बोठेच्या हनीट्रॅपची मालिका चालविण्या मागचा हेतू शोधा

 बोठेच्या हनीट्रॅपची मालिका चालविण्या मागचा हेतू शोधा : ॲड.लगड 

वेब टीम नगर : बहुचर्चीत रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मास्टर मांईड (मुख्य सुत्रधार) बाळ बोठे घटना घडुन २१ दिवस उलटून गेले तरी तो पोलीसांना सापडला नाही. तो पोलीसांना सातत्याने गुंगारा देत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. आता त्यास फरारी म्हणुन घोषीत करण्याची प्रक्रिया पोलीसांकडुन होत असल्याचे समजले आहे. पोलीसांनी इतर पाच आरोपींना तात्काळ अटक करुन तपास चालु केलेला आहे. त्याबद्दद आपल्या पोलीस खात्याचे अभिनंदन. या प्रकरणातील मुख्य सुत्रधार हा शिक्षणाने डॉक्टरेट असुन कायदा पदवीधर देखील आहे. एका वर्तमान पत्रात निवासी संपादक म्हणुन काम करतांना त्याचा अनेकांशी संबध आलेला असल्याने त्याच्या सर्वत्र चांगल्या ओळखी झाल्या. बाळ बोठे याने हनीट्रॅप ही मालिका कशाच्या आधारे प्रकाशीत केली व  त्यातुन काय साधायचे होते याचीही आपण चौकशी करावी.

 या मुख्य सुत्रधाराने केलेले कृत्य नक्कीच निषेधार्ह असे आहे. आता या बोठेस फरार म्हणुन घोषीत करून त्याच्या संपुर्ण संपत्तीची चौकशी करुन ती ताबडतोब जप्त करणे गरजेचे एवढेच नव्हे तर हा मुख्य सूत्रधार उच्च  न्यायालय औरंगाबाद येथे अटकपपूर्व जामीना साठी अर्ज करू शकतो त्या ठिकाणी देखील आपलॆ पोलीस यंत्रणेने डोळ्यात तेल घालून त्याचा अटक पूर्व जामीन कसा फेटाळण्यात येईल या कडे गांभीर्याने लक्ष द्यावे या प्रकरणातील आरोपींनी गंभीर असे गुन्हा केला आहे. या गुन्ह्यास जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा तरतूद कायद्यात असून या परिस्थितीत मुख्य सुरत्राधाराचा शोध घेऊन त्यास अटक करून इतर आरोपींसह त्याचे विरुद्ध न्यायालयात आरोपपत्र लवकारात लवकार दाखल करावे या प्रकरणातील आरोपींनी गंभीर असे गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे अशी मागणीही ॲड लगड यांनी केली आहे.





Post a Comment

0 Comments