रस्त्याचे कामानिमिताने वाहतुकीचे नियोजन

 रस्त्याचे कामानिमिताने वाहतुकीचे नियोजन 

वेब टीम नगर : कोपरगांव-कोल्हार-अहमदनगर रस्त्यावरील कोल्हार गावाजवळील प्रवरा नदीवरील पुलाच्या पोहोचमार्गाचे दुरुस्तीचे काम मे. डायमंड कंस्ट्रकशन कंपनी, मु.पो. लोणी यांना देण्यात आलेले आहे. सदर काम चार टप्प्या मध्ये पुर्ण करण्या करीता खालील प्रमाणे नियोजन करण्यात आलेले आहे.असे संबंधित विभागाने कळविले आहे.

१) पहिला टप्पा दिनांक ०४/०१/२०२१ सोमवार ते दिनांक ०५/०१/२०२१ मंगळवार,

२) दुसरा टप्पा दिनांक ०८/०१/२०२९ शुक्रवार ते दिनांक ०९/०१/२०२१ शनिवार,

३) तिसरा टप्पा दिनांक ११/०१/२०२१ सोमवार

४) चौथा टप्पा दिनांक १३/०१/२०२१ बुधवार

वरील नमुद तारखेला पुलाचे बांधकामाच्या वेळी खालील प्रमाणे वाहतुक वळविण्यात येणार आहे.

१) अहमदनगर कडुन संगमनेर,येवला,मनमाड,मालेगांब,धुळे कडे जाणारी जड वाहने ही नेवासा फाटा- कायगांव टोके फाटा-गंगापुर मार्गे जातील. इतर हलकी वाहने (चार चाकी व दु चाकी) ही नगर - राहुरी फॅक्टरी, श्रीरापुर ,बाभळेश्वर मार्गे जातील

२) शिर्डीकडून अहमदनगर कडे जाणासाठी सर्व  वाहने कोल्हार, बेलापूर, राहुरी फॅक्टरी मार्गे जातील.

३) श्रीरामपूर ते बाभळेश्वर ही एकोरी वाहतुक राहील तसेच कोल्हार ते बेलापूर ही देखील एकेरी वाहतुक राहील.या बाबत कोणाच्या हरकत असल्यास या कार्यालयातील जिल्हा विशेष शाखा, पोलीस अधिक्षक कार्यालय अहमदनगर, येथे समक्ष येवुन किंवा Email - pi.dsb.anr@mahapolice.gov.in  यावर दिनांक २७/१२/२०२० पर्यंत द्याव्यात वरील कोल्हार येथील पुलाच्या बांधकामा निमीत्ताने वाहतुक वळविण्यात येणार आहे. 

Post a Comment

0 Comments