कृषी आंदोलना दरम्यान बाबा राम सिंह यांची आत्महत्या


कृषी आंदोलना दरम्यान बाबा राम सिंह यांची आत्महत्या 

 वेब टीम नवी दिल्ली : बाबा राम सिंह यांनी शेतकरी आंदोलनाच्या २०व्या दिवशी सिंधू सीमेवर बुधवारी सायंकाळी स्वतःवर गोलकी घडून घेऊन आत्महत्या केली. ६५ वर्षाच्या बाबा राम सिंह यांनी स्वतःवर गोळी झाडून घेताच त्यांना खाजगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे त्यानं मृत घोषित करण्यात आले. 


सिंघारा (जिल्हा कर्नाल) येथील नानकसार साहिब  गुरुद्वाऱ्याचे ते पीठाधीश होते. त्यांचा मोठा भक्त समुदाय असून कल्पना चावला मेडिकल कॉलेज येथे त्यांचा मृतदेह आणण्यात आल्यावर तेथे उपस्थित भक्तगणांनी त्यांचे शवविच्छेदन करण्यास विरोध केला. तेथून त्यांचा मृतदेह नानकसार गुरुद्वाऱ्यात नेण्यात आला जिथे मोठ्या प्रमाणावर बाबांचे भक्तगण उपस्थित आहेत. 


आत्महत्या करण्या पूर्वी त्यांनी आपल्या चिट्ठीत कृषी विधेयकाचा उल्लेख केला त्यात पुढे त्यांनी अनेक लोकांनी आपल्या पुरस्कार परत केले मात्र सरकार शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकत नाही हि अत्यंत दुःख दायक गोष्ट असून मलाही त्याचा क्लेश होत आहे. असे पंजाबी भाषेत लिहिले आहे. 


या घटनेनंतर गुरुद्वाराच्या प्रांगणात " महाराजांनी शेतकऱ्यांसाठी बलिदान दिलं , मोदीजी आतातरी शेतकऱ्यांचं ऐका " अशी मागणी त्याचे भक्त करत होते. 

दरम्यान या भक्त गणांची समजूत घालण्यात आली असून बाबा राम सिंह  यांच्या शव विच्छेदनासाठी त्यांना राजी करण्यात आल्याने त्यांचा मृतदेह कल्पना चावला मेडिकल कॉलेज मध्ये आणण्यात आले आहे.  

Post a Comment

0 Comments