राजुर बसस्टॅन्डवर सोने चोरी करणारी टोळी जेरबंद

राजुर बसस्टॅन्डवर सोने चोरी करणारी टोळी जेरबंद 

वेब टीम राजूर : बस स्टॅन्ड परीसरातील प्रवाश्यांचे सोने चोरणाऱ्या श्रीरामपुर येथील सराईत गुन्हेगारांच्या टोळीस राजुर पोलीस स्टेशन यांनी मुद्देमालासह  जेरबंद केले.  

दि.२६/१२/२०२०  रोजी फिर्यादी कुसुम लक्ष्मण नाडेकर वय ४९ वर्षे,धंदा-घरकाम रा.पिचड शाळेजवळ, राजुर ता.अकोले जि.अहमदनगर.यांचे राजुर बस स्टॅन्ड येथे राजुर ते कोहणे या बसमध्ये बसताना कोणीतरी अज्ञात इसमांनी त्यांच्या पर्स मधुन ९६,०००/-रु.किमतीचे सोन्याचे नेकलेस १६ ग्रँम ९६० मिली असलेले चोरले .त्याबाबत फिर्यादी यांनी राजुर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी वरुन राजुर पोलीस स्टेशन गुर.नं.१२९८/२०२० भा.द.वी.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या  गुन्ह्याचा सपोनि/पाटील ,पोसई/खैरनार,तसेच पोलीस कर्मचारी हे त्यांचे पथकातील अधिकारी कर्मचारी यांचे मदतीने तपास करत असताना सपोनि/पाटील गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि ,सदरचा गुन्ह्याबाबत श्रीरामपुरची सराईत टोळी यांनी गुन्हा केला आहे अशी माहिती मिळाल्याने पथकातील पोसई/खैरनार,पोहेकॉ/आघाव,पोकॉ/फटांगरे,पोका/गाढे,मपौकॉ/वाडेकर अकोले पोस्टेचे पोकॉ/मैड अश्यांनी मिळुन अकोले स्टँड येथे जावुन आरोपी नामे १)साहिल नाशिर खान वय २१ वर्षे,रा.वार्ड नं.३ सार्वजनिक संडासाजवळ श्रीरामपुर २)अर्जुन कानिफनाथ भोसले वय २१ वर्षे,रा.वार्ड नं.२ अहिल्यादेवी नगर श्रीरामपुर २)कमलेश उत्तम पवार वय २१ वर्षे रा. वार्ड नं.२ अहिल्यादेवी नगर श्रीरामपुर ४)गुफरान निसार पठाण वय २१ वर्षे,रा.वार्ड नं.२ सोमेश्‍वर पथ श्रीरामपुर यांना मोठ्या शिताफिने ताब्यात घेवुन सदर गुन्ह्या बाबत विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा आम्हीच केल्याचे कबुली दिली आहे.तसचे त्यांचेकडे अधिक चौकशी करता त्यांनी यापुर्वीही गु.र.न.२९१/२०२० भादवी कलम ३७९ प्रमाणे राजुर परीसरात गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. आरोपी यांना मुद्देमालासह राजुर पोलीस यांनी ताब्यात घेतले आहे तसेच तपास चालु आहे. सदरची कारवाई मनोज पाटील पोलीस अधिक्षक अहमदनगर,दिपाली काले ,अप्पर पोलीस अधिक्षक,श्रीरामपुर व.राहुल मदने उपविभागीय पोलीस अधिकारी,संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली राजुर पोलीस स्टेशनचे अधिकारी सपोनि/नितीन पाटील ब अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे. 



Post a Comment

0 Comments