आरोग्य आहार
चाऊ मिन सूप
साहित्य : ६ कप व्हेजीटेबल स्टॉक, , २ टोमॅटो उकडून-सोलून-चिरून ,२ टे.स्पून बारीक चिरलेली सिमला मिरची , २ टे.स्पून बारीक चिरलेला फ्लॉवर, २ टे. स्पून बारीक चिरलेला पानकोबी, २ टे.स्पून बारीक चिरलेला गाजर , थोडी चिरलेली कोथिंबीर , थोडी पुदिन्याची पाने बारीक करून , २ टे.स्पून कॉर्नफ्लोर, ५-६ लसूण पाकळ्या बारीक शिरून , १ इंच आलं तुकडा बारीक चिरून , अर्धा टी.स्पून मिरपूड , मीठ चवीनुसार, २ टे.स्पून तेल , ३ टी स्पून सोया सॉस.
कृती : कढईत किंवा पातेल्यात तेल गरम करून त्यात चिरलेले आलं - लसूण , पुदिन्याची पानं , कोथिंबीर सर्व बारीक चिरलेल्या भाज्या घालून प्रखर आचेवर ५ मिनिटे परतावे. भाज्या तेलावर परतल्या गेल्या कि , त्यात व्हेजिटेबल स्टॉक , सोया सॉस , टोमॅटो , मीठ व मीरपूड घालून खुलायला ठेवावे.
१ कप पाण्यात २ टे स्पून कॉर्नफ्लोर घालून मिक्स करावे व उकळत्या सूप मध्ये घालावे . सूप चांगले उकळून उतरवावे . कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
0 Comments