म्हणून कोर्टाने फेटाळला बाळ बोठेचा अटकपूर्व जामीन अर्ज
वेब टीम नगर : जरे हत्या कांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे यांनी दि. ७ रोजी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र नायायालयात अर्ज दाखल केला होता. आज त्याच्या अटक पूर्व जामीन आर्जवर सुनावणी होऊन एम.आर नातू यांनी बबल बोठे यांचा खालील कारणांनी जामीन अर्ज फेटाळला :
बाळ बोठे च्या अटकेपूर्व फेटाळण्याची करणं अशी :
* अर्जदार व अटक आरोपी व मयत यांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड मध्ये असे आढळून आले आहे कि घटनेच्या अगोदर एक महिन्यापासून ते आरोपी व मयत सतत संपर्कात असल्याचे दिसून येत.
* सी.सी.टी व्ही च्या रेकॉर्ड मधे गुन्ह्या दरम्यानच्या हालचालींवरून व गुन्ह्यामध्ये साक्षी दरांनी दिलेल्या जबाबांवरून अर्जदार व आरोपी यांचा गुन्ह्याचा संबंध असल्याचे दिसून येते .
* गुन्ह्या मधील अटक आरोपी कडून जापत झालेली रक्कम रु. ६,२०, ००० यावरून अर्जदार विरुद्ध प्रथम दर्शनी पुरावा दिसून येतो व अर्जदार याचा सादर गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे दिसून येते .
* गुन्हा दाखल झाल्याचे दुसऱ्या दिवस पासून अर्जदाराकडे अपराधी पणाचे बोट जात असल्याचे दिसून आले.
* घटना गंभीर स्वरूपाची असून गळा चिरून हत्या केलेली आहे.
* अर्जदाराचे म्हणणे असे होते कि त्याला ह्या गुन्ह्यात चुकीच्या पद्धतीने सूडाच्या भावनेने गोवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
हे म्हणणे कोर्टाने फेटाळले आहे .
सरकारी पक्षाचा युक्तिवाद , तपासी अंमलदार यांनी प्रथम दार्शनि गोळा केलेला तांत्रिक पुरावा , साक्षीदारांचे जबाब ग्राह्य धरून अर्जदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे.
अटकपूर्व जामीनाचे कामकाज जिल्हा न्यायाधीश क्र. ८ न्या. एम . आर नातू यांचे कोर्टात चालले.
0 Comments