लाच लुचपत प्रतिबंधकच्या जाळ्यात अडकली लाघुलिपीक

 लाच लुचपत प्रतिबंधकच्या  जाळ्यात अडकली लाघुलिपीक 

           


वेब टीम नगर : २३ वर्षीय तक्रारदार यांच्या जामिनीच्या संदर्भात उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा - पारनेर यांच्या समक्ष चुकीचा फेरफार रद्द करण्याबाबत सुरु असलेल्या दाव्याच्या निकाल पात्राच्या आदेशाची प्र्रात देण्याकरता शैला राजेंद्र झाम्बरे लघुलिपीक उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा--पारनेर कार्यालय यांनी तक्रारदाराकडे १६ डिसेंबर २०२० रोजी १० हजर रुपयांची मागणी केली त्याच वेळी ४ हजार रुपये स्वीकारून उरलेली रक्कम घेऊन आल्यावर आदेशाची मिळेल असे सांगितले. 

तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नगर यांच्याकडे दिलेल्या तक्रारी वरून करण्यात आलेल्या कारवाईत पंचांसमक्ष ५ हजारांची मागणी करून तडजोड करण्यासाठी ३ हजारांची मागणी केली. शैला राजेंद्र झाम्बरे लघुलिपीक उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा - पारनेर कार्यालय यांनी हि रक्कम १७ डिसेंबर २०२० रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालय येथे सापळा कारवाई दरम्यान पंचांसमक्ष स्वीकारली असता त्यांना रंगे हात पकडण्यात आले . 

या सापळा कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक पोलीस निरीक्षकी शाम पवरे तसेच पर्यवेक्षण अधिकारी हरीश खेडकर यांनी ला.प्र.वि पोलीस अधीक्षक नाशिक परिक्षेत्र सुनील कडासने , अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनावणे , वाचक पोलीस उपाधीक्षक दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.  


Post a Comment

0 Comments