ऑनलाईन धोका , लुटले १ कोटी

 ऑनलाईन धोका , लुटले १ कोटी 

वेब टीम मुंबई :  परदेशी असल्याचे भासविणाऱ्या इंस्टग्रामवरील तरुणीच्या हनी ट्रॅपमध्ये मुंबईतील हिऱ्यांचा दलाल चांगलाच अडकला. भारतामध्ये सोन्याच्या दागिन्यांचा व्यवसाय करायचा असल्याचे सांगून या तरुणीने अमेरिकन डॉलर्सचे पार्सल पाठविले. हे पार्सल विमानतळावरून सोडविण्याच्या नादात या हिरे दलालाने  तब्बल १ कोटी १६ लाख रुपये गमावले. ४ ते ५  कोटींचा फायदा होईल या अपेक्षेने हिरे दलाल पैसे पाठवत गेला. सायबर भामट्यांनी वेगवेगळी कारणे सांगून इतकी मोठी रक्कम लांबविल्याने या दलालाला धक्का बसला आहे. याप्रकरणी व्ही. रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई येथे कटुंबीयासोबत राहणाऱ्या या दलालाचे बांद्र्यात कार्यालय आहे. १० ऑक्टोबरला दलालाच्या इंस्टाग्रामवर अकाउंटवर एका तरुणीची रिक्वेस्ट आली. दलालाने रिक्वेस्ट स्वीकारतच दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. मोबाइल क्रमांकाची देवाणघेवाण झाल्यानंतर दोघेही सोशल मीडियावर एकमेकांशी गप्पा मारू लागले. लंडन येथे खासगी जहाजावर कॅप्टन असल्याचे सांगणाऱ्या या तरुणीने तुझ्यावर प्रेम जडले असून, लग्न करण्याची इच्छा असल्याचे या दलालाला  सांगितले. विवाहित असूनही तो तिच्या  बोलण्याला भुलून गेला. १७ ऑक्टोबरला ब्रँडेड शुज, सोन्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चेन, घड्याळ आणि अमेरीकेन डॉलर असलेला व्हिडीओ तिने व्हॉट्सअॅपवरून त्याला पाठवला. तुला गिफ्ट म्हणून हे सर्व पाठवत असल्याचे तिने सांगितले. गिफ्ट पाठविण्यासाठी या दलालाने वांद्रे येथील कार्यालयाचा पत्ता दिला.

सोने-चांदीचा व्यवसाय करण्यासाठी पाच लाख डॉलर आणि तीने पाठविलेल्या गिफ्टची तो आतुरतेने वाट पाहत होता.२ ते ३ दिवसांनी त्याला एका महिलेने फोन केला. विमानतळ कस्टम विभागातून बोलत असल्याचे सांगून हे गिफ्ट फारच महागडे असल्याचे तिने सांगितले. सुमारे ४ ते ५ कोटींच्या पार्सलसाठी तुम्हाला पार्सल चार्ज, टॅक्स चार्ज भरावा लागेल, असे ती म्हणाली. इतकी मोठी रक्कम मिळत असल्याने हितेशने तयारी दर्शवली आणि त्या महिलेने दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यावर टप्याटप्याने ६० लाख ४९ हजार रुपये ट्रान्सफर केले.

त्या दलालाकडून सहज ६० लाख मिळाल्याने त्याचा विश्वास बसला म्हणून दिल्ली येथून कस्टम अधिकारी बोलतोय म्हणून आणखी एक कॉल आला. चार कोटींचे डॉलर रुपयांमध्ये रूपांतर करण्यासाठी आणखी वेगवेगळ्या फी आणि कर भरावे लागतील, असे सांगून हितेशला दिल्लीत बोलाविले. दिल्लीमध्ये एका नायजेरियन नागरिकाने त्याची हॉटेलमध्ये भेट घेतली आणि तीने पाठविलेले डॉलर दाखविले. त्याचा विश्वास बसला आणि पुन्हा त्याने वेगवेगळ्या खात्यांवर ५५ लाख ५० हजार रुपये पाठविले

Post a Comment

0 Comments