इम्प्लिमेन्टेंशन ऑफ आय. सी. जे. एस अँन्ड सीसीटीएनएस सर्च मध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

 इम्प्लिमेन्टेंशन ऑफ आय. सी. जे. एस अँन्ड सीसीटीएनएस सर्च मध्ये महाराष्ट्र देशात अव्वल 

वेब टीम  नगर :  नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो, नवी दिल्ली यांचे वतीने दिल्ली येथे ऑनलाईन पार पडत असलेल्या गुड प्रॅक्टीसेस इन

सी. सीटीएनएस/आय.सी.जे.एस च्या कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्र सीसीटीएनएसला इम्प्लिमेन्टेंशन ऑफ आय. सी. जे. एस अँन्ड सीसीटीएनएस सर्च या वर्गवारीमध्ये भारतातून प्रथम क्रमांकांचे पारितोषिक मिळाले.

आय.सी.जे.एस व सीसीटीएनएस सर्च या प्रणालीची पोलीस तपासामध्ये गुन्हे प्रकटीकरण,गुन्हयांचे पर्यवेक्षण, गुन्हे प्रतिबंध करणे याकरीता महत्वाची मदत होते. सदर प्रणालीमध्ये देशपातळीवरील गुन्हे व गुन्हेगाराची माहिती उपलब्ध असून त्याव्दारे गुन्हे प्रकटीकरण, गुन्हेगारांचा कार्यपध्दतीप्रमाणे शोध (एमओबी), शस्त्र परवाना तसेच तपासामध्ये गुन्हेयांची सद्यस्थिती इत्यादी माहितीची सुबिधा सदर प्रणालीमध्ये अदययावत आहे. गुन्हे प्रतिबंधक कारवाई करणे, पासपोर्ट/चारीत्र्य पडताळणी, वाहनाबाबतची पोलीस रेकॉर्डवरील माहितीची पडताळणी इत्यादी माहिती सदर प्रणालीमध्ये अदययावत आहे. देशातुन महाराष्ट्र राज्यातील पोलीस सदर प्रणालीचा गुन्हे तपासामध्ये मोठया प्रमाणावर वापर करीत आहे.

सीसीटीएनएस - आयसीजेएस या प्रणाली च्या सहाय्याने १५७३ गुन्हे उघडकीस आणले असून ७४३ चोरीस गेलेल्या मालमत्तेचा शोध, ६९३ हरवलेल्या व बेवारस मयतांचा शोध, ७८८३ आरोपींवर प्रतिबंधात्मक कार्यवाही, ५०७ प्रकरणामध्ये जामीन फेटाळले आहे , व १३७२१ व्यक्तींची पडताळणी

करण्यात आली असून ४६०१ व्यक्तिविरुद्ध गुन्हे नोंद असल्याचे मिळून आले. तसेच एकूण ११७०२६ पारपत्र व चारित्र्य पडताळणी प्रकरणामध्ये २८३७ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या कामगिरीमध्ये अतुलचंद्र कुलकर्णी, अपर पोलीस महासंचालक,  प्रविण साळुंके, विशेष पोलीस महानिरीक्षक ,  रंजन कुमार शर्मा, पोलीस उप महानिरीक्षक ( प्रशासन ) अतिरिक्त कार्यभार विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण केंद्र, गु.अ.वि.म.रा.पुणे यांचे मार्गदर्शनाखाली संगणक विभागातील  संभाजी कदम, पोलीस अधीक्षक, (तांत्रिक सेवा),  नंदा पाराजे, अपर पोलीस अधीक्षक, संगणक, जितेंद्र कदम, पो.उप.अधीक्षक, चंद्रशेखर सावंत, पोलीस उप अधीक्षक, प्रशांत पांडे, पोलीस निरीक्षक, शशिकला काकरे, प्रमोद जाधव, पोलीस उप निरीक्षक जावेद खान, पोलीस हवालदार किरण कुलकर्णी, संदिप शिंदे, पोलीस नाईक, प्रियांका शितोळे व  किर्ती लोखंडे पोलीस शिपाई यांनी मोलाची कामगिरी केली.

  

Post a Comment

0 Comments