आरोग्य आहार : मिनिस्ट्रोन सूप

 आरोग्य आहार 

मिनिस्ट्रोन सूप 


साहित्य : अदपाव गाजर बारीक चिरून , १ सलगम सोलून बारीक चिरून , ३-४ लसूण पाकळ्या , १ कांदा बारीक चिरून , कांद्याच्या पतीचा २ कांड्या बारीक चिरून, थोडी कोथिंबीर बारीक चिरून, २ टोमॅटो उकडून सोलून बारीक चिरून, १ छोटा पानकोबी बारीक चिरून, पाव चमचा मिरपूड , चवीनुसार मीठ, १०० ग्राम चीज किसून , १ टेबल स्पून  तेल किंवा लोणी , १ काप छोटी मॅकरोनी , ५ कप व्हेजीटेबल स्टॉक . 


कृती : जाड बुडाच्या पातेल्यात लोणी अथवा तेल तापवावे व त्यात चिरलेला कांदा, लसूण , गाजर , संगम घालून थोडे परतावे . नंतर त्यात कोथिंबीर व चिरलेली कांद्याची पात, पानकोबी, टोमॅटो घालून परतून व्हेजीटेबल स्टॉक, मीठ - मिरपूड घालून शिजवावे . 

भाज्या शिजवल्यावर मॅकरोनी घालून मॅकरोनी शिजे पर्यंत सूप उकळावे. मॅकरोनी शिजवल्यावर किसलेले चीज घालून सूप गरम गरम सर्व्ह करावे .   

Post a Comment

0 Comments