बुधवारी जामीन , तर गुरवारी पुन्हा अटक

 बुधवारी जामीन , तर गुरवारी पुन्हा अटक 

वेब टीम नगर : दरोड्याचा गुन्ह्यात बंगल्याचा दरवाजा आतून बंद करत पोलिसांना ताटकळत ठेवणाऱ्या आरोपीस अखेर पोलिसांनी दरवाजा तोंडात अटक केली होती.त्या लॉरेन्स स्वामीला बुधवारी जामिन मिळाला. मात्र दुसऱ्याच दिवशी भिंगार पोलिसांनी त्याला पुन्हा अटक केली. भिंगार पोलीस ठाण्यामध्ये लॉरेन्स स्वामी विरोधात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यात स्वामीला पुन्हा अटक करण्यात आली आहे.

स्वामी याला दरोड्याच्या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. भिंगारमध्ये २३ नोव्हेंबरला दुपारच्या वेळी पुरणचंद जोशी हे आपल्या गाडीतून जाताना त्यांना लॉरेन्स स्वामीने आपल्याकडील कार आडवी लावून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पैसे न दिल्यास तुझ्या भावाला ठार मारेल, अशी धमकी दिली. या प्रकरणी भिंगार पोलीस ठाण्यात स्वामी विरोधात खंडणी आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात लॉरेन्स स्वामी याला अटक करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments