जुगार अड्ड्यावर छापा:१७ जण ताब्यात

जुगार अड्ड्यावर छापा:१७ जण ताब्यात 


१३ लाख ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त 

वेब टीम नगर : जेऊर शिवारात जुगार अड्ड्यावर बुधवारी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांच्या पथकाने १७ जुगार्यांना ताब्यात घेतले या वेळी टाकलेल्या छाप्यात १३ लाख ९१०  रुपयांचा मुददीमाळी जप्त करण्यात आला 


जेऊर शिवारात चाफेवाडी रस्त्या जवळ अंबादास म्हस्के यांच्या मालकीच्या शेतातील मोकळ्या जागेत बसून पत्त्यांच्या कॅट मधील अंकावर व चित्रांवर पैसे लावून झन्ना मन्ना नावाचा जुगाराचा खेळ खेळतांना पोलिसांनी छापा टाकला. यात महेश भगवान साळवे (वय ५८ रा.विनायकनगर,अ.नगर) , प्रतीक दादासाहेब हिवाळे (वय २५ रा.हरेगाव,श्रीरामपूर) , शौकत दिलावर शेख (वय ३१, रा. इंदिरानगर, पाथर्डी) अयुब अब्बास शेख (वय २५ रा. नाथनागर पाथर्डी) ,  जमीर निझाम शेख ( वय ४५ , रा. शिवाजीनगर, कल्याण रोड अ. नगर ). अविनाश बाळासाहेब तोडमल ( वय २५ रा. बाळजाताई तापेवाडी , जेऊर , अ.नगर) ,मधुकर नाथाजी मोहिते (वय ४० रा. शिवाजीनगर कल्याण रोड अ. नगर ) , प्रणव सुनील पंचमुख (वय १९ रा. आंबेडकर कॉलनी भिंगार कॅम्प ) दत्तात्रय रामदास गवळी (वय ३८ रा. घोडेगाव , जि. नगर ) ,समीर जाकीर शेख ( वय २८ रा. जून मुकुंदनगर,नगर) , दीपक देविदास पवार ( वय २७ रा. बायजाबाई चाफेवाडी , जेऊर , नगर ) सागर आनंद दिवे (वय ३५ रा.सिद्दार्थनगर , नगर ) मतीन खालील  सय्यद ( वय ३० रा. जून मुकुंदनगर,नगर) आदी १७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 


या छाप्याच्या वेळी  २ लाख ६८ हजार ३६० रुपयांची  रोकड व ८ लाख रुपये किमतीची कार , २ लाख ३० हजार किमतीच्या मोटर सायंकाळी २५५० रुपयांचं जुगारच साहित्य असा एकूण १३ लाख ९१० रुपयांचा मुद्देदेमाल ताब्यात घेण्यात आला. एम. आय डी सी. पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 

Post a Comment

0 Comments