आरोग्य आहार : मलगटानी सूप

आरोग्य आहार

मलगटानी सूप 

साहित्य : ३ टे स्पून शिजवलेला भात , अर्धा नारळ खरवडलेला , १ चमचा बडीशेप , २ दालचिनीचे तुकडे , २ टीस्पून धने , १ टी स्पून जिरे, पाव चमचा मेथ्या , २ टेबल स्पून तेल , पाव किलो गाजराचे बारीक तुकडे ,१ छोटा  कांदा बारीक चिरून , १ सलगम बारीक चिरून, ४ लसूण पाकळ्या व अर्धा इंच आलं सोलून बारीक चिरून , पाऊण वाटी मसुराची डाळ , अर्धा किलो टोमॅटो उकडून बारीक चिरलेले , चिमूटभर हळद , २ टेबल स्पून लिंबाचा रस १ टेबल स्पून मीठ, ६ कप व्हेजीटेबल स्टॉक. 

कृती : प्रथम बडीशेप , दालचिनी , धने , जिरे व मेथी तव्यावर थोडे भाजून बारीक पूड करावी. नारळ वाटून त्याच दूध काढून ठेवावे. 

जाड बुडाच्या कढईत तेल गरम करावे व त्यात आलं लसूण तुकडे , चिरलेला कांदा , सलगम व गाजर घालून ३ मिनिटे परतावे व त्यात मसाला पावडर, मीठ व्हेजिटेबल स्टॉक, चिरलेला टोमॅटो व मसुराची डाळ धुवून घालून भाज्या मऊ शिजेपर्यंत शिजवावे. भाज्या व डाळ शिजल्यावर खाली उतरवावे व गार झाल्यावर मिक्सरमध्ये घुसळून गाळून घ्यावे. 

सर्व्ह करते वेळी परत उकळून त्यात नारळाचे दूध , लिंबाचा रस व शिजावलेला  भात घालून गरम सर्व्ह करावे. Post a Comment

0 Comments