मेगौडा ,धर्मेगौडा-१)
0 Comments