हातभट्टी निर्मिती केंद्रावर राज्य उत्पादन शुल्क.विभागाची कारवाई

हातभट्टी निर्मिती केंद्रावर राज्य उत्पादन शुल्क.विभागाची कारवाई


वेब टीम नगर : दिनांक २५ रोजी सकाळी गोंधवणी परीसर, सरस्वती कॉलनी, कदमवस्ती,सुतगिरणी परीसर, श्रीरामपुर , जि.अहमदनगर याठिकाणी दारुबंदी गुन्हयाचा छापा मारुन आरोपी नामे प्रभाकर किसन गायकवाड, माणिक सोमाजी शिंदे, कचरू गायकवाड (फरार) सर्व राहणार गोंधवणी, श्रीरामपूर तसेच उषा प्रभाकर काळे, चंद्रकांत शाम पवार, रा. कदमवस्ती, श्रीरामपूर, साधना मोहन काळे, वंदना संतोष काळे, रा. सूतगिरणी परिसर, श्रीरामपूर, इंदुबा, काळा गुळ ३०० किलो, नवसागर १५० किलो, रसायन व भटटी बॅरल ७२, प्लास्टीक कॅन ३३ व दोन ई विष्णू जाधव, मीना लाला माने, रा. सरस्वती कॉलनी, श्रीरामपूर, जि. अहमदनगर असे एकुण ०९ वारस गुन्हयांची नोंद केली आहे.सदर ठिकाणी स्पिरीट ८० ली., गावठी दारु ५६३ ली., रसायन ९१२२३० ली.दुचाकी वाहने तसेच इतर साहित्य मिळुन एकुण अं. ४,८७,०००/- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग, अहमदनगर यांनी केलेल्या धडक कारवाईमुळे अवैध हातभट्टी निर्मिती व विक्री करणार्यांचे धाबे दणाणले आहेत. सदर निर्मिती केंद्रांवर संयुक्‍त मोहिमेअंतर्गत सातत्याने कारवाया करण्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने नियोजन केलेले आहे.

या नोंदविण्यात आलेल्या गुन्हयांचे पुढील तपास निरीक्षक, भरारी पथक क्र.२ विभाग तसेच निरीक्षक श्रीरामपुर विभाग, अहमदनगर करत आहेत.

सदरच्या संयुक्‍त मोहिमेमध्ये जिल्ह्याच्या सहा विभागातील ३५ अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

.प्रसाद सुर्वे विभागीय उपायुक्‍त,राज्य उत्पादन शुल्क,पुणे विभाग, पुणे तसेच गणेश पाटील, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली एस.एम.सराफ,प्र.उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर तथा निरीक्षक, अ विभाग, अहमदनगर, सह .ए.बी.बनकर, निरीक्षक, ब- विभाग, अहमदनगर,एस.के.कोल्हे, निरीक्षक, कोपरगाव विभाग, .बी.बी. हुलगे, निरीक्षक, श्रीरामपुर विभाग,  आर.डी. वाजे, निरीक्षक, संगमनेर विभाग, पी .बी.आहिरराव, प्रभारी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भ.प. क्र.२, श्रीरामपुर, जि.अहमदनगरPost a Comment

0 Comments