विषारी दारू पाजल्याने मृत्यूचा गुन्हा दाखल

विषारी दारू पाजल्याने मृत्यूचा गुन्हा दाखल 

वेब टीम नगर : रमेश उर्फ रमाकांत काळे व त्याची पत्नी वंदना रा.द्वारकाधीश कॉलनी आलमगीर यांना माझी बकरी मेलेली आहे ती तुम्हाला देतो असं सांगून मोटर सायकलवर बसवून काटवणात नेऊन जावेद रौफ शेख राहणार मोईन गल्ली भिंगार व त्याचे  ३ अनोळखी साथीदार यांनी आणलेली दारू रमाकांत याला पाजून  मारहाण केली त्यात जबर मार लागल्याने त्यास सिटी केअर हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असता उपचार चालू असतांना रमाकांत मयत झाला.या बाबत भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन मध्ये मृ.रजी.नम्बर १५/२०१७ प्रमाणे २२-०२-२०१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मयतावर पी.एम करणारे वैद्यकीय अधिकार्यांनी मारहाणीत मार लागल्याने व मयतास बळजबरीने दारू पाजल्याने व दारू मध्ये विषाचे अंश आढळून आल्याबाबतचा अहवाल दिला आहे. असे संपूर्ण चौकशी अंती निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.       


Post a Comment

0 Comments